भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सायप्रस (Cyprus), कॅनडा (Canada) आणि क्रोएशिया (Croatia) या तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यातील पहिला टप्पा सायप्रसचा असून, ही भारताच्या पंतप्रधानांची सायप्रसला २३ वर्षांनंतरची पहिली अधिकृत भेट आहे. तुर्कियेच्या संदर्भात प्रधानमंत्री मोदींच्या सायप्रस दौऱ्याचे विशेष महत्व आहे.
- Cyprus देशाच्या या ऐतिहासिक भेटीबाबत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अधिकृत X खात्यावरून प्रतिक्रिया दिली.
- (Cyprus ) सायप्रसच्या पंतप्रधानांनी केले मोदींचे स्वागत
- पंतप्रधान मोदी घेणार G7 शिखर संमेलनात सहभाग
- सायप्रस (Cyprus) दौऱ्याचे महत्व
- काय आहे सायप्रस आणि तुर्किये मधील सायप्रिओट्समधील दीर्घकालीन संघर्ष ?
- सायप्रस संघर्ष आणि तुर्कीची आक्रमक भूमिका – भारताचे मत काय?
- नैसर्गिक वायू, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि सामरिक स्पर्धा

Cyprus देशाच्या या ऐतिहासिक भेटीबाबत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अधिकृत X खात्यावरून प्रतिक्रिया दिली.
Cyprus देशाच्या या ऐतिहासिक भेटीबाबत पंतप्रधान मोदींनी लिहिले, “Cyprus, Canada आणि Croatia या तीन देशांच्या दौऱ्यास सुरुवात करत आहे. सायप्रसला ही २३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानाची पहिली अधिकृत भेट आहे. त्यानंतर G7 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी कॅनडामध्ये आणि नंतर क्रोएशियामध्ये अधिकृत दौरा करणार आहे.”
(Cyprus ) सायप्रसच्या पंतप्रधानांनी केले मोदींचे स्वागत
सायप्रसचे पंतप्रधान निकोस ख्रिस्तोडुलिडीस यांनी मोदींचे प्रत्यक्ष हजर राहून स्वागत करत एक दिलखुलास ट्वीट केले:
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, सायप्रसमध्ये तुमचे स्वागत आहे! युरोपीय संघाच्या दक्षिण-पूर्व टोकावर आणि भूमध्य समुद्राच्या प्रवेशद्वारावर तुमची ही ऐतिहासिक भेट आहे. ही एक नवी सुरुवात आहे — अशा धोरणात्मक भागीदारीची जी मर्यादा ओळखत नाही. आपण एकत्र प्रगती करू, परिवर्तन घडवू, आणि भरभराटीचा मार्ग स्वीकारू!”
पंतप्रधान मोदी घेणार G7 शिखर संमेलनात सहभाग
(Cyprus) सायप्रसनंतर, पंतप्रधान मोदी (Canada) कॅनडामध्ये G7 जगातील प्रमुख सात शक्तिशाली राष्ट्रांच्या शिखर संमेलनात सहभागी होतील. विशेष म्हणजे भारत या संघटनेचा सदस्य नसतानाही भारताला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सतत या संमेलनात आवर्जून सामील होण्याचा मान मिळत आला आहे. या शिखर संमेलनात जागतिक महासत्तांचे नेते एकत्र येतात आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारविनिमय करतात. या संमेलनानंतर प्रधानमंत्री मोदी क्रोएशिया या देशाला भेट देणार आहेत.
(Croatia) क्रोएशियाची पहिली पंतप्रधान भेट :
दौऱ्याचा शेवटचा टप्पा क्रोएशिया असून, तिथे भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट ठरणार आहे. यामुळे भारत-क्रोएशिया संबंधांमध्ये एक नवा अध्याय सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सायप्रस (Cyprus) दौऱ्याचे महत्व
सायप्रस हा तुर्किये चा शेजारी देश असून, नुकतेच तुर्किये ने पाकीस्तानला भारताविरोधात मदत केली होती. जेव्हा कि भारताने पहलगाम हल्ल्याविरोधात व दहशतवाद विरोधात पाकीस्थान स्थित दहशतवादी ठिकाणांवर “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत हल्ले केले तेव्हा पाकीस्तानने तुर्कियेने दिलेल्या ड्रोनचा भारताविरोधात उपयोग केला होता. भारतीय सैन्याच्या बहादूर शौर्याने व संरक्षण प्रणालीने हे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केली व पाकिस्तानचा हल्ला निष्फळ केला. या पार्श्वभूमीवर भारत आणि तुकीयेचे संबंध विकोपाला जाणे साजजीकच होते. त्यामुळे “सायप्रस” सोबतचे भारतीय संबंध हे महत्वपूर्ण ठरतात.
काय आहे सायप्रस आणि तुर्किये मधील सायप्रिओट्समधील दीर्घकालीन संघर्ष ?
भूमध्य समुद्रात वसलेले सायप्रस (Cyprus) एक सुंदर बेट आहे – परदेशी पर्यटकांसाठी हे निसर्गसंपन्न स्वप्नवत ठिकाण असले तरी, इथे दशकानुदशके चालू असलेला एक खोल राजकीय आणि वांशिक संघर्ष आजही सुटता सुटत नाही.
- ग्रीक सायप्रिओट्स आणि तुर्की सायप्रिओट्स या दोन समुदायांमधील तणाव– 1974 च्या तुर्की आक्रमणानंतर अधिकच खोल गेला आणि आज सायप्रस हे एक विभागलेले बेट म्हणून ओळखले जाते.
- वांशिक दरी : – सायप्रसवर ग्रीक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन व तुर्की सुन्नी मुस्लिम या दोन मोठ्या वांशिक गटांमध्ये शतकांपासून तणाव होता.
- स्वातंत्र्य व वाद : – 1960 मध्ये ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ग्रीक सायप्रिओट्सना ग्रीससोबत विलीन व्हायचं होतं (याला एनोसिस म्हणतात), तर तुर्की सायप्रिओट्सना सायप्रसचं विभाजन हवं होतं (टाक्सिम).
- 1974 चं निर्णायक वळण: ग्रीसने समर्थित केलेल्या उठावानंतर, तुर्कस्तानने बेटावर सैन्य पाठवले आणि सायप्रसचं उत्तर टोक त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं. त्यातूनच जन्म झाला – तुर्की उत्तर सायप्रस प्रजासत्ताक (TRNC) चा, जो आजही फक्त तुर्कीनेच मान्य केलेला आहे.
- सत्ता आणि स्वायत्तता: ग्रीक सायप्रिओट्स पूर्ण सायप्रसवर अधिकार असलेलं एकसंघ राष्ट्र हवं आहे, तर तुर्की सायप्रिओट्स दोन स्वतंत्र राज्यांवर आधारित उपाययोजनेच्या मागणीवर ठाम आहेत.
- गारंटर देशांचा मुद्दा: 1960 मध्ये Greec, तुर्की आणि UK यांनी सायप्रसच्या संरक्षणासाठी ‘गारंटर’ व्यवस्था उभी केली होती. ग्रीक गट ती रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत, तर तुर्की सायप्रिओट्स या योजनेला सुरक्षा कवच मानतात.
- जमीन आणि मालमत्तेचे हक्क: 1974 पासून हजारो कुटुंबं विस्थापित झाली. त्यांनी गमावलेली घरे, जमिनी यावर आजही हजारो कायदेशीर दावे प्रलंबित आहेत.
म्हणून आजही सायप्रस बेटावर ग्रीक आणि तुर्की सायप्रिओट्समधील दीर्घकालीन संघर्ष जागतिक स्तरावर चर्चेचा विषय आहे.
सायप्रस संघर्ष आणि तुर्कीची आक्रमक भूमिका – भारताचे मत काय?
सायप्रसच्या उत्तर भागावर तुर्कीने 1974 मध्ये लष्करी आक्रमण करून TRNC नावाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले, जे आजही केवळ तुर्कीनेच मान्य केले आहे. हेच तुर्की आता पाकिस्तानला मदत करताना ‘संपूर्ण वर्चस्ववादी धोरण’ पद्धतीने भारतासारख्या स्थिर लोकशाही राष्ट्राच्या हितांवर आघात करत आहे.
- भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्ट मत आहे की, “तुर्कीचा सायप्रसप्रमाणे भारतविरोधात आंतरराष्ट्रीय तत्त्वांना धक्का देणारा हस्तक्षेप, दक्षिण आशियात अस्थिरता पसरवणारा ठरतो.”
- भारताची भूमिका – शांतता, पण ठामपणा! – भारताने सायप्रसच्या एकसंघ आणि सार्वभौम अस्तित्वाला सातत्याने पाठिंबा दिला आहे. भारत सायप्रसप्रमाणेच स्वतःच्याही सीमांवर कोणत्याही प्रकारच्या घुसखोरी, हस्तक्षेप आणि दहशतीच्या समर्थनाला पूर्णपणे विरोध करतो.
- सायप्रसप्रती भारताचा पाठिंबा, आणि तुर्कीच्या पाकिस्तान-समर्थित धोरणांवर भारताची उघड नाराजी – हे दोन मुद्दे स्पष्ट करतात की भारत राजकीय-राजनैतिक शांततेचा पुरस्कर्ता असूनही, त्याच्या सुरक्षेवर परिणाम होईल, तर तो योग्य पावले उचलण्यास मागे हटणार नाही.
नैसर्गिक वायू, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि सामरिक स्पर्धा
सायप्रस (Cyprus) परिसरात सापडलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांवर तुर्कीचा दावा, आणि पाकिस्तानसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर – हे दोन्ही मुद्दे एकत्र पाहिले, तर तुर्कीचा हेतू केवळ आर्थिक नाही, तर सामरिक वर्चस्व स्थापण्याचा आहे..म्हणून भारतासाठी तुर्किये च्या संदर्भात सायप्रसचे एक विशेष महत्व आहे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींच्या सायप्रस दौऱ्याचे खास महत्व आहे !
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर अपघात – सात जणांचा मृत्यू, ६ आठवड्यांत पाचवा अपघात- Helicopter Crash
