लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स निर्मित ‘छावा’ – Chhava चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता 56 दिवस झाले असून, यंदाच्या वर्षी कोणत्याही हिंदी चित्रपटाने एवढी मोठी कमाई केलेली नाही. ‘छावा’ केवळ हिंदी भाषिक प्रदेशातच नव्हे, तर दक्षिण भारतातील बाजारपेठेतही जोरदार कामगिरी करत आहे. याची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी ‘छावा’ चित्रपटाची तेलुगू भाषेमध्ये डब केलेली आवृत्ती प्रदर्शित केली आहे. दिनांक ७ मार्च २०२५ रोजी हा चित्रपट तेलगु भाषेत रिलीज करण्यात आला होती.

Chhava बॉक्स ऑफिस आकडेवारी:
- भारत नेट कलेक्शन: ₹599.55 कोटींहून अधिक
- जागतिक कलेक्शन: ₹804.85 कोटींच्या उंबरठ्यावर
- विदेशी कलेक्शन : ₹ 91 कोटी
- २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट
Chhava चित्रपटाचे कथानक:
‘छावा’ Chhava हा मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट आहे. हा चित्रपट सुप्रसिद्ध मराठी लेखक शिवाजी सावंत यांच्या प्रसिद्ध Chhava ‘छावा’ कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीने होते आणि संभाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध दिलेल्या लढ्यांचे चित्रण यात प्रभावीपणे दाखवले आहे. चित्रपटाच्या अखेरीस संभाजी महाराजांचे बलिदान आणि मराठा साम्राज्याच्या विजयानंतर स्वराज्याच्या स्थापनेचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा प्रवास थक्क करणारा आहे. हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी अमानवीय अत्याचारी, क्रूर, जुलामंविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी उपसलेली तलवार त्यांच्या धर्मवीर पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी जुलमी औरंग्याविरुद्ध झुकू दिली नाही, अनन्वित अत्याचार सहन करत स्वत:चे बलिदान दिले परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची आण, बाण आणि शान किंचितही कमी होऊ दिली नाही म्हणून इतिहासात अजरामर झालेला शेर शिवाचा “छावा” या चित्रपटाने अतिशय चांगल्या पद्धतीने साकारला आहे.
Chhava मुख्य कलाकार:
- विकी कौशल – संभाजी महाराज Sambhaji Maharaj- शिवरायांचा धर्मवीरपुत्र.
- रश्मिका मंदान्ना – येसूबाई
- अक्षय खन्ना – औरंगजेब
- दिव्या दत्ता – सईबाई
- अशुतोष राणा – नेताजी पालकर
संगीत आणि तांत्रिक बाबी:
- संगीतकार: ए. आर. रहमान
- गीतकार: इरशाद कामिल, क्षितिज पटवर्धन
- फॉरमॅट्स: स्टँडर्ड आणि IMAX
- निर्माती: मॅडॉक फिल्म्स
समीक्षा आणि लोकप्रियता:
Chhava चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी, प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. ‘छावा’ हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे आणि हळूहळू सर्वकालीन सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक बनत आहे.
चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर विकी कौशलच्या अभिनयाचे आणि चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक होत आहे. तेलुगू आवृत्ती लवकरच प्रदर्शित होणार असल्याने याची कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. ‘छावा’ हा चित्रपट इतिहासप्रेमी आणि भव्य सिनेमाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी नक्कीच खास पर्वणी ठरत आहे!
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
‘छावा’: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट
Sambhaji Maharaj- शिवरायांचा धर्मवीरपुत्र.
