जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे नॉर्वेच्या ख्रिश्चन कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते एरिक सेले यांनी (Bangladesh) बांगलादेशातील सध्याच्या स्थितीवर गंभीर विधान करत आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आहे. एरिक सेले म्हणाले की, “बांगलादेशात सध्या काळजीवाहू सरकार आहे. माझे आवाहन आहे की पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी देशावर नियंत्रण ठेवून अतिरेकी शक्तींना आळा घालावा. बंगाली जनता अतिशय सुंदर आणि शांततेत जगणारी आहे. पण जेव्हा अतिरेकी शक्ती बळकट होतात, तेव्हा दुष्ट शक्तींचे वर्चस्व वाढते, अगदी पाकिस्तानसारखेच.” ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सद्यस्थितीवरील आपले प्रखर मत मांडले.

(Bangladesh) बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्याकांवरील अन्याय
सेले यांनी पुढे सांगितले की, स्त्रियांचे हक्क आणि मानवाधिकारांचा जागतिक पातळीवर विचार होणे अत्यावश्यक आहे. त्यांनी खंत व्यक्त केली की, “(Bangladesh)बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यावर अन्याय होत आहे. विशेषतः हिंदू धर्मावर मोठे आघात झाले आहेत. हे नवीन नाही, कारण बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातही पाकिस्तानी सैन्याने जाणूनबुजून हिंदू समाजावर हल्ले केले होते. आता २०२५ मध्ये आपण पुन्हा इतिहासाची भीषण पुनरावृत्ती होऊ देऊ शकत नाही.”
संयुक्त राष्ट्रसंघावर आरोप
आपल्या भाषणात ते संयुक्त राष्ट्रसंघावरही कठोर टीका करत म्हणाले की, “यूएन निष्क्रिय आहे. हिंदू, ख्रिश्चन आणि स्त्रियांवर अत्याचार होत असतानाही योग्य पावले उचलली जात नाहीत. अनेक देशांमध्ये छळ हा सर्रास चालतोय, परंतु सरकार त्यावर कारवाई करत नाहीत. जर संयुक्त राष्ट्रसंघ काम करणार नसेल, तर नव्या पद्धतीचे जागतिक संघटन उभारले पाहिजे जे खऱ्या अर्थाने मानवतेच्या बाजूने उभे राहील. आता वेळ आली आहे की यूएनने स्वतःला सुधारावे किंवा ‘गुडविल असलेल्या देशांनी’ नवे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करावे.”
संवाद आणि ऐक्याची गरज
सेले यांनी हेही स्पष्ट केले की ते भारतातील हिंदू नेते आणि मुस्लिम नेत्यांसोबत संवाद साधत आहेत, जेणेकरून परस्पर समज वाढेल आणि धार्मिक सौहार्द जपले जाईल. ते म्हणाले, “हा संघर्ष थांबविण्यासाठी आपल्याला सर्व धर्मीयांमध्ये संवाद आणि ऐक्याची नींव मजबूत करावी लागेल.”
जिनिव्हामध्ये दिलेल्या या वक्तव्यामुळे (Bangladesh) बांगलादेशातील परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः अल्पसंख्याक हक्क, स्त्री सुरक्षा आणि संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
समाज माध्यम साईट “x” वरील सेले यांचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
