Bangladesh Airforce Plane Crash – बांगलादेशच्या वायुदलाचं एक चीनी बनावटीचं F-7 BGI प्रशिक्षण विमान सोमवारी ढाकामधील उत्तरा परिसरात माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात कमीत कमी १९ जणांचा मृत्यू झाला असून, १६० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विमानाचा वैमानिक देखील समाविष्ट आहे.

Bangladesh Airforce Plane Crash
बांगलादेशी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “हे प्रशिक्षण विमान दुपारी १:०६ वाजता उड्डाणासाठी निघालं आणि काही क्षणांतच ते शाळेच्या आवारात कोसळलं.”
आग आणि गोंधळ
जवळच्याच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “विमान प्रचंड आवाजासह कोसळलं आणि तत्काळ त्याला आग लागली.” दुर्घटनेनंतर घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या, अॅम्ब्युलन्सेस आणि वायुदलाचे हेलिकॉप्टर दाखल झाले.
शाळा सुरू असतानाच दुर्घटना
माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजचे प्रवक्ते शाह बुल्कुल यांनी एका लोकल टीव्ही न्यूज ला सांगितलं कि, “विमान शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ कोसळलं. त्यावेळी वर्ग सुरू होते आणि विद्यार्थी आत होते. जखमींना एकामागून एक बाहेर काढलं जात आहे.”
साहाय्य आणि रुग्णालयात दाखल
ढाका ट्रिब्यूननुसार, ५० हून अधिक जखमींना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बहुतांश जखमी हे विद्यार्थी आहेत, मात्र त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
प्राथमिक माहिती
फायर सर्व्हिस कंट्रोल रूमच्या ड्युटी ऑफिसर लिमा खानम यांनी bdnews24 ला सांगितले की, “आमच्या पथकाने एक मृतदेह बाहेर काढला असून, वायुदलाने चार जखमींना तातडीने रेस्क्यू केलं आहे.”
संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपशीलवार तपास सुरू आहे.
Bangladesh Airforce Plane Crash बद्दलची समाज माध्यमावरील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
