CP Radhakrishnan यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरु सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना उपराष्ट्रपतीपदाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवारीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी राधाकृष्णन यांच्या दीर्घकाळच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचे कौतुक करताना म्हटले की, त्यांच्या विविध क्षेत्रांतील अनुभव आणि समर्पणामुळे देश निश्चितच समृद्ध होईल. त्यांनी पुढे असेही म्हटले की, “राधाकृष्णनजींनी आजवर ज्या निष्ठेने आणि दृढतेने राष्ट्रसेवा केली आहे, तीच भावना कायम ठेवून ते भविष्यातही देशाची सेवा करतील,” असा मला विश्वास आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांची भेट घेतली
कोल्हापूर दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) त्यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.राजभवनात झालेल्या या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अनुभवी नेतृत्वाचे कौतुक करत, त्यांच्या उमेदवारीमुळे देशाला निश्चितच नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

CP Radhakrishnan
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan ) यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारीचा हा निर्णय भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आला आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही घोषणा केली.
राजकीय रणनीती: दक्षिणेत भाजप मजबूत करण्याच्या दिशेने दक्षिण भारतातील नेत्यांना महत्त्व देण्याचा भाग म्हणून राधाकृष्णन यांना उमेदवारी मिळाली असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
CP Radhakrishnan यांचा राजकीय प्रवास
CP Radhakrishnan राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूचे असून यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. त्याआधी झारखंड, तेलंगणा, पाँडिचेरी यांसारख्या राज्यांत त्यांनी राज्यपाल किंवा उपराज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला आहे. 2003-2006 दरम्यान ते भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी दोनदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया:उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख निवडणूक आयोगाने दि. 21 ऑगस्ट 2025 जाहीर केली आहे..
राजकीय चर्चाः विरोधी पक्ष INDIA आघाडी सुरूवातीला बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी चर्चा करत आहे. काही विरोधी पक्षातील नेते राधाकृष्णन यांच्या बाजूने उभे राहिलेले पाहायला मिळू शकतात..
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
