नवी दिल्ली : इस्रायलसोबत भारताचे संबंध कायम ठेवावेत की नाही, यावरून केंद्र सरकार आणि डाव्या विचारसरणीच्या नेतृत्वामध्ये नवा वाद उभा ठाकला आहे. परराष्ट्रमंत्री (Dr S Jaishankar ) डॉ. एस. जयशंकर यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विधानावर कडाडून टीका केली असून, इस्रायल हा भारताचा कठीण प्रसंगी साथ देणारा विश्वासू मित्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डॉ. जयशंकर (Dr S Jaishankar ) यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “ज्यांनी कधी चीनच्या दादागिरीवर, डोकलाम आणि गलवानमधील आक्रमकतेवर आपली भूमिका मांडली नाही, अशा मुख्यमंत्र्यांनी इस्रायलसोबतचे कूटनीतिक संबंध तोडण्याची मागणी करणे अत्यंत लाजिरवाणे आहे.”

याउलट, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधला. त्यांनी इस्रायलचे वित्तमंत्री बेजाले स्मोट्रिच यांच्या भारत भेटीचा निषेध नोंदवत म्हटले की, “गाझामध्ये नरसंहार सुरू असताना इस्रायलच्या विस्तारवादी अजेंड्याला प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिनिधीसोबत करार करणे म्हणजे भारताने ऐतिहासिकरित्या पॅलेस्टाईनसोबत ठेवलेली एकात्मता भंग करण्यासारखे आहे.” विजयन यांच्या मते, अशा घडामोडी या प्रदेशात शांततेच्या मार्गावर जाण्यास आडकाठी ठरणाऱ्या आहेत.
Dr S Jaishankar यांचे समाजमाध्यम साईट “x” वरील पोस्ट
भारत-इस्रायल संबंधांबाबत केंद्र सरकारचे स्पष्ट मत आहे की, सुरक्षा, संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात इस्रायल हा देश भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार राहिला आहे. दुसरीकडे, डावे आणि काही प्रादेशिक पक्ष मात्र पॅलेस्टाईन प्रश्नावर इस्रायलविरुद्ध उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने करीत असतात.
केरळचे मुख्यमंत्री श्री पिनराई विजयन यांची समाज माध्यमावरील प्रतिक्रिया पाहण्यासाठी येह्त क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
