MPSC (Group C) भरती 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात 6 नोव्हेंबर 2026 रोजी महत्त्वाचे शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या शुद्धिपत्रकानुसार भरतीमधील पदसंख्येत मोठी वाढ करून एकूण 16,717 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध शासकीय विभागांतील लिपिक-टंकलेखक, तलाठी, कर सहायक, अधिपरिचारिका, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक यांसह अनेक पदांचा समावेश आहे. नवीन उमेदवारांना अर्ज करण्याची तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पात्रतेनुसार नवीन पदांसाठी विकल्प देण्याची संधी देण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखेतही बदल करण्यात आला असून आता पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.
Group C भरतीचा महत्त्वाचा तपशील
| तपशील | माहिती |
| भरती संस्था | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) (Group C) |
| परीक्षेचे नाव | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 |
| जाहिरात क्रमांक | 017/2026 |
| शुद्धिपत्रक दिनांक | 6 नोव्हेंबर 2026 |
| एकूण पदसंख्या | 16,717 |
| पदांचा गट | गट-क |
| अर्ज पद्धती | ऑनलाइन |
| पूर्व परीक्षा | 24 जानेवारी 2027 |
कोणत्या Group C पदांसाठी भरती होणार?
या Group C भरतीमध्ये एकूण 27 संवर्गांतील पदांचा समावेश आहे. महत्त्वाची पदे आणि उपलब्ध पदसंख्या पुढीलप्रमाणे आहेत.
| पदाचे नाव | पदसंख्या |
| उद्योग निरीक्षक | 9 |
| तांत्रिक सहायक | 3 |
| कर सहायक | 282 |
| सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक | 461 |
| लिपिक-टंकलेखक | 3,966 |
| ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) | 1,840 |
| वरिष्ठ लेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल | 196 |
| पशुधन पर्यवेक्षक | 322 |
| स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (सार्वजनिक बांधकाम) | 134 |
| गणित व चित्रकला निदेशक | 243 |
| सहाय्यक भांडारपाल | 182 |
| भांडारपाल | 9 |
| शिल्प निदेशक | 1,388 |
| अधिपरिचारिका | 3,919 |
| कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ | 153 |
| सहाय्यक कृषी अधिकारी | 1,203 |
| स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (जलसंपदा) | 949 |
टीप: वरील तक्त्यातील पदसंख्या ही शुद्धिपत्रकातील विभागनिहाय तक्त्यानुसार आहे. उर्वरित संवर्गांचा तपशील अधिकृत परिशिष्टामध्ये दिला आहे.
MPSC Group C : अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज व विकल्प
- सुरू होण्याची तारीख- 13 नोव्हेंबर 2026, दुपारी 2:00 वाजल्यापासून
- अर्ज करण्याची अंतिम मुदत – 27 नोव्हेंबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत
- परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत – 30 नोव्हेंबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत
- संयुक्त पूर्व परीक्षा – 24 जानेवारी 2027
अर्ज आणि विकल्पाबाबत महत्त्वाचे नियम
- यापूर्वी अर्ज न केलेल्या पात्र उमेदवारांना नव्याने ऑनलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
- यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने समाविष्ट झालेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार विकल्प सादर करता येतील.
- आधी अर्ज केलेल्या आणि नव्या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना पुन्हा संपूर्ण अर्ज करण्याची आवश्यकता नाही; मात्र संबंधित पदांसाठी विकल्प सादर करणे आवश्यक आहे.
- विकल्प सादर करण्यासाठी आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
- विकल्प सादर करताना मूळ अर्जातील दाव्यांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
- निर्धारित मुदतीत विकल्प सादर न केल्यास भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांमध्ये विकल्प बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही.
वयोमर्यादेबाबत महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या 5 नोव्हेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत प्रवेशासाठी निर्धारित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. नवीन समाविष्ट संवर्गांसाठी किमान व कमाल वयोमर्यादा मूळ जाहिरात दिनांक 25 जून 2026 नुसार राहील. नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय मोजण्याचा दिनांक अधिकृत जाहिरातीच्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपात्रकात दिलेल्या परिशिष्ट-4 मध्ये दिल्याप्रमाणे राहील.
शैक्षणिक पात्रता आणि आरक्षण
MPSC (Group C) या भरतीसाठी पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता, इतर अर्हता आणि अनुभवाचा तपशील शुद्धिपत्रकाच्या परिशिष्ट-3 मध्ये देण्यात आला आहे.
तसेच अधिकृत परिशिष्टांमध्ये पुढील माहिती देण्यात आली आहे:
- परिशिष्ट-1: विविध संवर्गांची पदसंख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील.
- परिशिष्ट-2: दिव्यांग उमेदवारांसाठी पदनिहाय आरक्षण व पात्रतेचा तपशील.
- परिशिष्ट-3: पदनिहाय शैक्षणिक पात्रता व आवश्यक अर्हता.
- परिशिष्ट-4: नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय मोजण्याचा दिनांक.
महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी लागू असलेल्या आरक्षणाचा तपशील संबंधित परिशिष्टात तपासणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क आणि अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्रमांक 017/2026 – महाराष्ट्र गट-क (Group C) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी प्रवर्गनिहाय परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आहे.
पूर्व परीक्षा (Preliminary Examination)
| प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग (Open) | ₹394 |
| मागासवर्गीय (Reserved) | ₹294 |
| EWS प्रवर्ग | ₹294 |
| अनाथ उमेदवार | ₹294 |
| माजी सैनिक (Ex-Servicemen) | ₹44 |
- अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावी.
- परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरता येईल.
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.
- मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याच्या अटी या शुद्धिपत्रकालाही लागू राहतील.
अधिकृत वेबसाइट: MPSC Online Application Portal
परीक्षेच्या तारखेत बदल
यापूर्वी महाराष्ट्र (Group C) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 3 जानेवारी 2027 रोजी आयोजित करण्यात येणार होती. मात्र पदसंख्येत मोठी वाढ झाल्यामुळे, नवीन संवर्गांचा समावेश आणि उमेदवारांना अर्ज व विकल्प सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याच्या उद्देशाने परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल.
उमेदवारांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी
- एकूण 16,717 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- नवीन उमेदवारांनी 27 नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावा.
- आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी पात्रतेनुसार नवीन पदांचे विकल्प तपासावेत.
- एक वर्षाच्या वयोमर्यादा शिथिलतेचा लाभ पात्र उमेदवारांना मिळणार आहे.
- परीक्षा शुल्क 30 नोव्हेंबरपर्यंत भरावे.
- पूर्व परीक्षेची सुधारित तारीख 24 जानेवारी 2027 आहे.
महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी MPSC चे मूळ जाहिरातपत्रक आणि 6 नोव्हेंबर 2026 रोजीचे शुद्धिपत्रक काळजीपूर्वक वाचावे. पदनिहाय पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा आणि इतर अटी अधिकृत परिशिष्टांनुसार तपासाव्यात.
माहितीचा स्रोत: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 6 नोव्हेंबर 2026 रोजीचे जाहिरातीचे शुद्धिपत्रक – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
