टीव्ही मालिका “धर्तीपुत्र नंदिनी” Dhartiputra Nandini, मधील मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता अमन जयस्वाल (Aman Jaiswal) यांचे १७ जानेवारी रोजी मुंबईतील दुर्दैवी रस्ता अपघातात निधन झाले. २३ वर्षीय अमान एका ऑडिशनसाठी जात असताना जोगेश्वरी महामार्गावर त्यांच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसली. अपघातानंतर तातडीने त्यांना मुंबईतील कामा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच ३० मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला.
Dhartiputra Nandini फेम Aman Jaiswal च्या मृत्यू बद्दल लेखक धीरज मिश्रा यांची पुष्टी
“धर्तीपुत्र नंदिनी”चे लेखक धीरज मिश्रा यांनी ही दुःखद बातमी दिली. त्यांनी सांगितले, “अमन ऑडिशनसाठी जात असताना जोगेश्वरी महामार्गावर हा अपघात झाला. ट्रकच्या धडकेमुळे अपघात अतिशय गंभीर होता.”
मित्राने व्यक्त केले दुःख
अमनचा जवळचा मित्र, अभिनेश मिश्रा, जो पहिल्यांदा घटनास्थळी पोहोचला, त्याने सांगितले, “अपघात इतका गंभीर होता की तातडीने रुग्णालयात नेल्यानंतरही त्यांना वाचवता आले नाही.”

मनोरंजन क्षेत्रात हळहळ
अमनच्या अचानक जाण्यामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. Dhartiputra Nandini “धर्तीपुत्र नंदिनी”ची निर्माती दीपिका चिकल्या यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि कुटुंबीयांवरील आघाताबद्दल सांगितले. “ही खूपच धक्कादायक घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मुंबईत येऊन अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव घेऊन जायचे आहे. त्यांच्या वडिलांची तब्येत या धक्क्यामुळे बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे,” असे त्यांनी सांगितले.
अंतिम श्रद्धांजली
धीरज मिश्रा यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना लिहिले, “तुम्ही आमच्या आठवणीत सदैव जिवंत राहाल… देव कधी कधी किती क्रूर असतो याचा अनुभव आज तुमच्या मृत्यूमुळे आला… अलविदा.”
अमन जयस्वाल यांचे अचानक जाणे मनोरंजन क्षेत्रासाठी एक मोठी हानी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.

Aman Jaiswal चा टीव्ही शो “धर्तीपुत्र नंदिनी” चा युटूब वरील व्हिडीओ.
