देवशयनी आषाढी (Ekadashi) एकादशीच्या पवित्र दिवशी आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि कन्या द्विजा यांच्यासह पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. महापूजेच्या निमित्ताने मानाच्या वारकरी दाम्पत्याचे – श्री कैलास दामू उगले व सौ. कल्पना कैलास उगले – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
- Ekadashi महापुजे दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले
- Ekadashi महापुजेनिमित्त ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार
- शासकीय महापुजेवेळी ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देखील वितरीत केले गेले
- मुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया वरील उद्गार:
- Ekadashi महापुजेनिमित्त मंत्रीमंडळातील मान्यवरांची उपस्थिती
- रुप पाहतां लोचनीं
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EKADASHI निमित्त दिल्या शुभेच्छा

Ekadashi महापुजे दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले
वारी ही भक्तीचा महोत्सवच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा ध्यास – अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी महापुजे दरम्यान आपले मनोगत व्यक्त केले, ते पुढे म्हणाले-
“वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक परिवर्तनाचं माध्यम आहे. यंदा स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित व पर्यावरणपूरक वारीही यशस्वी झाली.“
“हजारो वारकरी कुठल्याही तक्रारीशिवाय हरिनामाच्या गजरात पायी पंढरीकडे निघतात. त्यात युवकांचा वाढता सहभाग विशेष उल्लेखनीय आहे.“
“वारीत प्रत्येक वारकरी दुसऱ्यात पांडुरंग पाहतो, ही भक्तिभावपूर्ण परंपरा संपूर्ण जगात दुर्मीळ आहे. विठ्ठल-रखुमाईच्या चरणी प्रार्थना आहे की राज्यातील संकटं दूर होवोत, शेतकऱ्यांचं कल्याण होवो आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडो.“
Ekadashi महापुजेनिमित्त ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार
शासकीय महापुजेवेळी ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देखील वितरीत केले गेले
दिंड्यासुरु असताना उत्कृष्ट सामाजिक प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना हे पुरस्कार दिले जातात
सामाजिक प्रबोधन करणाऱ्यांचा सन्मान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला त्यामध्ये प्रथम पारितोषिक श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३ (तुकाराम महाराज पालखी) ने पटकाविला .
प्रथम क्रमांक – श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 13 (तुकाराम महाराज पालखी)
₹1 लाखाचे बक्षीस + सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक – श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक 19 (ज्ञानेश्वर महाराज – रथापुढे)
₹75 हजारांचे बक्षीस + सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक – श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक 23 (ज्ञानेश्वर महाराज – रथामागे)
₹50 हजारांचे बक्षीस + सन्मानचिन्ह
मुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया वरील उद्गार:
🔹 “महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी, ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.”
— @Dev_Fadnavis
🔗 X वर पाहा
🔹 “श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मंदिरात आता VIP दर्शनावर मर्यादा.”
— @Dev_Fadnavis
Ekadashi महापुजेनिमित्त मंत्रीमंडळातील मान्यवरांची उपस्थिती
शासकीय महापूजेच्या या कार्यक्रमावेळी मंत्री मंडळातील काही मान्यवर मंत्री देखील आवर्जुन उपस्थित राहिले त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले व महापूजेत आपला सक्रीय सहभाग नोंदविला. महापुजेला उपस्थित राहिलेल्या मंत्र्यांची नावे –
- मंत्री गिरीश महाजन
- मंत्री जयकुमार गोरे
- मंत्री संजय सावकारे
- मंत्री आकाश फुंडकर
- विठ्ठल मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
- अन्य लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी
रुप पाहतां लोचनीं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय महापूजेनंतर समाज माध्यम साईट “X” प्रतिक्रिया देतांना रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥ या ओव्यांचा वापर करत पुढे म्हंटले कि, ” देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता व कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समाज मध्याम्वरील प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EKADASHI निमित्त दिल्या शुभेच्छा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भाविकांना EKADASHI निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. समाज मध्यम “X” वर एक मराठी भाषेत पोस्ट लिहून पंतप्रधान मोदींनी सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा देत म्हंटले कि, “आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या.”
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
ठाकरे (Thakre) बंधूंची एकजूट: सत्तेच्या राजकारणात नवा अध्याय की मराठी अस्मितेचा मुखवटा?
