Government Job : कामगार आयुक्तालय भरती 2026: निरीक्षक, लेखापाल व लघुटंकलेखक पदांसाठी 78 जागांची मेगा भरती.

By
Vishal Patole
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News...

मुंबई, प्रतिनिधी Government Job : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत कार्यरत विविध सुरक्षा रक्षक मंडळे आणि माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कामगार आयुक्तालय, मुंबई यांच्या वतीने निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या पदांसाठी एकूण 78 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जून 2026 रात्री 11:55 वाजेपर्यंत आहे.  महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 तसेच महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध मंडळांमधील सेवा प्रवेश नियमांनुसार ही भरती करण्यात येत आहे.

Government Job : कामगार आयुक्तालय भरती 2026

पदनिहाय रिक्त जागांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
निरीक्षक62
लेखापाल12
लघुटंकलेखक04
एकूण78

शैक्षणिक पात्रता

1) निरीक्षक

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक.

2) लेखापाल

  • बी.कॉम. (B.Com) पदवी.
  • संबंधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

3) लघुटंकलेखक

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • मराठी व इंग्रजी लघुलेखन गती 80 शब्द प्रति मिनिट.
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट.
  • इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट.

वयोमर्यादा

  • 11 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे. ही सवलत मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना लागू राहील.

वेतनश्रेणी

निरीक्षक व लेखापाल

  • वेतनश्रेणी: S-13
  • वेतन: ₹35,400 ते ₹1,12,400
  • याशिवाय महागाई भत्ता व इतर शासनमान्य भत्ते.

लघुटंकलेखक

  • वेतनश्रेणी: S-8
  • वेतन: ₹25,500 ते ₹81,100
  • महागाई भत्ता व इतर नियमानुसार भत्ते लागू.

Government Job अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
खुला प्रवर्ग₹1000
मागासवर्गीय / अनाथ₹900

नोकरीचे ठिकाण

  • निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई येथे करण्यात येणार आहे.

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे. एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक राहील.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू: प्रक्रिया सुरू
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 जून 2026
  • शुल्क भरण्याची अंतिम मुदत: 11 जून 2026 रात्री 11:55 वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ

Government Job भरतीविषयी सविस्तर माहिती, पात्रता, आरक्षण, परीक्षा पद्धती आणि इतर अटी-शर्ती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

तरुणांसाठी सुवर्णसंधी

राज्य शासनाच्या अधिपत्याखालील मंडळांमध्ये स्थिर नोकरी मिळविण्याची इच्छा असलेल्या पदवीधर युवक-युवतींसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात आहे. विशेषतः निरीक्षक पदासाठी सर्वाधिक 62 जागा उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाचे दुवे:

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Exit mobile version