अमेरिकेतील प्रख्यात पुराणमतवादी वक्ते आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे मित्र चार्ली कर्क (Charlie Kirk) यांच्या हत्येच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. उजव्या विचारसरणीशी संबंधित माध्यम Right Angle News Network ने दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय टायलर रॉबिन्सन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो Utah राज्यातील रहिवासी आहे. प्राथमिक माहितीनुसार, हत्याकांडानंतर आरोपी टायलर रॉबिन्सनच्या वडिलांनी त्याला घटनास्थळीच पकडून ठेवले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला अटक करून चौकशीसाठी घेऊन गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चार्ली किर्क यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले की आरोपी टायलर रॉबिन्सनला ताब्यात घेण्यात त्याच्या वडिलांची आणि एका धर्मगुरूची (Minister) मोठी भूमिका होती. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीजवळील एका व्यक्तीने ही माहिती दिली आणि त्या धर्मगुरूंनी एका मित्रामार्फत पोलिसांपर्यंत धागेदोरे पोहोचवले. त्यानंतर आरोपीच्या वडिलांनी थेट हस्तक्षेप करत पोलिस मुख्यालयात त्याला घेऊन गेले आणि त्याच क्षणी तो अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेला. ट्रम्प यांनी या धाडसाबद्दल वडिलांची प्रशंसा करत, सत्य लपवणे अशक्य आहे आणि गुन्हेगारांना त्यांच्या जवळील लोकांकडूनच उघडे केले जाते, असे नमूद केले.

(Charlie Kirk) चार्ली कर्क बद्दल
चार्ली किर्क हे अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे प्रभावशाली वक्ते आणि “Turning Point USA” या संघटनेचे संस्थापक आहेत. त्यांनी पुराणमतवादी धोरणे आणि राजकीय विषयांवर आपली ठाम भूमिका मांडत अमेरिकन युवकांमध्ये मोठा प्रभाव निर्माण केला होता. त्यांच्या अचानक झालेल्या हत्येमुळे अमेरिकन पुराणमतवादी गटांमध्ये आक्रोश उसळला आहे.
पुढील चौकशी
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची चौकशी सुरू असून हत्या कोणत्या कारणास्तव घडवली याबाबत तपास चालू आहे. रॉबिन्सनच्या वडिलांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद असल्याचेही स्थानिक पातळीवर म्हटले जात आहे.
