10th Pass Job – अग्निवीरवायु नॉन-कॉम्बटंट”“Agniveervayu Non-Combatant – 02/2025” या जाहिराती नुसारअग्निवीर योजने अंतर्गत HOSPITALITY & HOUSEKEEPING या पदाच्या भारतीय वायू दलातील रिक्त जागा भरण्यासाठी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना संघटनेच्या हितासाठी नेमून दिलेल्या विशिष्ट जबाबदाऱ्यांसोबतच, हॉस्पिटॅलिटी किंवा हाऊसकीपिंग शाखेअंतर्गत वेळोवेळी विविध कामे व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संबंधित शाखांमधील नोकरीचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे: –
- 10th Pass Job – कामाचे स्वरूप- JOB Profile
- अनिवार्य वैद्यकीय मानके
- 10th Pass Job वेतन, भत्ते आणि इतर लाभ
- विमा, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र:
- परीक्षा फी – फी नाही
- पासपोर्ट फोटो
- आवश्यक दस्तऐवज यादी
- ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची
- 10th Pass Job निवड प्रक्रिया
- फेज – Iv – वैद्यकीय तपासणी
- अग्निवीरवायू ऑफलाईन अर्ज कसा भरावा व्हिडीओ-

10th Pass Job – कामाचे स्वरूप- JOB Profile
हॉस्पिटॅलिटी शाखा: या शाखेत व्यक्तीला स्वयंपाक, स्वयंपाकघर व्यवस्थापन, पदार्थांचे सादरीकरण, स्वच्छ आणि सुव्यवस्थित वातावरण राखणे, अन्न व इतर वस्तूंचे सुरक्षित साठवण, भांडी-काटे-चमचे हाताळणे, रेफ्रिजरेशन, टेबल-खुर्च्या मांडणे तसेच अन्न आणि पाण्याची सेवा करणे यासंबंधित सर्व कामे पार पाडावी लागतील.
हाऊसकीपिंग शाखा: या शाखेत व्यक्तीला मजले, रस्ते, खोल्या, स्नानगृहे, शौचालये स्वच्छ करणे, झाडू तयार करणे, गवत/झुडपे छाटणे, जमिन समतल करणे/चर खोदणे, बागेला पाणी देणे, भांडी/कपडे धुणे, पाणी भरणे व वाहून नेणे, तसेच कार्यालयीन उपकरणे हाताळणे यासंबंधित सर्व कामे करावी लागतील. याव्यतिरिक्त, केस कापणे, दाढी करणे, डोक्याची मसाज करणे, कपडे इस्त्री करणे, चामड्याच्या वस्तू/तळवे शिवणे, चामड्याच्या वस्तू दुरुस्त करणे, बूट पॉलिश करणे, कपडे कापणे/शिवणे/बदल करणे/डाग जोडणे तसेच रिबिन, बॅज तयार करणे अशी अतिरिक्त कामेही करावी लागू शकतात.
10th Pass Job पात्रता निकष
वयोमर्यादा:
दिनांक 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 (दोन्ही तारखांचा समावेश) दरम्यान जन्म झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
फक्त अविवाहित पुरुष
उमेदवारांनी चार वर्षांच्या ठरलेल्या सेवा कालावधीत विवाह न करण्याची हमी द्यावी लागते
चार वर्षांच्या कालावधीत विवाह केल्यास संबंधित उमेदवारांना सेवेतून कमी करण्यात येईल.
भरतीवेळी उमेदवारांनी वरील अटी मान्य असल्याचे लेखी प्रमाणपत्र द्यावे लागेल.
शैक्षणिक पात्रता
केवळ SSC/ १० वी पास
अनिवार्य वैद्यकीय मानके
उंची :
पुरुष उमेदवारांसाठी: किमान स्वीकारार्ह उंची 152 सें.मी. आहे
वजन:
वजन उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे
छाती:
पुरुष उमेदवारांसाठी: किमान 5 सें.मी. फुगवण्याची क्षमता असावी
शरीरावरील टॅटू :
- स्थायी शरीर टॅटू परवानगीयोग्य राहणार नाहीत.
- मात्र, केवळ मनगटाच्या आतील बाजूस (कोपराच्या आतून मनगटापर्यंत), हाताच्या मागील (डॉर्सल) भागावर/तळहाताच्या उलट्या बाजूस असलेले टॅटू तसेच पारंपरिक रूढी आणि प्रथांनुसार आदिवासी समाजाचे टॅटू विचारात घेतले जाऊ शकतात.
- तथापि, उमेदवाराचा टॅटू स्वीकारार्ह आहे की नाही, याचा अंतिम निर्णय निवड केंद्राच्या अधिकारात राहील.
- स्थायी टॅटू असलेल्या उमेदवारांनी निवड चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात टॅटूचे दोन फोटो (जवळून व दूरून घेतलेले), तसेच टॅटूचा आकार व प्रकार याची सविस्तर माहिती सादर करावी.
10th Pass Job वेतन, भत्ते आणि इतर लाभ
| वर्ष | मासिक पगार | हाथात मिळेल | कॉर्पस फंड उमेदवार हिस्सा | कॉर्पस फंड सरकार हिस्सा |
| प्रथम | ३०,००० रु | २१,००० रु. | ९००० रु | ९००० रु |
| द्वितीय | ३३,००० रु | २३,१०० रु | ९९०० रु | ९९०० रु |
| तृतीय | ३६,५०० रु | २५,५५० रु | १०,९५० रु | १०,९५० रु |
| चतुर्थ | ४०,००० रु | २८,००० रु | १२,००० रु | १२,००० रु |
| चार वर्षानंतर मिळणारी | एकूण कॉर्पस रक्कम | ५.०२ लाख | ५.०२ लाख | |
| एकूण | १०.०४ लाख रु. |
विमा, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र:
अग्निवीरवायूंना भारतीय वायुदलात चार वर्षांच्या सेवा कालावधीत ₹48 लाखांचे नॉन-कॉन्ट्रिब्युटरी जीवन विमा संरक्षण दिले जाते
अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र:
सेवा कालावधीच्या शेवटी अग्निवीरवायूंना त्यांच्या सेवा कालावधीदरम्यान प्राप्त झालेल्या
कौशल्य आणि प्राविण्य पातळीचे तपशीलवार कौशल्य प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
अधिकृत वेबसाईट – https://agnipathvayu.cdac.in/
परीक्षा फी – फी नाही
पासपोर्ट फोटो
- पासपोर्ट आकाराचे अलीकडचे रंगीत छायाचित्र.
- हे छायाचित्र /फोटो उमेदवाराने काळ्या स्लेटसह / पाटीसह छातीसमोर धरून घेतलेले असावे, ज्यावर उमेदवाराचे नाव आणि छायाचित्र घेण्याची तारीख स्पष्टपणे पांढऱ्या चॉकने मोठ्या अक्षरात लिहिलेले असावे.
आवश्यक दस्तऐवज यादी
- 10 वी/मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- चरित्र प्रमाणपत्र / Character Certificate / Police Verification प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची
दिनांक 24 फेब्रुवारी 2025
10th Pass Job निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा – फेज – I :
अर्हताप्राप्त उमेदवारांना परीक्षेचे अॅडमिट कार्ड फेज – I च्या परीक्षेसाठी त्यांच्या अर्जावर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल. उमेदवारांनी अॅडमिट कार्ड व आधार कार्ड परीक्षा केंद्रावर ते घेऊन जाणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्र आणि परीक्षा तारीख संबंधित उमेदवारांना अॅडमिट कार्ड वर कळवली जाईल.
लेखी परीक्षा अभ्यासक्रम
| विषय | गुण |
| सामान्य इंग्लिश- (General English (Class 10th CBSE) | १० गुण |
| सामान्य ज्ञान – General Knowledge (Class 10th Standard) | १० |
| एकूण | २० गुण |
PFT 1 आणि PFT 2
PFT – I
1.6 किमी धावणे / रनिंग 1600 मीटर :
पुरुष उमेदवार – 6.30 मिनिटे
PFT II
PFT – I- पास झालेल्या उमेदवारांची PFT II
चाचणी होते
PFT 2
| चाचणी | वेळ | रिमार्क |
| १० पुश अप्स | १ मिनिट | रनिंगनंतर १० मी ब्रेक झाल्यावर घेतली जाते |
| १० सीट अप्स | १ मिनिट | पुश अप्स नंतर २ मिनिटे ब्रेक झाल्यावर घेतली जाते |
| २० स्क्वाटस | १ मिनिट | सीट अप्स नंतर २ मिनिटे ब्रेक झाल्यावर घेतली जाते |
Phase – III (Stream Suitability Test)
- स्ट्रीम उपयुक्तता चाचणी (SST) पात्रता चाचणी स्वरूपाची असते.
- लेखी परीक्षा आणि शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी ठराविक गुणानुक्रमाने निवड झालेल्या उमेदवारांची ही चाचणी घेतली जाईल.
- उमेदवाराने संबंधित शाखेतील प्रशिक्षण घ्यायला आणि कोणतेही काम करण्यास तयार असणे आवश्यक आहे. तसेच SST मध्ये पात्र होण्यासाठी किमान 50% एकूण गुण (15 गुण) मिळवणे अनिवार्य आहे. शाखेशी संबंधित कोणतेही विशिष्ट काम करण्यास नकार दिल्यास उमेदवाराला SST मधून अपात्र ठरवले जाईल.
- उमेदवारांच्या कामगिरीचे मूल्यमापन पुढील नमुन्याच्या आधारे केले जाईल.
हॉस्पिटॅलिटी:
- स्वयंपाकाशी संबंधित कामांमध्ये कौशल्य प्रदर्शित करणे, ज्यामध्ये मांस/भाज्या/माशांचे तुकडे करणे, स्वयंपाकघरातील उपकरणे हाताळणे, पदार्थ तयार करणे आणि अन्न सादर करणे यांचा समावेश आहे.
- स्वयंपाकघर/भोजनगृहाच्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक गरजांची माहिती असणे आणि त्याचे पालन करण्याची प्रवृत्ती व दृष्टिकोन ठेवणे.
- अन्न, पाणी आणि पेय पदार्थांची सेवा करण्याची क्षमता दर्शवणे.
- वैयक्तिक स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राखणे.
- स्वयंपाकासाठी लागणाऱ्या उपकरणांची मूलभूत माहिती असणे तसेच स्वयंपाकघरातील आग व सुरक्षितता उपाययोजनांची जाणीव असणे.
हाऊसकीपिंग:
- मजले, रस्ते झाडण्याची तसेच स्नानगृहे, संडास आणि मूत्रालये स्वच्छ करण्याची क्षमता प्रदर्शित करणे.
- गवत कापण्याची, बागेला पाणी देण्याची आणि चर खोदण्याची क्षमता दर्शवणे.
- भांडी धुण्याची क्षमता प्रदर्शित करणे.
- पुढीलपैकी कोणत्याही एका कामात कौशल्य प्रदर्शित करणे:
- कपडे धुणे आणि इस्त्री करणे.
- योग्य हात आणि डोळ्यांच्या समन्वयासह केस कापणे/केशसज्जा करणे/शँपू करणे.
- चामड्याच्या वस्तू शिवणे किंवा मोची म्हणून प्रवीणता दर्शवणे.
- शिवणकाम/कापडांचे ज्ञान/डिझाईन आणि पॅटर्न कटिंग कौशल्य दाखवणे.
फेज – Iv – वैद्यकीय तपासणी
- फेज 3 पास करणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी नियुक्ती पत्र देण्यात येईल. वैद्यकीय तपासणी हवाई दलाच्या वैद्यकीय मानकांनुसार आणि लागू असलेल्या धोरणानुसार केली जाईल.
सारांश
आजच्या या लेखात आपण खालील बाबी समजून घेतल्या –
- Agniveervayu Non-Combatant” in intake 02/2025 जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण पहिली
- पात्रता, पगार, अटी शर्थी आपण पहिल्या
- ऑफलाईन अर्ज कसा करावा हे आपण पहिले
- परीक्षा, फिजिकल फिटनेस चाचणी, फेज १- ४ आपण पहिले
- संपूर्ण निवड प्रक्रिया आपण समजून घेतली.
अग्निवीरवायू ऑफलाईन अर्ज कसा भरावा व्हिडीओ-
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
ऑफलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
बृहन्मुंबई होमगार्ड भरती २०२५ लेटेस्ट अपडेट – Homeguard Bharti
Punjab And Sindh Bank – पंजाब आणि सिंध बँकेत ४८४८० ते ८५९२० रु पगारावर नोकरीची सुवर्ण संधी ! –
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती: प्रवेशपत्र जाहीर- BMC Recruitment 2024
