Badass Ravikumar – बॅडास रवी कुमार: एक दमदार म्युझिकल अॅक्शन चित्रपट

Vishal Patole
Badass Ravikumar

Badass Ravikumar बॅडास रवी कुमार हा आगामी हिंदी म्युझिकल अॅक्शन चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन कीथ गोम्स यांनी केले असून हिमेश रेशमिया मेलोडीजने निर्मिती केली आहे. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या द एक्सपोज या चित्रपटाचा स्पिन-ऑफ आहे, विशेष म्हणजे म्युझिक डायरेक्टर हिमेश रेशमिया प्रथमच प्रेक्षकांना वेगळ्या आणि प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हिमेश रेशमिया बॅडास रवी कुमार Himesh Reshammiya Badass Ravikumar

चित्रपटाची विशेषता म्हणजे हिमेश रेशमिया हे नामवंत म्युझिक डायरेक्टर या चित्रपटाची निर्मिती सह लेखन, संगीत इत्यादी विभाग स्वत: सांभाळत असतानाच चित्रपटातील प्रमुख कलाकाराची भूमिका देखील तेच साकारत आहेत त्यामुळे त्यांच्या या बहुरूपी गुणांची त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून. मागील काळात धुमाकूळ घालणारा ANIMAL चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटातील काही सीन खतरनाक दिसत आहेत. त्यामुळे मेलोडी संगीत रचना करणारे हिमेश रेशमिया एका वेगळ्याच रुपात या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहेत.

Badass Ravikumar Trailer – बॅडास रवी कुमारचा ट्रेलर

हिमेश रेशमियाच्या या चित्रपटाचा ओफिशियाल ट्रेलर नुकताच निर्माता कंपनी हिमेश रेशमिया मेलोडीजद्वारे सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

कलाकार तांत्रिक टीम – Badass Ravikumar Movie

चित्रपटात हिमेश रेशमियासह प्रभू देवा, कीर्ती कुल्हारी, सोनिया कपूर, सौरभ सचदेवा, संजय मिश्रा आणि जॉनी लिव्हर यांसारखे प्रतिभावान कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. संगीत हिमेश रेशमिया यांनी दिले असून गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. चित्रपटाची संकलना रमेश्वर एस. भगत यांनी केली आहे.

चित्रपट निर्मिती व शूटिंग

बॅडास रवी कुमार ची घोषणा नोव्हेंबर 2022 मध्ये झाली आणि सप्टेंबर 2023 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. फेब्रुवारी 2024 मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. चित्रपटाचे शूटिंग भारत आणि परदेशातील विविध लोकेशन्सवर करण्यात आले आहे.

संगीताचा जादू

हिमेश रेशमिया यांनी चित्रपटासाठी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. गाण्यांचे बोल मयूर पुरी, समीर अंजान आणि हिमेश रेशमिया यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचा साउंडट्रॅक 6 जानेवारी 2025 रोजी रिलीज झाला, जो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.

Badass Ravikumar

Cast of Badass Ravikumar

दिग्दर्शककीथ गोम्स
संवादबंटी राठोड
लेखककुशल वेद बक्षी, हिमेश रेशमिया
निर्मातेहिमेश रेशमिया
प्रिया पटेल
सना अन्दानी
हिमांशू शर्मा
कुणाल श्रीवास्तव
एम.पी. सिंग
राजेंद्र तोरस्कर
मनोज श्रीवास्तव
मुख्य कलाकाहिमेश रेशमिया
सनी लिओनी
प्रभू देवा
कीर्ती कुल्हारी
संजय मिश्रा
जॉनी लिव्हर
संगीतहिमेश रेशमिया
छायाचित्रणमनोज सोनी
निर्मिती संस्थाहिमेश रेशमिया मेलोडीज
भाषाहिंदी
बजेट₹20 कोटी

Badass Ravikumar Budget

बॅडास रवी कुमार या चित्रपटाचे एकूण अंदाजे बजेट जवळ पास २० कोटी रुपये सांगण्यात आले आहे.

Badass Ravikumar Release Date – प्रदर्शन व व्यावसायिक यश

चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी थेट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाने आधीच आपला ₹20 कोटींचा उत्पादन खर्च वसूल केला आहे. संगीत हक्कांमधून ₹16 कोटी आणि अनुदानातून ₹4 कोटी मिळाले आहेत. हिमेश रेशमियाने पारंपरिक फी न घेता नफ्याच्या वाट्यावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

सारांश

बॅडास रवी कुमार हा म्युझिकल अॅक्शन शैलीत एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे. दमदार संगीत, उत्कृष्ट अभिनय आणि रंजक कथा यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक पर्वणी ठरेल, अशी अपेक्षा आहे.

आमच्या मनोरंजन विषयक ब्लॉगसाठी येथे क्लिक करा.

ट्रेलर साठी येथे क्लिक करा.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत