पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP Party) अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज जाहीर केले की, आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) हे दोन्ही पक्ष पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्र लढणार आहेत. अजित पवार यांनी आज प्रचारसभेत भाषण करताना सांगितले, “पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी अंतिम करताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपलं कुटुंब एकत्र आलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काही निर्णय घ्यावेच लागतात, आणि हा निर्णय त्याच पद्धतीने घेतला आहे. जागावाटपाबाबतही स्थानिक नेत्यांशी चर्चा चालू असून लवकरच ती घोषणा करण्यात येईल.” या घोषणेनंतर पिंपरी-चिंचवडमधील निवडणुकांचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या शुभारंभी अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक १ आणि १२ मध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Party) च्या अधिकृत उमेदवरांसाठी केला प्रचार
प्रभाग १ मधील सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Party) अधिकृत उमेदवार सौ. साधना नेताजी काशिद, कु. यश दत्ताकाका साने, सौ. संगीत प्रभाकर ताम्हाणे आणि श्री. विकास नामदेव साने यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
तर प्रभाग १२ मधील प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, “पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, रोजगार, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर आम्ही ठोस काम करणार आहोत. शहराला आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सुरक्षित बनवण्यासाठी दृढ नेतृत्व आणि नवीन उत्साही नेतृत्व यांचा संगम गरजेचा आहे. नागरिकांनी आमच्या कार्यक्षम उमेदवारांवर विश्वास ठेवावा.”
अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारावर आधारित सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन दिले. त्यांनी शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि नागरिकांना “पिंपरी चिंचवडच्या उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या,” असे आवाहन केले..
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
