Agniveer Admit Card -भारतीय सैन्य दल (Join Indian Army) ने 2025-2026 साठी आयोजित होणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स परीक्षा (CEE) साठीचे ॲडमिट कार्ड अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. ही परीक्षा 30 जून ते 10 जुलै 2025 दरम्यान देशभरातील विविध केंद्रांवर पार पडणार आहे.

Agniveer Admit Card
भारतीय सैन्य भरती 2025-26 च्या विविध पदे जसे कि, अग्निवीर (सामान्य ड्युटी), अग्निवीर (तांत्रिक), अग्निवीर (क्लार्क/स्टोअर कीपर टेक्निकल), अग्निवीर (ट्रेड्समन – 10वी उत्तीर्ण), अग्निवीर (ट्रेड्समन – 8वी उत्तीर्ण) इत्यादी पदांसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 12 मार्च 2025 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान मागविले गेले होते. नुकतीच निवडप्रक्रियेच्या पहिल्या टप्पा म्हणजे कॉमन इंटरन्स एक्झाम (CEE) पार पडली जाणार आहे या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या लॉगीनवर उपलब्ध करून दिले गेले आहेत, उमेदवारांना त्यांचे परीक्षेचे वेळापत्रक आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करता येईल.
थेट लिंक (Direct Link): [अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा]
उमेदवारांना त्यांचे ॲडमिट कार्ड पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी नोंदणी क्रमांक (Registration Number), नावनोंदणी क्रमांक (Enrollment Number) किंवा जन्मतारीख (Date of Birth) वापरून पोर्टलवर लॉगिन करावे लागेल.
✅ परीक्षा कालावधी:30 जून 2025 ते 10 जुलै 2025
✅ अर्जाची अंतिम तारीख:25 एप्रिल 2025
✅ ॲडमिट कार्ड डाउनलोड:अधिकृत पोर्टलवर उपलब्ध
✅ लॉगिनसाठी आवश्यक माहिती:नोंदणी क्रमांक / नावनोंदणी क्रमांक / जन्मतारीख
उमेदवारांनी वेळेवर पोर्टलवर जाऊन आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेसाठी केंद्रावर ॲडमिट कार्ड आणि ओळखपत्र घेऊन जाणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत Join Indian Army वेबसाइटला भेट द्या.
अन्य ब्लॉगपोस्ट:
इंडिया पोस्ट GDS चौथी मेरिट लिस्ट 2025 जाहीर – राज्यानुसार पात्र उमेदवारांची यादी पहा – GDS 2025
भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती – 2025 मध्ये सुवर्णसंधी!- Indian Coast Guard Bharti 2025
