Alcaraz : “Australian Open Final साठी मी जे काही लागेल ते करणार” – पाच तासांच्या ऐतिहासिक लढतीनंतर कार्लोस अल्कराजचा निर्धार !

Vishal Patole

Australian Open 2026 मध्ये टेनिसप्रेमींना इतिहासातील सर्वात थरारक उपांत्य फेरी पाहायला मिळाली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या Carlos Alcaraz याने जर्मनीच्या Alexander Zverev विरुद्ध तब्बल ५ तास २७ मिनिटे चाललेल्या महासामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. Rod Laver Arena मध्ये रंगलेल्या या सामन्याने AO Open च्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. ही लढत आतापर्यंतची Australian Open मधील सर्वात लांब उपांत्य फेरी ठरली. Alcaraz vs Zverev हि लढत थराराने भरलेली पाच सेट्सची लढत ठरली. या ऐतिहासिक सामन्यात कार्लोस अल्कराजने 6-4, 7-6(5), 6-7(3), 6-7(4), 7-5 असा विजय मिळवला. संपूर्ण सामना दोन्ही खेळाडूंनी उच्च दर्जाच्या टेनिसने गाजवला. विशेषतः पाचव्या सेटमध्ये दोघांनीही शरीराच्या मर्यादा ओलांडत अप्रतिम खेळ सादर केला. Alexander Zverev ने चौथ्या सेटपर्यंत सामना पूर्णपणे बरोबरीत आणला होता. पाचव्या सेटमध्ये अल्कराज 3-5 असा पिछाडीवर असतानाही त्याने जबरदस्त पुनरागमन करत सामना आपल्या नावावर केला.

Australian Open

Australian Open : Carlos Alcaraz Vs Alexander Zverev सामन्यादरम्यान दुखापतीशी झुंज

Australian Open मधील कार्लोस अल्कराज विरुद्ध अलेक्झांडर झ्वेरेव्ह या थरारक सामन्यात अल्कराजला गंभीर शारीरिक अडचणींचा सामना करावा लागला. तिसऱ्या सेटच्या अखेरीस त्याच्या उजव्या पायाच्या वरच्या भागात, म्हणजेच adductor muscle मध्ये दुखापतीची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे काही काळ तो नीट धावू शकत नव्हता आणि त्याच्या हालचालींवर स्पष्ट मर्यादा आल्या. चौथ्या सेटमध्ये अल्कराज वेदनांशी झुंज देताना दिसत होता; प्रत्येक पॉइंटसाठी त्याला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत होती. मात्र अंतिम सेटमध्ये त्याने जबरदस्त इच्छाशक्ती दाखवत पुन्हा गती मिळवली. दुखापतीवर मात करत त्याने आक्रमक खेळ साकारला आणि झ्वेरेव्हवर मानसिक दबाव निर्माण करत अखेर सामना आपल्या नावावर केला. हा सामना अल्कराजच्या जिद्द, संघर्ष आणि लढाऊ वृत्तीचे उत्तम उदाहरण ठरला.

 “Final साठी जे काही लागेल ते करेन” – Alcaraz

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अल्कराज म्हणाला : “Obviously I feel tired. पाच तासांहून अधिक वेळ चाललेल्या सामन्यानंतर शरीर थकलेलं आहे, हे स्वाभाविक आहे. पण Final साठी मी जे काही लागेल ते करणार आहे.” तो पुढे म्हणाला,  “Ice bath, physiotherapy, recovery treatment — माझं शरीर शक्य तितकं चांगलं करण्यासाठी सध्या जे काही शक्य आहे ते सगळं करतोय. आशा आहे की ही दुखापत गंभीर नसेल.”

Australian Open Final कडे लक्ष

 रविवारी होणाऱ्या Australia Open Final मध्ये अल्कराजचा सामना Jannik Sinner किंवा Novak Djokovic यांच्याशी होणार आहे.

जर अल्कराजने हा सामना जिंकला तर तो —

  • Career Grand Slam पूर्ण करणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू ठरेल
  • Australian Open हे त्याचे पहिलेच विजेतेपद असेल
  • यामुळे संपूर्ण टेनिस जगताचे लक्ष या अंतिम सामन्याकडे लागले आहे.
  • अल्कराजची ऐतिहासिक कामगिरी
  • पाचव्या सेटमधील रेकॉर्ड: 15 विजय – 1 पराभव
  • सर्व चार Grand Slam स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा
  • इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू
  • आतापर्यंत 6 Grand Slam Title

ही कामगिरी त्याला आधुनिक टेनिसमधील सर्वात भयानक प्रतिस्पर्ध्यांपैकी एक बनवते.

 “मी कधीही हार मानत नाही”

अल्कराज

भावनिक शब्दांत अल्कराज म्हणाला:

 “लहानपणी अनेक सामने असे होते जिथे मी लढणं सोडून दिलं होतं. पण आता मी परिपक्व झालो आहे. वेदना सहन करून जरी एक सेकंद जास्त लढता आलं तरी ते नेहमीच फायदेशीर ठरतं.”

 “म्हणूनच मी शेवटच्या बॉलपर्यंत लढतो आणि प्रत्येक परिस्थितीत परत येऊ शकतो यावर विश्वास ठेवतो.”

Tennis चाहत्यांसाठी ऐतिहासिक क्षण

Alcaraz vs Zverev ही लढत केवळ उपांत्य फेरी नव्हती, तर आधुनिक tennis मधील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक ठरली आहे. AO Open 2026 मधील हा सामना पुढील अनेक वर्षे टेनिस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत