बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC Election) २०२५–२६: मतमोजणीला आज सकाळी १० वाजता सुरुवात; २३ केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

Vishal Patole

BMC Election – बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) सत्ता हे महाराष्ट्र आणि मुंबईतल्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. गेल्या तीन दशकांपासून शिवसेना आणि तिच्या नेत्यांची महानगरपालिकेवर मजबूत पकड राहिली आहे. मात्र २०२६ च्या BMC निवडणुकीत राजकीय समीकरण बदलल्याने आणि त्यातूनच राज – उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप – शिंदे गट यांच्यात वर्चस्व आणि प्रतिष्ठेची युद्धभूमी म्हणून BMC Election कडे पहिले जात आहे. म्हणूनच BMC चा म्हणजेच एकंदरीत मुंबई चा नवीन किंग कोण ? याची चर्चा सर्वत्र रंगलेली दिसत आहे. याचे उत्तर आज जनतेला मिळणार आहे. कारण नुकत्याच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Election) सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही मतमोजणी मुंबईतील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एकूण २३ मतमोजणी कक्षांमध्ये होणार असून, यासाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) दिलेल्या माहितीनुसार, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ही मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण केली जाणार आहे.

BMC Election

BMC Election मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेवर विशेष लक्ष

 मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून आवश्यक तेवढा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, प्रवेश नियंत्रण व्यवस्था, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

 सविस्तर नियोजन आणि कर्मचारी नियुक्ती

मतमोजणी प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाने सखोल तयारी केली आहे.

मतमोजणीसाठी:

  • ७५९ पर्यवेक्षक
  • ७७० सहाय्यक
  • ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारीयांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना यापूर्वीच आवश्यक ते पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी-कर्मचारी नेमणूक, सुरक्षा नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, तसेच आपत्कालीन सेवांचा सविस्तर आढावा घेऊन अंतिम आराखडा निश्चित करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक नियंत्रण व वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून, त्यांना आवश्यक माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल आज

 दरम्यान, महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यभरातील ८९३ वॉर्डांमधून तब्बल १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीतून ठरणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार असून, दुपारनंतर प्राथमिक कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालांकडे

मुंबई महानगरपालिका निवडणूक ही राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असल्याने, आजच्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि मतदार निकालांची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत