BRO- 10 वी पास वर सरकारी नोकरी – 10th Class Pass Job – BRO (Border Road Organisation) मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी चांगली नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्याच्या अंतर्गत ४११ जागा भरल्या जात असून या नोकर भरती बद्दल आपण सविस्तर आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.
- What is BRO ? BRO काय आहे ?
- 10th Class Pass Job Government – BRO मध्ये ४११ जागा
- पगार – 10th Class Pass Job India Govt
- BRO पात्रता – 10th Class Pass Job Sarkari
- फी – BRO ( 10th Class Pass Job India Govt)
- अर्ज कसा करावा व कुठे पाठवावा – 10th Class Pass Job
- BRO निवड प्रक्रिया – 10th Class Pass Job
What is BRO ? BRO काय आहे ?
भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स च्या अंतर्गत बॉर्डर रोड विंग्स येते. आणि या बॉर्डर रोड विंग्स च्या अंतर्गत “बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन” –BRO काम करते. हे एक भारत सरकारचे संघटन आहे ज्याचा मुख्य उद्देश सीमावर्ती भागातील रस्ते, हायवे, डोंगर दऱ्यातील अवघड मार्ग इत्यादी तयार करणे व त्याची डागडुजी करणे. खालीलपैकी काही त्याच्या मुख्य जबाबदाऱ्या आहेत.
मुख्य जबाबदाऱ्या
- सीमावर्ती भागात रस्ते बांधकाम.
- रस्त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करण्याचे काम प्राकृतिक आपत्ती व्यवस्थापन- भूस्खलन, पूर, भूकंप अशा आपत्तींच्या वेळी BRO मदतीसाठी तत्पर असते. ते मार्ग मोकळे करून वाहतूक पुनर्स्थापित करतात.

10th Class Pass Job Government – BRO मध्ये ४११ जागा
Border Road Organisation (बि.आर. ओ.) मध्ये MSW COOK, MSW MASON, एम एस डब्लू
लोहार, एम एस डब्लू मेस वेटर या पदाच्या एकूण ४११ भरल्या जात आहेत. प्रवर्ग निहाय जागा खालीलप्रमाणे आहे
10th Class Pass Job Vacancy
| अ. क्र. | पदाचे नाव | ओपन | ओ.बी.सी | एस.सी. | एस.टी. | ई.डब्ल्यू.एस. | एकूण |
| १ | एम एस डब्लू कुक | ७७ | १८ | ३२ | १९ | ०७ | १४७ |
| २. | एम एस डब्लू राजमिस्त्री | ८१ | ५४ | २२ | ०५ | १० | १७२ |
| ३ | एम एस डब्लू लोहार | ४१ | १९ | ०८ | ०५ | ०२ | ७५ |
| ४ | एम एस डब्लू मेस वेटर | ०६ | ०५ | ०० | ०० | ०० | ११ |
| एकूण | २०५ | ९६ | ६२ | २९ | १९ | ४११ |
पगार – 10th Class Pass Job India Govt
- पे स्केल – १
- पगार – ५२०० रुपये ते २०,२०० रुपये महिना
BRO पात्रता – 10th Class Pass Job Sarkari
वय मर्यादा
सर्वसामान्य वय मर्यादा दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी १८ ते २५ वर्षे अशी आहे.
जन्म तारखेनुसार प्रवर्ग निहाय वय मर्यादा
| ओपन | ओ.बी.सी. | एस. सी. आणि एस. टी. |
| २४ फेब्रुवारी २००० ते २४ फेब्रुवारी २००७ | २४ फेब्रुवारी १९९७ ते २४ फेब्रुवारी २००७ | २४ फेब्रुवारी १९९५ ते २४ फेब्रुवारी २००७ |
उंची, वजन आणि छाती
| रिजन | राज्य | उंची | छाती | वजन |
| CENTRAL REGION | मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, दादर व नगर हवेली, दिव दमन आणि छत्तीसगढ | १५७ सेमी | न फुगवता – ७५ सेमी फुगवून – ८० सेमी | ५० किलो |
सूचना – वरील निकष राज्यानुसार बदलत जातात, म्हणून उमेदवाराने आपल्या डोमिसाईल राज्यानुसार निकष पाहण्यासाठी जाहिरात वाचावी.
शैक्षणिक पात्रता
| अ. क्र. | पद | शैक्षणिक पात्रता |
| १ | एम. एस. डब्ल्यू. कुक (Cook) | दहावी पास |
| २. | एम. एस. डब्ल्यू. राजमिस्त्री (Mason) | दहावी पास आणि आय टी आय |
| ३. | एम. एस. डब्ल्यू. लोहार (Blacksmith) | दहावी पास आणि आय टी आय |
| ४ | एम. एस. डब्ल्यू. मेस वेटर (Mess Waiter) | दहावी पास |
फी – BRO ( 10th Class Pass Job India Govt)
वरील पदांसाठी अर्ज करताना त्याला परीक्षा फी उपलब्ध आहे एस.सी. / एस. टी. च्या उमेदवारांना फी नाही मात्र ओपन आणि ओ. बी.सी. च्या उमेदवारांना ५० रु फी ऑनलाईन पद्धतीने भरून त्याची चलन पावती ऑफलाईन अर्जासोबत पाठविणे आवश्यक आहे.
BRO चे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी येथे क्लिक करा.
| ओपन, ओ. बी. सी. | ५० रु |
| एस. सी. / एस. टी. / दिव्यांग | फी नाही |
महत्वाच्या दिनांक – BRO (10th Class Pass Job Sarkari )
| अर्ज प्राप्तीची सुरुवात | ११ जानेवारी २०२५ |
| अर्ज प्राप्त होण्याची शेवटची दिनांक | २४ फेब्रुवारी २०२५ |
| अति दूर क्षेत्र – पूर्वोत्तर राज्य, काश्मीर , अंदमान बेटे इत्यादी साठी | ११ मार्च २०२५ |
BRO चा ऑफलाईन अर्ज व सविस्तर जाहिरात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्जासोबत पाठवायच्या महत्वपूर्ण कागदपत्रांची यादी
ऑफलाईन अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडायची आहे. या सर्व कागदपत्रांवर स्वत:ची सही कागदपत्रांच्या खालील जागी करावी (म्हणजेच कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करून घ्यावेत- किंवा GAZZETTED OFFICER च्या हस्ते अटेस्टेड करावे लागतील.
- ओरीजनल Call Letter
- जो मोबाईल नंबर अर्जात नमूद केला आहे तो नंबर आधार कार्डला लिंक असणे महत्वाचे तसे अपडेट केलेले आधार कार्ड.
- ओळख पुरावा (आधार कार्ड सोडून)
- शैक्षणिक कागदपत्रे – दहावी, ITI प्रमाणपत्र . मार्कशीट
- जातीचा दाखला
- अनुभ प्रमाणपत्र (असल्यास)
- EWS/ इनकम प्रमाणपत्र (लागू असल्यास )
- दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास )
- अन्य आवश्यक ती कागदपत्रे- EX आर्मी, इत्यादी. (लागू असल्यास )
अर्ज कसा करावा व कुठे पाठवावा – 10th Class Pass Job
ऑफलाईन अर्जाची प्रिंट काढून तो इंग्लिश भाषेत मोठ्या लिपीत (BLOCK LETTERS- कॅपिटल लेटर) मध्ये भरावा. नंतर त्यासोबत वरील प्रमाणे पेमेंट करून त्याची प्रिंट जोडावी व वरील प्रमाणे सर्व आवश्यक ते कागदपत्रे जोडून खालील पत्यावर दिनांक २५-०२-२०२५ च्या आत पोहोचील असे पाठवावेत.
पत्ता – Address
Commandant, GREF Centre, Dighi Camp, Alandi Road, Pune- 411015
BRO निवड प्रक्रिया – 10th Class Pass Job
लेखी परीक्षा
आपल्या शैक्षणिक गुणांच्या आधारे आपणास आपण निवडलेल्या पदाची परीक्षा देण्यासाठी प्रवेश पत्र पाठवले जाते. या प्रवेश पत्रातील माहिती नुसार आपणास परीक्षा केंद्रावर जाऊन लेखी परीक्षा द्यावी लागते.
प्रत्येक पदाची परीक्षा हि त्या पदासाठी आवश्यक स्कील व ज्ञानाच्या आधारावर व दहावी च्या अभ्यासक्रमावर आधारित असते.
स्कील टेस्ट
लेखी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाते ती खालीलप्रमाणे
| पदाचे नाव | चाचणी |
| एम एस डब्ल्यू – कुक (COOK) | फळे, भाजीपाला कापणे मसाले ओळखणे भांडी धुणे जागेची स्वच्छता अन्नाची सजावट, सुगंधीकरन |
| एम एस डब्ल्यू – राजमिस्त्री (MASON) | विटांचे बांधकाम दगडांचे बांधकाम माल कालवणे व त्याचे प्रमाण व्हायब्रेटर चा वापर शटरिंगचे उभारणे ज्ञान डागडुजी- उपचार |
| एम एस डब्ल्यू – लोहार (BLACK SMITH) | गेज आणि मोजमापन साहित्याचा वापर DENTING चे काम उपलब्ध साहित्यातून वेगवेगळे आकार बनविणे वेगवेगले डायस / फासे बनविणे सुरक्षा उपाय |
| एम. एस. डब्ल्यू. मेस वेटर (Mess Waiter) | पेय देण्याचा शिष्टाचार अन्न वाढण्याचा शिष्टाचार वेगवेगळी भांडी वापर वेगवेगळ्या ओकेजन साठी जेवणाचा टेबल सजविणे बेड तयार करणे अन्नपदार्थांची ओळख पेय जलाची ओळख |
शारीरिक क्षमता चाचणी
लेखी परीक्षा व स्किल टेस्ट पास होणाऱ्या उमेदवारांची त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते. ती खालीलप्रमाणे
| १.६ किमी धावणे | १० मिनिटे |
BRO रिपोर्टिंग च्या वेळी सादर करावयाची कागदपत्रे
शेवटच्या टप्प्यात अंतिम निवड झाल्यानंतर आपली ओरीजनल कागदपत्रे व त्याच्या कॉपी सहित BRO ला रिपोर्ट करावे लागते त्यावेळी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
- ओरीजनल Call Letter
- जो मोबाईल नंबर अर्जात नमूद केला आहे तो नंबर आधार कार्डला लिंक असणे महत्वाचे तसे अपडेट केलेले आधार कार्ड.
- ओळख पुरावा (आधार कार्ड सोडून)
- शैक्षणिक कागदपत्रे – दहावी, ITI
- जातीचा दाखला
- अनुभ प्रमाणपत्र (असल्यास)
- EWS/ इनकम प्रमाणपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
- अन्य आवश्यक ती कागदपत्रे- EX आर्मी, इत्यादी.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य नोकरी संदर्भातील ब्लॉग :
Mumbai High Court – मुंबई उच्च न्यायालयात ‘कायदा क्लार्क’ पदासाठी भरतीची घोषणा.
हवाई दलातील नोकरीत सामील व्हा रोमांचक संधी आपली वाट पाहत आहे ! – Agniveer vayu Intake 2026
