हंसलपूर (गुजरात) :आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठी झेप घेत, Made in India बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (BEV) ई-व्हिटारा (e-VITARA) चे जागतिक स्तरावर निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे. आता हे भारतीय बनावटीचे इलेक्ट्रिक वाहन जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये पोहोचणार आहे. आज दि. २८/०८/२०२५ रोजी हंसलपूर, अहमदाबाद येथील सुझुकी मोटर प्लांटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी संचालक तोशिहिरो सुझुकी यांच्या उपस्थितीत या वाहनाचे लोकार्पण झाले. या सोहळ्याला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल देखील उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत केवळ वाहन उत्पादनासाठीच नाही तर स्वच्छ ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणाऱ्या तंत्रज्ञानासाठीही जगात नवे मानक निर्माण करीत आहे.” त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेखाली देशातील उद्योगक्षेत्राच्या प्रगतीवर भर दिला.
e-VITARA
ई-व्हिटारा (e-VITARA) ही सुझुकीची पहिली ग्लोबल स्ट्रॅटेजिक बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल (BEV) मानली जात असून, ती भारतातील उत्पादन क्षमतेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे. इंडियन मार्केटसह जागतिक ग्राहकांसाठीही एक विश्वासार्ह, पर्यावरणपूरक पर्याय म्हणून ही गाडी उपलब्ध होईल.
ई-व्हिटारा (e-VITARA) हे पूर्णपणे भारतात तयार केलेले एक आधुनिक इलेक्ट्रिक वाहन असून, आता त्याची निर्यात 100 पेक्षा अधिक देशांमध्ये होणार आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे हे पहिले जागतिक रणनीतिक बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (BEV) म्हणून ओळखले जात आहे. या उपक्रमामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला बळ मिळणार असून हरित ऊर्जा व पर्यावरणपूरक वाहतुकीकडे टाकलेले हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हंसलपूर, गुजरात येथील कार्यक्रमात भाषण करताना सांगितले की, “मेड इन इंडिया इलेक्ट्रिक वाहने आता जागतिक पातळीवर झेप घेत आहेत.” हरित ऊर्जेवर आधारित वाहतुकीत भारताची वाढती क्षमता आणि सामर्थ्य याचे हे प्रतिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदी यांनी यावेळी भारतीय उद्योगांची प्रगती, तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि हरित गतिशीलतेकडे होत असलेल्या सकारात्मक बदलांचा विशेष उल्लेख केला.
उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, भारतातील वाहन उद्योगासाठी हे पाऊल ऐतिहासिक असून, इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये भारताचा जागतिक सहभाग आता अधिक वाढणार आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची समाज माध्यमावरील प्रतिक्रिया.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
इस्रोची ऐतिहासिक कामगिरी : गगनयान (Gaganyan) मोहिमेसाठी पहिली समन्वित एअर ड्रॉप चाचणी यशस्वी.
