महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील ब्लू एनर्जी मोटर्स (Blue Energy Motors) च्या उत्पादन केंद्रात भारताचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रिक हेडी-ड्युटी कार्गो ट्रक लाँच केला. हा ५५ टन वजनक्षमता असलेला अत्याधुनिक ट्रक ‘बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजी’सह सुसज्ज असून, केवळ दोन मिनिटांत बॅटरी बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रकल्पाचा उद्देश औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण कमी करणे आणि वाहतुकीचा खर्च घटवणे हा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ब्लू एनर्जी मोटर्सने पुढील पाच वर्षांत ३०,००० ट्रक निर्मितीचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निमित्ताने भारतातील पहिला “इलेक्ट्रिक फ्रेट कॉरिडॉर” मुंबई-पुणे दरम्यान सुरू केला. या कॉरिडॉरवर आधुनिक चार्जिंग आणि स्वॅपिंग स्टेशनची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्याच्या स्वावलंबी आणि हरित वाहतूक धोरणाला मोठी गती मिळेल.

Blue Energy Motors च्या इलेक्ट्रिक हेव्ही -ड्युटी कार्गो ट्रक बद्दल फडणवीस म्हणाले कि हि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीतील “टेस्ला मोमेंट”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Blue Energy Motors च्या इलेक्ट्रिक हेव्ही -ड्युटी कार्गो ट्रकची उद्घाटनाची माहिती समाज माध्यमावर शेअर करताना फडणवीस म्हणाले, ही भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीतील “टेस्ला मोमेंट” ठरणार आहे. सार्वजनिक वाहतुकीचे विद्युतीकरण झपाट्याने होत असताना, मालवाहतूक वाहनेही हरित तंत्रज्ञानाकडे वळविण्याची आवश्यकता होती. ब्लू एनर्जी मोटर्सने हे स्वप्न साकार करत ‘मेक इन इंडिया’ मिशनला नवा आयाम दिला आहे.
हा प्रवास दावोस येथे केलेल्या सामंजस्य करारापासून सुरू झाला होता आणि आज ते वास्तवात उतरले आहे. बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान हे भारताच्या ईव्ही क्षेत्रासाठी क्रांतिकारी पाऊल ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकार मुंबई-पुणे महामार्गावरील इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणखी बळकट करणार आहे. २०३० पर्यंत विजेच्या एकूण निर्मितीपैकी ५२ टक्के ऊर्जा नूतनीकरणीय स्रोतांमधून आणि २०३५ पर्यंत ती ७५-८० टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ब्लू एनर्जी मोटर्सच्या सर्व अभियंते, डिझाइनर्स आणि कामगारांचे अभिनंदन करत त्यांच्या योगदानामुळे भारताची शाश्वत वाहतूक आणि स्वच्छ ऊर्जा क्रांती अधिक वेगाने पुढे जाईल, असे सांगितले.
Blue Energy Motors ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
