BMC Recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) विविध अभियांत्रिकी संवर्गातील ६९० जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज मागविले गेले होते त्या अंतर्गत विविध पदांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी परीक्षा दिनांक आणि प्रवेशपत्राबाबत सविस्तर माहिती खाली दिली आहे.
BMC Recruitment 2024 परीक्षा दिनांक:
| पदाचे नाव | परीक्षा दिनांक |
| दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | ९ फेब्रुवारी २०२५ |
| कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | २ मार्च २०२५ |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ३ आणि ८ मार्च २०२५ |
| दुय्यम अभियंता (स्थापत्य) | ९ मार्च २०२५ |

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक:
प्रवेश पत्र मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
BMC Recruitment 2024 परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती:
परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
उमेदवारांनी वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून परीक्षा केंद्रावर नेणे बंधनकारक आहे.
परीक्षा केंद्रावर ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स) बरोबर नेणे गरजेचे आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ
अधिक माहितीसाठी बि. एम. सी. चे अधिकृत पोर्टल- http://portal.mcgm.gov.in आहे
संपर्क माहिती:
उमेदवारांना प्रवेशपत्र किंवा परीक्षेबाबत काही शंका असल्यास महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी किंवा संबंधित भरती विभागाशी संपर्क साधावा.
उमेदवारांनी वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षेसाठी तयारी करावी. सर्व उमेदवारांना शुभेच्छा!
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024: परीक्षेच्या तारखा जाहीर, प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध
AFCAT 2025: भारतीय हवाई दलाच्या भरतीसाठी प्रवेश पत्र जारी
महिला व बालविकास विभागाच्या ICDS Bharti 2024 ची परीक्षा व प्रवेश पत्र जाहीर ! – ICDS Bharti 2024
