मुंबई : महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसह दादरा व नगर हवेली, दमण व दीव केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय म्हणून कार्यरत असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) २०२५ मध्ये Bombay High Court Recruitment मेगाभरतीची घोषणा केली असून, एकूण २३३१ जागांसाठी लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी), लिपिक, स्टाफ-कार ड्रायव्हर आणि शिपाई/हमाल/फरश पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती प्रक्रिया देशातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक असलेल्या मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरीच्या इच्छुक तरुणांसाठी मोठी संधी आहे, ज्याची ऑनलाईन अर्जाची मुदत दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी संपली होती परंतु वेबसाईट वर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींमुळे व पेमेंट करताना येणाऱ्या समस्यांमुळे बरेच उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते त्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाने नवीन अधिसूचना जाहीर करून ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १६ जानेवारी २०२६ पर्यंत वाढवली आहे.

Bombay High Court Recruitment – पदांची विभागणी आणि संख्या
या भरतीत विविध पदांसाठी खालीलप्रमाणे जागा जाहीर झाल्या आहेत:
- लघुलेखक (उच्च श्रेणी): १९ जागा
- लघुलेखक (निम्न श्रेणी): ५६ जागा
- लिपिक: १३३२ जागा
- स्टाफ-कार ड्रायव्हर: ३७ जागा
- शिपाई/हमाल/फरश: ८८७ जागा
एकूण २३३१ जागा मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील उच्च न्यायालयात उपलब्ध असून, ही संधी स्थानिक आणि मराठी माध्यमातील उमेदवारांसाठी विशेष महत्त्वाची आहे.
Bombay High Court Recruitment – शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा
Bombay High Court Recruitment मधील प्रत्येक पदासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- लघुलेखक (उच्च श्रेणी): पदवीधर, शॉर्टहँड १०० शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (किंवा आयटीआय), एमएस-सीआयटी किंवा समतुल्य. वय: २१ ते ३८ वर्षे (८ डिसेंबर २०२५ नुसार, मागासवर्गीयांना ५ वर्षे सवलत).
- लघुलेखक (निम्न श्रेणी): पदवीधर, शॉर्टहँड ८० श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि., एमएस-सीआयटी. वय: २१ ते ३८ वर्षे.
- लिपिक: पदवीधर, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि., एमएस-सीआयटी. वय: १८ ते ३८ वर्षे.
- स्टाफ-कार ड्रायव्हर: १०वी उत्तीर्ण, हलके मोटार वाहन चालक परवाना, ३ वर्षे अनुभव. वय: २१ ते ३८ वर्षे.
- शिपाई/हमाल/फरश: किमान ७वी उत्तीर्ण. वय: १८ ते ३८ वर्षे.
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागतील. पदानुसार लिंक्स खालीलप्रमाणे:
- लघुलेखक (उच्च): https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php
- लघुलेखक (निम्न): https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php
- लिपिक: https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php
- ड्रायव्हर: https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php
- शिपाई: https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php
अर्ज शुल्क: १००० रुपये.
शेवटची तारीख: १६ जानेवारी २०२६ (रात्री ५ वाजेपर्यंत).
अधिकृत वेबसाइट: https://bombayhighcourt.nic.in.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
