प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी, १७ ऑगस्ट २०२५ रोजी, दिल्ली-एनसीआरमधील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने दोन मोठ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. सुमारे ११,००० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेला अर्बन एक्स्टेंशन रोड-II (UER-II) आणि द्वारका द्रुतगती मार्ग Dwarka Expressway (दिल्ली विभाग) यांचे लोकार्पण झाल्याने राजधानीसह परिसरातील कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या प्रसंगी पंतप्रधानांनी रोहिणी येथे एका रोड शोमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित केले.या सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनीही हजेरी लावली.
अर्बन एक्स्टेंशन रोड-II (UER-II) आणि Dwarka Expressway
काय आहेत प्रकल्प आणि त्याचे फायदे?
अर्बन एक्स्टेंशन रोड-II (UER-II): हा कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग-४४ (अलिपूर) पासून सुरू होऊन मुंडका, बक्करवाला, नजफगढ आणि द्वारका मार्गे राष्ट्रीय महामार्ग-४८ (महिपालपूर) येथे संपतो. या मार्गामुळे दिल्लीत प्रवेश न करता अवजड वाहने शहराबाहेरूनच पुढे जाऊ शकतील. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सिंधु बॉर्डरपासून आयजीआय विमानतळापर्यंतचा प्रवासाचा वेळ जो पूर्वी २ ते २.५ तास लागायचा, तो आता केवळ ४० मिनिटांवर येणार आहे.यामुळे दिल्लीतील बाह्य रिंगरोडवरील वाहनांचा ताण हलका करण्यास हातभार लागेल.
द्वारका द्रुतगती मार्ग (दिल्ली विभाग)
द्वारका द्रुतगती मार्ग (दिल्ली विभाग): एकूण २९ किलोमीटर लांबीच्या द्वारका द्रुतगती (Dwarka Expressway) मार्गापैकी हरियाणातील १९ किलोमीटरचा भाग यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आज पंतप्रधानांनी दिल्लीतील १०.१ किलोमीटर लांबीच्या भागाचे उद्घाटन केले, ज्यासाठी सुमारे ५,३६० कोटी रुपये खर्च आला आहे. हा मार्ग यशोभूमी, दिल्ली मेट्रोच्या ब्लू आणि ऑरेंज लाईन्स, तसेच आगामी बिजवासन रेल्वे स्टेशनला मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
दिल्लीच्या विकासाला चालना
या प्रकल्पांमुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर दिल्ली आणि एनसीआरमधील आर्थिक विकासालाही चालना मिळेल. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विकसित भारताची राजधानी कशी असावी, याचे दिल्ली एक मॉडेल बनावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” या नवीन रस्त्यांमुळे व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना विशेष फायदा होईल, तसेच मालवाहतूक सुलभ झाल्यामुळे नरेला आणि बवाना सारख्या औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाला गती मिळेल. या प्रकल्पांमुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल, असे मानले जात आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील Dwarka Expressway लोकार्पण सोहळ्याचा युटूब वरील व्हिडीओ साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
मोदींच्या भाषणात (Modi Speech) “विकसित भारत- २०४७” ची ब्लू प्रिंट !
