हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांचे दि. १५ जुलै २०२५ रोजी दुपारी मुंबईमध्ये निधन झाले. 79 वर्षांचे धीरज कुमार यांना निमोनिया झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट वर ठेवण्यात आले होते.

चित्रपट व टेलिव्हिजनमध्ये Dheeraj Kumar यांचे समृद्ध योगदान
धीरज कुमार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. त्यांनी फिल्मफेअर टॅलेंट हंट स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले होते. ह्या स्पर्धेतील विजेते होते राजेश खन्ना (पहिले स्थान) आणि सुभाष घई (दुसरे स्थान). या तिघांनीही नंतर हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी वाटचाल केली.
1970 ते 1985 या कालावधीत धीरज कुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यामध्ये –
- हीरा पन्ना (देव आनंदसोबत),
- शिरडी के साईं बाबा,
- सरगम,
- मांग भरो सजना,
- क्रांती,
- पुराना मंदिर,
- कर्म युद्ध,
- बेपनाह यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.
टीव्ही क्षेत्रात ‘क्रिएटिव आय’ प्रोडक्शन हाऊसद्वारे Dheeraj Kumar यांचे यशस्वी पदार्पण
चित्रपटांनंतर Dheeraj Kumar यांनी ‘Creative Eye’ प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली आणि टीव्ही माध्यमात निर्माते-दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.
त्यांच्या बॅनरखाली तयार झालेले लोकप्रिय टीव्ही शो:
- ओम नमः शिवाय
- श्री गणेश
- मिली
- घर की लक्ष्मी बेटियां
- मन में है विश्वास
- ये प्यार न होगा कम
- तुझ संग प्रीत लगाई सजना
- नादानियां
- इश्क सुबहान अल्लाह हे सर्व कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात आजही अढळ स्थान मिळवून आहेत.
Dheeraj Kumar यांच्या अंतिम संस्काराची माहिती
धीरज कुमार यांचे अंतिम संस्कार १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुंबईच्या विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत होतील.
त्यांचे पार्थिव सकाळी ६ वाजता कोकिलाबेन रुग्णालयातून अंधेरी पश्चिम येथील त्यांच्या निवासस्थानी आणले जाईल.
सकाळी १० वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवले जाईल.
Dheeraj Kumarयांच्या कुटुंबाची भावनिक अपील
त्यांची प्रकृती गंभीर असताना, धीरज कुमार यांच्या कुटुंबीयांनी एक अधिकृत निवेदन जारी करत चाहत्यांना त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखण्याची विनंतीही त्यांनी केली होती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.
धीरज कुमार यांचे निधनाने हिंदी चित्रपट व टेलिव्हिजन क्षेत्रासामध्ये एक दुखाची लाट पसरली आहे. मनोरंजन क्षेत्रासाठीही एक कधीही भरून न येऊ शकणारी हानी आहे. धीरज कुमार यांचा अभिनय, दिग्दर्शन व निर्मितीतील योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील.
धीरज कुमार यांना हृदयस्थ श्रद्धांजली !!!!
सिनेमा आणि दूरदर्शन कलाकार संघटना (सिंटा) ने समाज माध्यमातून दिली धीरजकुमार यांना श्रद्धांजली.
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
रामायण (Ramayan): एका अमर कथेचा भव्य महायज्ञ बॉलीवूडला जमेल का ?
