सर्व घरगुती LPG ग्राहकांसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य – जाणून घ्या कशी करावी घरबसल्या LPG e-KYC !

Vishal Patole

भारत सरकारच्या Ministry of Petroleum and Natural Gas (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय) यांनी देशातील सर्व घरगुती LPG ग्राहकांसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) पूर्ण करणे आवश्यक असल्याची सूचना दिली आहे. या प्रक्रियेमुळे LPG सबसिडी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल तसेच बनावट किंवा डुप्लिकेट कनेक्शनवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आता घरबसल्या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने ई- के.वाय. सी. प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित ऑइल मार्केटिंग कंपनीचे मोबाईल अ‍ॅप आणि आधारची फेस ऑथेंटिकेशन प्रणाली वापरणारे Aadhaar FaceRD App डाउनलोड करणे आवश्यक आहे. स्मार्ट मोबाईल धारकांसाठी घरबसल्या LPG e- KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया खली दिली आहे.

e-KYC

e-KYC का आवश्यक आहे?

LPG ग्राहकांची ओळख पडताळणी करून सरकारचा उद्देश सबसिडीचा योग्य लाभ मिळणे, फसवणूक रोखणे आणि वितरण व्यवस्था पारदर्शक बनवणे हा आहे. ई- के.वाय. सी. पूर्ण केल्यास ग्राहकांच्या आधार क्रमांकाशी LPG कनेक्शनची माहिती जोडली जाईल आणि लाभ थेट पात्र ग्राहकांनाच मिळेल.

घरबसल्या e-KYC कशी करावी?

Aadhaar FaceRD App Android मोबाईलवर डाउनलोड करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

घरबसल्या LPG e-KYC किंवा आधार फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी Aadhaar FaceRD App मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. खाली Android मोबाईलवर हे अ‍ॅप डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया दिली आहे.

1️⃣ Google Play Store उघडा

सर्वप्रथम आपल्या Android मोबाईलमध्ये Google Play Store अ‍ॅप उघडा.

2️⃣ Search पर्याय वापरा

Play Store च्या वरच्या बाजूला असलेल्या Search Bar मध्ये
“Aadhaar FaceRD” असे टाइप करा.

3️⃣ अधिकृत अ‍ॅप निवडा

सर्च केल्यानंतर Aadhaar FaceRD App नावाचे अ‍ॅप दिसेल.
हे अ‍ॅप सहसा Unique Identification Authority of India (UIDAI) द्वारे अधिकृतपणे उपलब्ध असते.

किंवा येथे क्लिक करून आधार फेस आर डी Aadhaar FaceRD App नावाचे अ‍ॅप मिळवा

4️⃣ Install बटणावर क्लिक करा

अ‍ॅपच्या बाजूला दिसणाऱ्या Install बटणावर क्लिक करा.

5️⃣ अ‍ॅप डाउनलोड होईपर्यंत थांबा

काही सेकंदात अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल होईल.

6️⃣ Open बटणावर क्लिक करा

डाउनलोड पूर्ण झाल्यावर Open बटणावर क्लिक करून अ‍ॅप सुरू करा.

  1. आपण वापरत असलेल्या LPG कंपनीचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा.
  2. pmuy.gov.in/e-kyc.html हि लिंक ब्राउजरला ओपन करून किंवा या दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण वापरत असलेल्या LPG कंपनीचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करू शकतो
  3. मोबाईलमध्ये Aadhaar FaceRD App इन्स्टॉल केलेले असणे आवश्यक आहे.
  4. मोबाईल अ‍ॅप ओपन करून LPG कनेक्शनशी संबंधित माहिती भरून e-KYC पर्याय निवडा.
  5. आधार फेस ऑथेंटिकेशनद्वारे आपली ओळख पडताळा.
  6. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर e-KYC यशस्वी झाल्याची पुष्टी मिळेल.

e-KYCपर्यायी मार्ग

ज्यांना मोबाईलद्वारे प्रक्रिया करता येत नाही, त्यांनी आपल्या जवळच्या LPG वितरकाकडे जाऊन बायोमेट्रिक पडताळणीद्वारे e-KYC पूर्ण करू शकतात.

मदतीसाठी संपर्क

अधिक माहितीसाठी ग्राहक खालील पर्यायांचा वापर करू शकतात:

  • अधिकृत संकेतस्थळ: PMUY e-KYC Portal
  • आपल्या LPG वितरकाशी संपर्क साधा
  • टोल-फ्री हेल्पलाइन: 1800 2333 555

सरकारचे आवाहन

पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व LPG ग्राहकांना लवकरात लवकर e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण केल्यास LPG सेवा आणि सबसिडी मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत