(Bangladesh) बांग्लादेशमध्ये सध्या भयंकर दंगली आणि संघर्ष सुरू असून कमीत कमी १४ लोक ठार आणि अनेक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बांग्लादेशच्या राजधानी ढाकामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना सुरु आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ताणतणाव आणि हिंसा वाढली आहे. या हिंसेची सुरुवात पाकिस्तान आणि अमेरिकेने समर्थन दिलेल्या यूनुस सरकारच्या समर्थकांनी आणि लोकशाहीच्या मागण्या करणाऱ्या तरुणांमध्ये झाली आहे. स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आश्रू गॅसचा वापर करीत आहे आणि गोळीबारही सुरू आहे. यावेळी यूनुस सरकारचे अधिकृत प्रतिनिधी देशातील परिस्थिती नियंत्रित करू शकलेले नाहीत. बांगलादेशाचा सध्याचा माहोल अत्यंत गोंधळाचा आहे, ज्यामध्ये अनेक ठिकाणी झुंडशाही सुरु असून जाळपोळ सुरु आहे आणि रस्ते बंद करण्यात आले आहेत.

Bangladesh मधील कट्टरवाद्यांकडून सर्व सामन्यांवर होत आहेत अत्याचार
बुरका घातला नाही म्हणून ख्रिश्चन महिलेला मारहाण
Imtiaz Mahmood ट्विटर युजरने आपल्या @ImtiazMadmood या अकौंट वरून ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ नुसार व्हिडिओमध्ये दिसून आले आहे की, कॉक्स बाजारच्या समुद्रकिनार्यावर काही धर्मांध मुस्लिम युवकांनी एका ख्रिश्चन आदिवासी स्त्रीवर हिजाब न घातल्याप्रकरणी जबरदस्त मारहाण केली आहे. त्यानंतर त्या महिलेला उठ बैठका करण्याची शिक्षा दिली आहे. या वेळी जमा असलेला जमाव या घटनेचे समर्थन करताना देखील दिसले. अशा घटनेने धार्मिक तसेच सामाजिक तणाव अधिक वाढवले आहेत.
गरीब हिंदू शेतकऱ्याच्या शेताला लावली आग
बांग्लादेशच्या चट्रग्राम जिल्ह्यातील पाटिकछरी येथे इस्लामी कट्टरपंथी राजकीय हिंसाचार करताना एका हिंदू शेतकऱ्याच्या भाताच्या शेताला आग लावली. त्या कुटुंबाचे संपूर्ण उपजीवन त्या शेतावर अवलंबून आहे आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. बांग्लादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांसाठी न्याय नाही, अशी तक्रार या घटनेने पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे.
Bangladesh मध्ये नागरी युद्धासारखी परिस्थिती
Bangladesh – देशात सध्या नागरिक युद्धासारखी स्थिती निर्माण झाली असून, पाकिस्तान-आणि अमेरिकेच्या समर्थक मोहम्मद यूनुस यांच्या फौज आणि लोकशाही समर्थक तरुणांमध्ये कडक संघर्ष सुरू आहे. अधिकृत वृत्तांनुसार ५० पेक्षा अधिक लोक मारले गेले असून शासनाद्वारे त्याची माहिती लपवण्यात येत आहे.
सैन्य आणि पोलीस करतेय शेख मुजीबुर रहमान यांच्या घराचे रक्षण
Bangladesh ढाकातील शेख मुजीबुर रहमान यांच्या निवास स्थानासमोरही मोठ्या प्रमाणात सैन्य आणि पोलीस तैनात करण्यात आले असून विद्यार्थी आंदोलकांनी या वास्तूचा पूर्णपणे विध्वंस करण्याची मागणी केली आहे, तेथे फुटबॉल मैदान तयार करायचे आहे असे त्यांच्या दाव्यांमध्ये स्पष्ट केले गेले आहे. हे आंदोलन सुरुवातीपासून आज रात्रीपर्यंत सुरक्षा दलांशी दगडफेकीसह संघर्ष सुरू आहे.
समाज माध्यमावरील प्रतीक्रेयेंसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
