Diwali 2025 – भारतीय संस्कृतीचा जागतिक सन्मान: UNESCO च्या ‘Intangible Cultural Heritage’ यादीत भारताच्या दिवाळी उत्सवाचा समावेश झाल्याने भारतीय संस्कृतीसाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरला आहे ! माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) जाहीर केले आहे की “दिवाळी” सणाचा समावेश UNESCO च्या Representative List of the Intangible Cultural Heritage of Humanity मध्ये अधिकृतपणे करण्यात आला आहे. या घोषणेमुळे भारताचा पारंपरिक सण आता जागतिक स्तरावर सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त झाला आहे. UNESCO च्या या यादीत अशा परंपरा, सण आणि संस्कृतींचा समावेश केला जातो ज्यांना मानवी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग मानले जाते. दिवाळीचा समावेश केल्याने भारताचे जागतिक सांस्कृतिक योगदान अधिक दृढ झाले आहे. प्रकाशाचा अंधारावर विजय आणि सदभाव, ऐक्य व आनंदाचा संदेश देणारा हा सण आता मानवजातिच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचा भाग ठरला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली Diwali 2025 बाबत घोषणा
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या अधिकृत X (Twitter) खात्यावर [@MIB_India](https://x.com/MIB_India) द्वारे ही घोषणा करताना लिहिले, “दिवाळी आता अधिकृतपणे UNESCO च्या ‘Intangible Cultural Heritage of Humanity’ यादीत समाविष्ट झाली आहे. भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे!”
सांस्कृतिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या मते, “ही मान्यता भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे आणि तिच्या सजीव परंपरांचे प्रतीक आहे.”
भारत सरकारने या उपक्रमाबद्दल UNESCO चे आभार मानले असून भावी पिढ्यांना भारतीय संस्कृतीचा वारसा जगभर पसरवण्याचे आवाहन केले आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
दिवाळी 2025: प्रकाशाचा उत्सव, समृद्धीचा संकल्प !- Diwali 2025
