भारतीय विश्व बुद्धिबळ विजेता डी. गुकेश (D Gukesh) यांनी सेंट लुईस, अमेरिकेतील . १९ वर्षीय गुकेशने पहिल्याच दिवशी चार गुण मिळवत आघाडी घेण्यास यश मिळवले. पहिल्या डावात मॅग्नस कार्लसनकडून पराभव स्वीकारावा लागला, मात्र त्यानंतर हिकारू नाकामुरा याच्यावर विजय मिळवून व फॅबियानो कारुआना विरुद्ध दोन्ही सामने जिंकून गुकेशने दिलासादायक पुनरागमन केले. या रॅपिड फॉरमॅटच्या डबल राऊंड-रॉबिनमध्ये विजयासाठी गुण श्रेणी दिवसागणिक वाढते, तर संपूर्ण स्पर्धेचा बक्षीस पूल तब्बल $4,12,000 इतका आहे.

D Gukesh आणि नाकामुरा संघर्ष
नाकामुरा आणि गुकेशमधील सामना या वेळी विशेष लक्षवेधी ठरला. नुकत्याच पार पडलेल्या एक प्रदर्शनीय स्पर्धेत नाकामुराने विजयाच्या क्षणी गुकेशचा किंग तुकडा प्रेक्षकांमध्ये फेकल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र यावेळी गुकेशने जिंकताच शांतपणे बोर्ड पुन्हा मांडलाउ आणि कोणताही भावनिक प्रतिसाद न देता क्रीडांगणातून बाहेर पडला. सोशल मीडियावर त्याच्या या शांत संयमाचे आणि क्रीडासंस्कृतीचे विशेष कौतुक झाले आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसाअखेर गुकेश आघाडीवर असून, कार्लसन पिछाडीवर आहेत. अजून दोन दिवसांची स्पर्धा शिल्लक आहे. गुकेशची ही परिपक्वता आणि खेळातील जितकी त्याच्या खेळीने, तितकीच त्याच्या वर्तनानेही सर्वांनी दखल घेतली आहे.
D Gukesh चा पुढील सामना
द गुकेशचा पुढील सामना क्लच चेस: चॅम्पियन्स शो डाउन स्पर्धेत आज, २८ ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता (IST) सुरू होईल. या स्पर्धेतील सर्व सामने सेंट लुइस चेस क्लब, अमेरिका येथे होत आहेत. भारतात या स्पर्धेचे थेट टीव्ही प्रसारण उपलब्ध नाही; मात्र सर्व सामने सेंट लुइस चेस क्लबच्या अधिकृत YouTube चॅनेलवर थेट पाहता येतील. स्पर्धेचे तीनही दिवस पर्यंत प्रत्येक सत्राचा प्रारंभ १०:३० PM ISTला होईल. रसिक chess.com किंवा St. Louis Chess Club यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह गेम्स आणि प्रसारण पाहू शकतात.
दुसऱ्या दिवसाचा सामना डी. गुकेश विरुद्ध कार्लसन LIVE
समाज माध्यमावरील प्रतिक्रियांसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
