अहमदाबादमध्ये पार पडत असलेल्या 11व्या आशियाई जलक्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. इंडीव्हर साईरेम आणि निंगथौजम विल्सन सिंग या भारतीय खेळाडूंनी पुरुषांच्या सिंक्रोनाईज्ड 10 मीटर प्लॅटफॉर्म डाईव्हिंग प्रकारात अप्रतिम खेळ करत भारतासाठी पहिल्यांदाच (Bronze Medal) कांस्य पदकाची कमाई केली आहे.

Bronze Medal- इंडीव्हर साईरेम आणि निंगथौजम विल्सन सिंग
इंडीव्हर साईरेम आणि निंगथौजम विल्सन सिंग या जोडीने 300.66 गुणांची कमाई करत पदक मंचावर स्थान मिळवले आणि भारतीय डाईव्हिंगच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी नोंदवली. आशियाई स्तरावरील या स्पर्धेत यापूर्वी भारताला डाईव्हिंगमध्ये कधीही पदक मिळाले नव्हते.
या विजयामुळे भारतीय जलक्रीडेला नवी दिशा मिळाली असून डाईव्हिंग प्रकारातही भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व निर्माण करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
खेळप्रेमी आणि क्रीडाजगताकडून इंडीव्हर साईरेम आणि निंगथौजम विल्सन सिंग यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, या ऐतिहासिक यशामुळे भारतीय जलक्रीडेला नव्या पिढीला मोठी प्रेरणा मिळाली आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियांसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
