CTET Admit Card Updates : परीक्षा 7 व 8 फेब्रुवारीला, ctet.nic.in admit card ची माहिती तपासणे अत्यावश्यक !

Vishal Patole

ctet.nic.in admit card – CTET February 2026: CTET Admit Card लवकरच उपलब्ध होणार असून; CTET परीक्षा 7 व 8 फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) फेब्रुवारी 2026 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना ctet admit card अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in वरून डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी त्यावरील परीक्षा दिनांक, शिफ्ट व वेळ काळजीपूर्वक तपासावी, असे CBSE ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील अधिकृत सूचनेत स्पष्ट केले आहे. रिपोर्टिंग वेळेनंतर केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, तसेच परीक्षा शहर, केंद्र किंवा दिनांक बदलाबाबत कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही, असेही मंडळाने नमूद केले आहे.

ctet.nic.in admit card

CTET ची 21 वी आवृत्ती 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार – ctet.nic.in admit card

CBSE च्या सार्वजनिक सूचनेनुसार (F. No. /CBSE/CTET/Feb./2026/Revised, दिनांक 27.01.2026), यापूर्वी 25.11.2025 रोजी जाहीर केल्याप्रमाणे CTET ची 21 वी आवृत्ती 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार होती. मात्र, मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्याने आता ही परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 (शनिवार व रविवार) या दोन दिवशी देशभरातील 140 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे.

दोन्ही दिवशी पेपर I आणि पेपर II साठी खालील वेळापत्रक लागू राहील:

रीक्षा दिनांकपेपरवेळकालावधी
07-02-2026पेपर IIसकाळी 09:30 ते 12:002 तास 30 मिनिटे
07-02-2026पेपर Iदुपारी 14:30 ते 17:002 तास 30 मिनिटे
08-02-2026पेपर IIसकाळी 09:30 ते 12:002 तास 30 मिनिटे
08-02-2026पेपर Iदुपारी 14:30 ते 17:002 तास 30 मिनिटे

वेबसाईट ctet.nic.in admit card ची माहिती उमेदवारांना पाहता येईल

उमेदवारांनी आपल्या ctet admit card वर नमूद केलेली अचूक तारीख व शिफ्ट पाहूनच परीक्षेला हजर राहावे. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून आपले तपशील भरावेत. प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्र, शहर किंवा दिनांक बदलासाठी कोणतीही मागणी कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत