Bihar Election 2025 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या गया येथे १३,००० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण किंवा शिलान्यास करतांना आनंद व्यक्त केला. यात NH-31 च्या बख्तियारपूर-मोकामा भागाचा चार लेन रस्ता, बक्सर थर्मल पॉवर प्लांट, आणि काही सेवेरेज ट्रीटमेंट प्लांट्स तसेच सेवेरेज नेटवर्क यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, एनडीए सरकार बिहारच्या सर्वदिशात्मक विकासासाठी पूर्णपणे प्रतिबद्ध आहे. संपूर्ण देशात गेल्या अकरा वर्षांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेखाली ४ कोटींहून अधिक घरांची निर्मिती झाली आहे, त्यापैकी बिहारमध्ये सुमारे ३८ लाख लोकांना घरकुल मिळाले आहे. त्यांनी ठामपणे म्हटले की, प्रत्येक गरीब व्यक्तीला घर मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही.

मोदींचे भाषण आणि Bihar Election 2025
पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचीही चर्चा केली तसेच काँग्रेसवर आरोप करत म्हटले की, काँग्रेसला बिहारबद्दल द्वेष असल्यामुळे त्यांनी सदैव बिहारशी अन्याय केला आहे. बिहारच्या युवकांसाठी केंद्र सरकारच्या नवीन योजनेमुळे पक्क्या सरकारी नोकऱ्यांचा फायदा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, ‘प्रधानमंत्री शिक्षित भारत योजना’ देखील सुरू केली आहे, ज्यामध्ये युवकांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी मिळाल्यास केंद्र सरकार १५,००० रुपये देणार आहे.
भ्रष्टाचारमुक्त शासन -Bihar Election 2025
Bihar Election 2025 च्या पार्श्वभूमीवर, पुढे बोलताना त्यांनी भाजपकडून २०१४ नंतर सुरू असलेल्या जनसेवेचे महत्त्व अधोरेखित केले आणि आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसल्याचा दम धरला. भ्रष्टाचारविरोधी कायद्याबाबत बोलताना, त्यांनी स्पष्ट केले की सामान्य कारकुनाला ५० दिवसाची शिक्षा झाल्यास नोकरी जाते, पण उच्चस्तरीय नेते जेलमध्ये असूनही सरकार चालवू शकतात, म्हणून संसदेत असा कायदा मांडला आहे, ज्यात पदावर असेलेल मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री ३० दिवसांच्या आत जामीन मिळवण्यास अपयशी झाल्यास त्यांना पद सोडावे लागेल आणि जेल मधून सरकार चालवता येणार नाही. मात्र काँग्रेस, आरजेडी आणि लेफ्ट पक्ष या कायद्याचा विरोध करत आहेत, कारण त्यांच्यावर अनेक खटले चालू आहेत, भ्रष्टाचारात बरबटलेल्या या लोकांना आपले भविष्य अंधारात दिसत आहे म्हणून ते प्रखरतेने या कायद्याचा विरोध करत आहेत असे म्हणाले.
पीएम मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा देशावरील धोक्याकडे लक्ष वेधले !
पंतप्रधानांनी देशातील घूसखोरांविरोधातील रणनितीबाबत सांगितले की, देशातील सर्व सुविधा भारतीय नागरिकांसाठी आहेत आणि घूसखोरांचा या सुविधांवर कुणताही हक्क नाही. ते म्हणाले की, “आम्ही प्रत्येक घूसखोरांना भारताच्या बाहेर काढणार आहोत.” यामुळे बिहारच्या लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नितीश कुमार यांच्यासोबत सहकार्य करत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
स्वराज पॉल (Swaraj Paul) यांचे निधन; नरेन्द्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले !
