मुंबई | २५ ऑगस्ट २०२५ : राज्य शासनातील नोकरवर्गासाठी आनंदाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. येत्या श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच निवृत्तीधारकांचा ऑगस्ट महिन्याचा पगार व पेन्शन पाच दिवस आधीच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सामान्यतः सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळते. मात्र यंदा श्रीगणेशोत्सवाचा प्रारंभ लवकर होत असल्याने शासनाने विशेष शासन निर्णय (जीआर)काढून, २६ ऑगस्ट २०२५ रोजीच वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती
ऑगस्ट महिन्याचा पगार व पेन्शन पाच दिवस आधीच देण्याच्या निर्णय शासनानची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रपरिषदेत दिली. तसेच त्यांनी समाज माध्यम “X” (पूर्वीचे ट्विटर) वरून देखील अधिकृत घोषणा केली आहे.
पवार म्हणाले, “शासन नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हिताकडे लक्ष देते. सण-उत्सवाच्या काळात कोणालाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठीच आगाऊ वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
या निर्णयामुळे लाखो सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी श्रीगणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा होईल अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Ajit Pawar यांची समाज माध्यम साईट “X” वरील प्रतिक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
