गुरुनानक जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरुनानक देव यांची जयंती साजरी केली जाते,  ज्यामुळे या दिवशी शीख धर्माच्या तत्त्वज्ञान आणि गुरुनानक देवांच्या  अमूल्य शिक्षांचा आदर व्यक्त केला जातो.

गुरुनानक देव हे समाजातील समता, मानवतेचा आणि शांतीचा संदेश देणारे महान  संत होते. 

या दिवसाच्या पहाटेला “अमृत वेला” असे म्हटले जाते, कारण यावेळी विशेष प्रार्थना आणि भक्तिमय कीर्तनाचे आयोजन होते.

लंगरची व्यवस्था हा या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामागे  सर्वांमध्ये समानतेचा संदेश आहे. येथे सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र येऊन  प्रसाद ग्रहण करतात आणि मानवतेचा आदर्श उभा करतात.

गुरुनानकजींचा जन्म १४६९ साली लाहोरजवळील तलवंडी गावात एका साध्या पण धार्मिक हिंदू कुटुंबात झाला.

गुरुनानकजींमध्ये बाल्यापासूनच सत्य, अहिंसा, संयम यांसारखे गुण  स्वाभाविकपणे दिसत होते. ते सांसारिक मोहापासून दूर होते, पण इतर  साधू-संतांप्रमाणे संसाराचा त्याग केला नाही किंवा त्याची निंदा कधी केली  नाही.

गुरुनानकजींच्या परिवाराच्या आग्रहाखातर त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी  त्यांचा विवाह झाला. विवाहानंतरही त्यांची अध्यात्माची ओढ तशीच राहिली.

जवळपास ३० वर्षांचे असताना, गुरुनानकजींनी सांसारिक बंधनांपासून मुक्त  होऊन, भरकटलेल्या समाजाला सत्याच्या मार्गावर नेण्याचा ध्यास घेतला

आपण आपल्या कर्तव्यातून पळून न जाता, योग्य कार्य केले पाहिजे. लोकांनी देवाच्या मार्गावर चलावे आणि समाजाचे कल्याण करावे.

“इक ओंकार” — एकच परमात्मा आहे, हे लक्षात ठेवून, आपण सर्वजण एकत्र, प्रेमाने आणि सौहार्दाने जगावं.- Guruanankdev