दिवाळी 2025: प्रकाशाचा उत्सव, समृद्धीचा संकल्प !- Diwali 2025

Diwali 2024

Vishal Patole
Diwali 2024

Diwali 2025- दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हंटले जाते. संस्कृत मधील दोन शब्द पहिला “दीप” ज्याचा अर्थ होतो “दिवा” आणि दुसरा शब्द “आवली” ज्याचा अर्थ होतो “ओळ” हे दोन्ही मिळून याचा संपूर्ण अर्थ म्हणजे दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. ज्याला दीपावली असे देखील म्हणतात. जगाला चैतन्य देणाऱ्या प्रकाशाचा एक सण म्हणजे दिवाळी, हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. या सणाला “अज्ञानावर ज्ञानाचा, अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे” प्रतीक मानले जाते.आश्विन आणि कार्तिक महिन्यात, म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या मध्यात, दिवाळी साजरी केली जाते.

Diwali 2025
Diwali 2025

Happy Diwali चे ऐतिहासिक महत्त्व

दिवाळीचा सण विविध धार्मिक परंपरांशी जोडलेला आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे श्रेष्ठ हिंदू ग्रंथ रामायणानुसार दशरथ राजाने आपली पत्नी कैकयीला दिलेल्या वचनपूर्तीसाठी, पुत्र श्रीरामाला १४ वर्षे वनवास भोगावा लागला, हा वनवास त्यांनी केवळ आपल्या पित्याने आपल्या सावत्र आईला दिलेला शब्द / वचन पूर्ण व्हावे व तो शब्द किंवा वचन खोटे सिद्ध होऊ नये या करिता स्वत;च्या राज्याभिषेकाचा, संपत्ती आणि इतर मोहाचा त्याग करून त्यांनी एक पुत्र धर्म पालन केला, सीता मातेने आपल्या पतीला साथ देत पत्नीधर्माचे पालन केले, त्या सोबतच लक्ष्मणाने आपल्या भावासाठी स्वत;चे १४ वर्षे बंधूसेवेत घातले व बंधुप्रेमाचा आदर्श ठेवला, परंतु याच वनवासात असताना रावण नावाच्या राक्षसाने सीतेचे अपहरण केले. कोणतीही सेना जवळ नसलेल्या रामाने पुन्हा आपला पुरुषार्थ गाजवत आपली सेना उभी केली, सागरावर पूल “रामसेतू” बांधला, लंकेत जाऊन रावणाचा अहंकार ठेचून आपली लक्ष्मी – सीतेला राक्षस कैदेतून मुक्त केले त्यादिवशी विजयादशमी / पाडवा. तर ज्या दिवशी “वचनपूर्ती” करून व वनवासाचे १४ वर्षे संपून राम, लक्ष्मण आणि सीता अयोध्येत परत आले तो दिवस अश्विन अमावस्येचा होता परंतु जनतेनी आपल्या आदर्श राजाचे स्वागत करण्यासाठी दिव्यांच्या रांगा लाऊन व अतिषबाजी करून संपूर्ण परिसर उजळून काढला तो दिवस दिवाळी म्हणून अमर झाला कारण भगवान रामाच्या रुपात मानवीय मुल्ये, आदर्श तत्वे, धर्म आणि सत्याचा विजय झाला होता.

Diwali 2025 निमित्त जाणून घेऊ विविध परंपरा


Diwali 2025– दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण असला तरी, इतर धर्मात देखील या सणाचे विशेष महत्व आहे. महावीरांच्या अंतिम मुक्तीचे प्रतीक म्हणून जैन लोक आपली दिवाळी पाळतात. मुघल तुरुंगातून गुरू हरगोविंदसिंग यांची सुटका झाल्याबद्दल शीख समुदाय “बंदिछोर दिवस” साजरा करतो. लक्ष्मीची पूजा करून नेवार बौद्ध समाजातील लोक आपली दिवाळी साजरी करतात, तर कालीमातेची पूजा करून पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू आपली दिवाळी साजरी करतात.

Diwali 2024

Diwali Puja – Lakshmipujan लक्ष्मीपूजन: भारतीय संस्कृतीतील एक विशेष पूजा आणि दिवाळीचा मुख्य दिवस


Diwali 2025– Diwali Puja – लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाची पूजा आहे, जी अश्विन महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. या दिवशी, लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी एक विशेष महत्त्व असते कारण या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थळ शोधते.

  • लक्ष्मी देवीचे महत्त्व :- लक्ष्मी देवी समृद्धी, ऐश्वर्य आणि धनाची देवी मानली जाते. तिच्या पूजेसाठी या दिवशी घरातून दारिद्र्य आणि अलक्ष्मी घालवून टाकणारी केरसुणी देवीचे पूजनही केले जाते. केरसुणी ही देवी स्वरूप मानली जाते आणि तिचे महत्व यामध्ये विशेष आहे. म्हणून, या दिवशी घरात पवित्रता आणि आनंद निर्माण करण्यासाठी भक्तगण विशेष तयारी करतात.
  • Diwali Puja पूजा विधी :- लक्ष्मीपूजनाच्या विधीत, सर्वप्रथम अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवर लक्ष्मीची स्थापना केली जाते, ज्यासाठी अक्षतांचा वापर केला जातो. त्यानंतर, लक्ष्मी देवीसाठी गायीच्या दूधाचा खवा तयार करून त्यात लवंग, वेलची आणि साखर घालून नैवेद्य दाखवला जातो. याशिवाय, गूळ, साळीच्या लाह्या, धने, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला अर्पण केले जातात. या अर्पणानंतर, हे पदार्थ आप्तेष्टांसोबत्त वाटले जातात, ज्यामुळे पारिवारिक व सामाजिक एकोपा आणि सामुदायिकता वृद्धिंगत होते.

Mahalakshmi Mantra- महालक्ष्मी मंत्र

महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी खालील मंत्र उच्चारण केल्यास समृद्धी, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धी प्राप्त होते:

ॐ श्रीं महालक्ष्म्यै च विद्महे
विश्वेश्वर्यै च धीमहि
तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।

महालक्ष्मी मंत्र


“ॐ श्रीं महालक्ष्म्यै च विद्महे, विश्वेश्वर्यै च धीमहि, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।” या मंत्राचे जप केल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात धन-समृद्धी येते. मंत्र जपताना लक्ष्मी देवीच्या प्रतिमेसमोर बसून मन एकाग्र करून जप करणे अत्यंत लाभदायक आहे.

धनाची पूजा

लक्ष्मीपूजनाच्या वेळी, चलनी नोटा, नाण्या, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग या विशेष प्रसंगी फटाके उडवून आनंद साजरा करतो, ज्यामुळे दिवाळीच्या उत्सवाची उधळण होते. यामुळे वातावरणात उत्साह आणि आनंद निर्माण होतो.

  • लक्ष्मीच्या स्वागताची परंपरा – अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी भक्तगण विविध प्रकारच्या तयारी करतात. या रात्री लक्ष्मी ज्या घरात वास्तव्य करते, तिथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील व्यक्ती असणे आवश्यक आहे. या आख्यायिकेने लक्ष्मीच्या पूजेला आणखी एक आध्यात्मिक आयाम दिला आहे.
  • साजरा करण्याची पद्धत- दिवाळीच्या उत्सवादरम्यान लोक आपल्या घरांना, मंदिरांना आणि कार्यस्थळांना दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी उजळतात. प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. फटाके व रांगोळी यांसारख्या सजावटांनीही दिवाळीचे वातावरण गजबजलेले असते. या सणात मिठाई, मेजवानी आणि कुटुंबांसाठी एकत्र येणे याला विशेष महत्त्व आहे.
DIWALI 2024 MARATHI SONG RELATED TO CELEBRATION OF DIWALI, SOURCE YOUTUBE

सामुदायिक उत्सव


दिवाळी हा केवळ कुटुंबांमध्येच नाही, तर शहरी भागात समुदायाच्या एकत्र येण्याचा कालावधी आहे. हिंदू, जैन आणि शीख लोक सणाच्या काळात आपल्या कुटुंबाला दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात, ज्यामुळे प्रेम आणि एकतेचा अनुभव मिळतो.

पारंपरिक, सांस्कृतिक, जागतिक महत्त्व


Diwali 2024- दिवाळी हा हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. लक्ष्मीपूजनाचा मुख्य दिवस फिजी, गयाना, भारत, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, सिंगापूर, श्रीलंका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस आहे. यामुळे या सणाची जागतिक महत्त्वाचीही ओळख आहे.

चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणासह परत आले ते याच दिवशी. म्हणून सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. प्रकाश निर्माण करून अंधार दूर करणारा दीप मांगल्याचे प्रतीक असणारा असा हा सण आहे. मानवीय जीवनातील अंधकार प्रकाशाने दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. महाराष्ट्रात व इतर कित्येक ठिकाणी लहान मुले या काळात मातीचे किल्ले तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडून खेळतात.

दिवाळी हा पावसाळ्यातील समृद्धीचा, आनंदाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. या दिवसांत सायंकाळी लोक आपल्या घराच्या दारांवर रांगोळ्या काढून पणत्या लावतात. घरांच्या दारात आकाशदिवे सजवले जातात, ज्यामुळे वातावरणात आनंद आणि प्रकाश पसरतो.

महाराष्ट्रातील प्राचीन परंपरा


महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी, लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्या किल्ल्यावर मातीची खेळणी मांडली जातात आणि धान्य पेरले जातात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची ठोस नोंद नाही, परंतु त्याचे आपल्या संस्कृतीत एक खास स्थान आहे.

निष्कर्ष Diwali 2025


दिवाळी हा सण केवळ एक धार्मिक उत्सव नसून, तो मानवाच्या जीवनातील आनंद, समृद्धी आणि एकतेचा प्रतीक आहे. या सणाच्या माध्यमातून अज्ञानावर ज्ञानाचा, अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. विविध परंपरा आणि संस्कृतींचा समावेश असलेली दिवाळी, प्रत्येक धर्माच्या अनुयायांसाठी विशेष महत्वाची आहे. जैन, शीख, बौद्ध आणि हिंदू धर्मातील विविध पद्धतींमुळे या सणाची गोडी वाढते.

लक्ष्मीपूजन, दीपकांची सजावट, रांगोळ्या आणि मिठाई यांसारख्या परंपरांनी दिवाळीच्या उत्सवात एक अनोखी भव्यता आणली आहे. दिवाळीच्या काळात घरातील पवित्रता, प्रेम आणि सामुदायिक एकता यांची प्रचिती मिळते. या सणाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशाचा स्वागत करावा, असे संदेश मिळतो.

दिवाळीचा हा सोहळा, जो आनंद आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे, आपल्या सांस्कृतिक वैभवाची आणि विविधतेची ओळख करतो. त्यामुळे, या उत्सवाला मनःपूर्वक साजरा करून आपल्या परंपरांचे जतन करणे आणि एकत्र येण्याचे महत्त्व ओळखणे अत्यावश्यक आहे. दिवाळी प्रत्येकाच्या जीवनात उजळणी करण्याचा, नव्या आशा आणि संकल्पांची सुरूवात करण्याचा एक अद्वितीय संधी प्रदान करते.

आमच्या इतर ब्लॉगपोस्ट

नरक चतुर्दशी: विजयाचा सण आणि धार्मिक परंपरेचा उत्सव (Narak Chaturdashi-2024)

जगाला भारताने दिलेली अमूल्य देणगी – Dhanteras 2024

वसुबारस: गोमाता आणि गोवंशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पर्व – Vasubaras 2025

दिवाळीच्या संबंधित व्हिडीओ गीत
https://www.youtube.com/watch?v=aNrZkVceFDU
https://www.youtube.com/watch?v=XqDn4LRyl84

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत