महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था Barti (बार्टी) मार्फत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील आणि अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI) यामार्फत विशेषतः मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने उमेदवारांची निवड करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येत असते . या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाढविण्यात आली होती पूर्वी हि तारीख 20 ऑगस्ट 2025 होती ती वाढवून 28 ऑगस्ट 2025 केली गेली होती. तसेच ओ बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती तर ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सारथी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक आज म्हणजे 28 ऑगस्ट 2025 दिली आहे.

बार्टी, RTI-RTI, सारथी, महाज्योती आणि ARTI या संस्थांमार्फत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी विविध प्रकल्प, योजना आणि स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची जाहिरात दि. 29 जुलै 2025 व दि. 30 जुलै 2025 रोजी ARTI च्या संकेतस्थळावर तसेच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.
या अंतर्गत इच्छुक उमेदवारांना प्रारंभी 20 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 28 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तसेच, अर्ज प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी 29 व 30 ऑगस्ट 2025 या दोन दिवसांच्या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या अर्जातील ठराविक बाबी दुरुस्त करण्याची तसेच अर्जाची प्रिंट काढण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) – Barti, पुणे आणि ए.आर.टी. या संस्थांमार्फत राज्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी दरवर्षी पोलीस व सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असतो. प्रशिक्षणासाठी अर्जदारांची निवड एका सामायिक पूर्व चाचणी (CET) च्या माध्यमातून केली जाते. पोलीस व सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व निवासी प्रशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यानी या सामायिक चाचणीसाठी अगोदर अर्ज करणे आवश्यक असून, फक्त ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज केले जाऊ शकतात.

Barti प्रशिक्षण
बार्टी व ए.आर.टी.आय. या संस्था त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी विविध प्रकल्प, योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असतात. या अंतर्गत राज्यातील युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांची अंमलबजावणी करून, त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळावी हा उद्देश आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांत प्रवेश सामाजिक प्रवेश परीक्षा (CET) मार्फत होणार असून, गुणांकन पद्धतीनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, अर्ज करण्यासाठी संस्थेची अधिकृत संकेतस्थळ http://barti.maharashtra.gov.in येथे भेट द्यावी. तेथील दिलेल्या लिंकवरूनच अर्ज भरावेत.
प्रशिक्षणासाठी आवश्यक पूर्व परीक्षेसाठी नोंदणी दिनांक
| ऑनलाईन नोंदणीची सुरुवात | 1 ऑगस्ट 2025 |
| नोंदणीची शेवटची तारीख | 28 ऑगस्ट 2025 |
| अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख | 28 ऑगस्ट 2025 |
| अर्ज दुरुस्ती | दि. 29 व 30 ऑगस्ट 2025 |
BARTI ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा.
ARTI च्या ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा.
SARTHI च्या ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा.
MAHAJYOTI च्या ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा.
संपर्क व मदत
- तांत्रिक हेल्पडेस्क: cethelpdesk2025@gmail.com | ०२२-६५९३४००१ (सोम–शनि, सकाळी १० ते सायं ६)
- सामान्य हेल्पडेस्क: bartihelpdesk@gmail.com | ०२०-२६३३३३३०, २६३३३३३९, २६३४३६०० (सोम–शुक्र, सकाळी १० ते सायं ६)
ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- दहावीची मार्कशीट / प्रमाणपत्र
- बारावीचे मार्कशीट / प्रमाणपत्र
- पदवी (मार्क मेमो ) (प्रशिक्षणानुसार आवश्यक असल्यास)
- जातीचा दाखला
- मागील तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
- डोमिसाईल प्रमाणपत्र.
- पासपोर्ट फोटो
- सही
- मोबाईल
- इमेल आय. डी.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
IBPS ग्राहक सेवा सहयोगी (CSA-XV) भरती 2025- संपूर्ण माहिती
AIIMS NORCET‑9 – Nursing Officer भरती
(IB Recruitment) इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 जागांसाठी मेगाभरती
