महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, “अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला आहे.” “ही भरून न निघणारी हानी आहे” आपल्या प्रतिक्रियेत शरद पवार पुढे म्हणाले की, “जे काही नुकसान झालं आहे ते कधीही भरून निघणारं नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.” अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी नेतृत्व मानले जात होते. अर्थमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सामान्य जनतेमध्येही तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. “या अपघातामागे राजकारण नाही” माध्यमांमध्ये या अपघाताबाबत विविध तर्कवितर्क सुरू असतानाच शरद पवार यांनी ठाम भूमिका मांडली.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बद्दल बोलताना Sharad Pawar पुढे म्हणाले
“मी आज मीडियासमोर येणार नव्हतो. मात्र काही माध्यमांमध्ये या अपघातामागे राजकारण असल्याचा आरोप कलकत्त्यावरून करण्यात आला, अशी माहिती मिळाली.” यावर स्पष्ट भूमिका मांडताना त्यांनी सांगितले, “या घटनेत कोणतेही राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सर्वांना आहेत. कृपया या दु:खद घटनेत राजकारण आणू नये.”
राज्यभरातून शोकभावना
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकसंदेशांचा पूर आला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली अर्पण करत आहेत. महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे.
राजकीय इतिहासातील मोठी पोकळी
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आक्रमक नेतृत्व, स्पष्ट निर्णयक्षमता आणि प्रशासनावरील पकड यामुळे ते राज्यातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जात होते.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भावनिक प्रतिक्रियेतून या घटनेची तीव्रता स्पष्टपणे जाणवते. वैयक्तिक नातेसंबंध, राजकीय सहवास आणि दीर्घ सार्वजनिक जीवन यामुळे हा धक्का त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचे दिसून येते.
समाज माध्याम्वरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
