“Dhurandhar” – ‘धुरंधर’चा जागतिक बॉक्स ऑफिसवर दबदबा; अक्षय खन्ना आणि  रणवीर सिंह च्या चित्रपटाने कमावले तब्बल ₹1222 कोटी!

Vishal Patole

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या Dhurandhar ‘धुरंधर’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने जागतिक पातळीवर विक्रमी कमाई करत हिंदी सिनेमाच्या इतिहासात नवा अध्याय रचला आहे. रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘ऑल टाइम ब्लॉकबस्टर’ ठरला आहे. जागतिक उत्पन्न ₹1222 कोटींच्या घरात! ‘धुरंधर’चा एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन ₹1222 कोटी इतका झाला असून, यापैकी भारतातील नेट कलेक्शन ₹781.75 कोटी, ग्रॉस कलेक्शन ₹938 कोटी, तर परदेशातील कलेक्शन तब्बल ₹284 कोटी इतकं झाले आहे. हा चित्रपट 2025 सालातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

Dhurandhar

Dhurandhar ला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद !


पहिल्याच दिवशी Dhurandhar चित्रपटाने ₹28 कोटींची शानदार ओपनिंग घेतली होती. तिसऱ्या दिवशी ते आकडे ₹43 कोटींवर पोहोचले. दुसऱ्या आठवड्यापासूनही कलेक्शन स्थिर राहिले असून, २५व्या दिवसापर्यंत दररोज सरासरी ₹10 कोटींच्या आसपास कमाई होत राहिली.

तिसऱ्या आठवड्यात पुन्हा उचल!


१६व्या आणि १७व्या दिवशी अनुक्रमे ₹38.5 आणि ₹34.25 कोटी अशी मोठी वाढ पाहायला मिळाली, तर 23व्या आणि 24व्या दिवशीही Dhurandhar ‘धुरंधर’ने ₹20 कोटींपेक्षा जास्त कमाई कायम ठेवली. शेवटच्या आठवड्यातील आकडेवारीनुसार, चित्रपट अजूनही प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत आहे.

उरीनंतर आदित्य धरची आणखी एक मेगाहिट!
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ नंतर दिग्दर्शक आदित्य धर यांचा हा दुसरा मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. दमदार कथा, राजकीय थ्रिल, आकर्षक पार्श्वसंगीत आणि रणवीर सिंहचा तीव्र अभिनय या सर्व घटकांनी ‘धुरंधर’ला ऐतिहासिक यश मिळवून दिले आहे.

व्यापार तज्ञांच्या मते, “‘धुरंधर’ Dhurandharने हिंदी चित्रपटसृष्टीच्या उत्पन्नाच्या मर्यादा पुढे नेल्या आहेत. हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा इंडियन फिल्म ठरला असून, आगामी सिक्वेलसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.”

रणवीर सिंहचा धुरंधरट्रेलर प्रदर्शित; अॅक्शन आणि गुप्तहेर थ्रिलरचा स्फोटक मेळ


जिओ स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओज प्रस्तुत निर्माते आदित्य धर यांच्या नवीन चित्रपट ‘धुरंधर’ (Dhurandhar) चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर त्याने प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवली. अधिकृत X (Twitter) अकाउंटवर आणि युट्यूबवर रिलीज झालेला हा ट्रेलर काही तासांतच लाखो प्रेक्षकांनी पाहिला.

रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि सहनिर्मिती आदित्य धर यांनी केली आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ नंतर आदित्य धर पुन्हा एकदा देशभक्ती आणि गुप्तहेरगिरीच्या पार्श्वभूमीवर आधारित थ्रिलर घेऊन प्रेक्षकांसमोर आले आहेत.

धुरंधर हा दोन भागांच्या चित्रपट मालिकेतील पहिला भाग असून यात एका भारतीय गुप्तहेराची कथा दाखवली आहे जो पाकिस्तानातील कराची शहरातील गुन्हेगारी आणि राजकीय जगतात घुसखोरी करतो. १९९९ च्या IC-814 विमान अपहरण, २००१ मधील संसद हल्ला, आणि २००८ मुंबई दहशतवादी हल्ल्यांप्रमाणे काही वास्तविक घटनांवर आधारित काल्पनिक दृष्टीकोन यात पाहायला मिळतो.

चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत शशवत सचदेव यांनी दिले आहे, तर छायाचित्रण विकाश नवलखा, आणि संपादन शिवकुमार व्ही. पनिकर यांनी सांभाळले आहे. ॲक्शन सीक्वेन्सेससाठी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांची टीम काम करत आहे.

५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवत १२२२  कोटींपेक्षा अधिक कमाई केली, आणि २०२५ मधील सर्वाधिक गाजलेला भारतीय चित्रपट ठरला.

समीक्षकांनी रणवीर सिंह व अक्षय खन्ना यांच्या अभिनयाचे, तसेच आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले; मात्र दीर्घ कालावधी आणि गतीच्या बाबतीत काही टीकाही झाली. मनोरंजक बाब म्हणजे हा चित्रपट गल्फ देशांमध्ये बंदीला सामोरा गेला, परंतु पाकिस्तानमध्ये त्याच्या पायरसी डाउनलोड्सची संख्या तब्बल २० लाखांच्या पुढे गेली.

आता धुरंधर २ या सिक्वेलचा उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी निर्मात्यांनी १९ मार्च २०२६ ही प्रदर्शित तारीख घोषित केली आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांची समाज माध्यमावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत