आर.बी. आय. ने लाँच केली ऑफलाईन डिजिटल रूपी Cashless India च्या दिशेने भारत आणखी एक पाउल पुढे !

Vishal Patole

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतेच भारतातील पहिले “ऑफलाइन डिजिटल रुपया” (Offline Digital Rupee – e₹) अधिकृतपणे लॉन्च केले असून, हे पाऊल देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिक मानले जात आहे जे भारताला Cashless India बनविण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ दरम्यान मुंबईत, आरबीआयने हे नवे चलन जाहीर केले. यामुळे आता इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क नसतानादेखील डिजिटल रुपयाच्या माध्यमातून थेट व्यवहार शक्य झाले आहेत, आणि हे अगदी तुमच्या खिशातील रोख रकमे प्रमाणे सहज वापरता येते.

Cashless India च्या उद्दिष्टात जाणून घेऊ ऑफलाइन डिजिटल रुपया म्हणजे काय?

ऑफलाइन डिजिटल रुपया हा भारताचा सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) आहे – म्हणजे आपल्या पारंपारिक रुपयाचाच हा डिजिटल अवतार आहे, फक्त तो डिजिटल वॉलेटमधून वापरता येतो. यासाठी बँक खात्याची आवश्यकता नाही. एखादी QR कोड स्कॅन करणे किंवा फक्त डिव्हाइस टॅप करणे इतकेच आवश्यक असून, व्यवहार लगेच पूर्ण होतो. युजर्स हे वॉलेट अॅप्स प्ले स्टोर किंवा अॅपल स्टोअर वरून डाउनलोड करू शकतात, त्यानंतर त्यांचा e₹ वॉलेट ते ऑफलाइन व्यवहारांसाठी वापरू शकतात.

या तंत्रज्ञानाचे लाभ आणि वैशिष्ट्ये

  • कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कशिवाय सुरक्षित डिजिटल व्यवहार.
  • विशेषतः ग्रामीण, दुर्गम भागांमध्ये डिजिटल व्यवहार सुलभ होणार.
  • कॅश प्रमाणेच व्यवहार – कोणत्याही बँक खात्यात आवश्यकता नाही.
  • डिजिटल वॉलेटद्वारे तत्काळ पैसे ट्रान्सफर किंवा पेमेंट शक्य.
  • QR कोड किंवा NFC द्वारे पैसे देण्याची सोय.
  • सरकारी आणि खासगी बँकांच्या अधिकृत वॉलेटद्वारे सेवा उपलब्ध.

Cashless India च्या उद्दिष्टाने कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे टाकलेले पाऊल

ऑफलाइन डिजिटल रुपये मुळे भारतातील डिजिटल व्यवहाराचा वेग वाढेल. विशेषतः इंटरनेट नसलेल्या किंवा नेटवर्क कमजोर भागात देखील डिजिटल पेमेंट्स सहज होणार आहेत, त्यामुळे देशभर कॅशलेस व्यवहाराला नवा चालना मिळेल. RBI च्या या उपाययोजनांनी आर्थिक समावेशन, व्यवहाराची पारदर्शकता आणि वापरकर्ता अनुभव यामध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडतील.

R.B.I. च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:

भारताचा पहिला इलेक्ट्रिक हेव्ही -ड्युटी कार्गो ट्रक BEM 5548 EV (Electric Truck)

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत