भारतीय चित्रपटसृष्टीत मोठ्या बजेटच्या ऍक्शन आणि स्पाय थ्रिलर चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. अशाच बहुचर्चित चित्रपटांपैकी एक असलेला Dhurandhar : The Revenge लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Jio Studios ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या चित्रपटाचा ट्रेलर ७ मार्च रोजी सकाळी ११:०१ वाजता प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. “हौसला ईंधन बदला” या टॅगलाईनसह प्रसिद्ध झालेल्या पोस्टमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटातील संवाद “ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी” हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. देशभक्ती, बदला आणि गुप्तहेरांच्या धाडसी मोहिमांवर आधारित हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.

Dhurandhar : The Revenge ची दमदार स्टारकास्ट, कथा आणि पार्श्वभूमी
Dhurandhar : The Revenge या चित्रपटात प्रमुख भूमिकेत Ranveer Singh दिसणार असून त्याच्यासोबत Sanjay Dutt, Akshaye Khanna, R. Madhavan, Arjun Rampal आणि Sara Arjun यांसारखी मोठी स्टारकास्ट आहे. या कलाकारांच्या चित्रपटाच्या पहिल्या भागातील दमदार अभिनयामुळे दुसऱ्या चित्रपटाला वेगळेच वजन मिळणार असल्याचे मानले जात आहे.
Dhurandhar : The Revenge कथा आणि पार्श्वभूमी
Aditya Dhar लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट 2025 मध्ये आलेल्या Dhurandhar या चित्रपटाचा थेट सिक्वेल आहे. ही कथा एका भारतीय गुप्तहेराची आहे जो पाकिस्तानमधील कराची येथे गुन्हेगारी संघटना आणि राजकीय सत्ताकेंद्रांमध्ये घुसखोरी करून भारताविरोधातील कट उधळून लावण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी तो 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोठ्या मिशनवर निघतो. या प्रवासात त्याला अनेक धोकादायक शत्रूंना सामोरे जावे लागते.
चित्रपटाचे निर्मितीकार्य
हा चित्रपट Jio Studios आणि B62 Studios यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला आहे. निर्माते Jyoti Deshpande आणि Lokesh Dhar असून चित्रपटाचे संगीत Shashwat Sachdev यांनी दिले आहे. छायाचित्रण Vikash Nowlakha यांनी केले असून संपादन Shivkumar V. Panicker यांनी केले आहे. कास्टिंग डायरेक्टर म्हणून Mukesh Chhabra यांनी काम केले आहे.
विविध देशांत झाले चित्रीकरण
या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील पंजाब, चंदीगड, महाराष्ट्र, लडाख आणि हिमाचल प्रदेशसह थायलंडमधील बँकॉक येथे करण्यात आले. काही लोकेशन्स पाकिस्तानमधील कराचीचे दृश्य दाखवण्यासाठी वापरण्यात आली आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण जुलै 2024 मध्ये सुरू झाले आणि ऑक्टोबर 2025 मध्ये पूर्ण झाले.
Dhurandhar: The Revenge – सणांच्या पार्श्वभूमीवर मोठी रिलीज
Dhurandhar: The Revenge हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी Gudi Padwa, Ugadi आणि Eid al-Fitr या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
देशभक्ती, अॅक्शन, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा संगम असलेला हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या ऍक्शन चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. ट्रेलरच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून आता सर्वांचे लक्ष उद्या प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरकडे लागले आहे.
Dhurandhar : The Revenge चित्रपटाचा युट्यूब वरील टीझर पाहण्यासाठी येथे क्लिक कर.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
