राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचे अडकलेले हेलीकॉप्टर, धक्का देऊन बाहेर काढावे लागले !

Vishal Patole

पठानमथिट्टा (केरळ) | बुधवार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान आज एक किरकोळ पण लक्षवेधी घटना घडली. पठानमथिट्टा जिल्ह्यातील प्रमादम स्टेडियम येथे त्यांच्या हेलिकॉप्टरच्या चाकांनी नव्याने केलेल्या काँक्रीटच्या हेलिपॅडमध्ये थोडं खाली बसल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. हवामानातील अचानक बदलामुळे निर्धारित हेलिपॅडऐवजी अखेरच्या क्षणी हा नवीन लँडिंग पॉईंट निवडण्यात आला होता. मात्र, तो हेलिपॅड पूर्णपणे सुकलेला नसल्याने हेलिकॉप्टरच्या चाकांनी काँक्रीटमध्ये थोडं खाली दाब घेतलं. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ कारवाई करून हेलिकॉप्टरला हाताने बाहेर काढलं.

Draupadi Murmu

Draupadi Murmu यांना कोणतीही दुखापत नाही

या घटनेत राष्ट्रपती मुर्मू (Draupadi Murmu)यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यानंतर त्या रस्त्यानेच सबरीमला श्री अयप्पा मंदिराकडे रवाना झाल्या.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्या हेलिपॅडचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आले होते. मात्र, खराब हवामानामुळे तयारीत थोडी घाई झाली असावी, त्यामुळे ही अनपेक्षित घटना घडली, असे प्राथमिक अंदाज आहे.

प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून, पुढील वेळी अशा अडचणी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

समाज माध्यमावरील प्रतीकीर्यांसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

दिवाळी 2025: प्रकाशाचा उत्सव, समृद्धीचा संकल्प !- Diwali 2025

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत