आज दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत “लहुजी शक्ती सेना राज्यव्यापी मातंग कार्यकर्ता संवाद मेळावा” पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने मातंग समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde यांचे भाषण
उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात समाजाच्या प्रबोधनासाठी व समाज upliftment साठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. “लहुजी वस्ताद साळवे हे समाजसुधारक होते. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्व घटकांच्या प्रगतीसाठी आपण एकत्र काम करणे गरजेचे आहे,” असे शिंदे म्हणाले.
त्यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे, लहूजी वस्ताद साळवे यांचा गौरव, लहूजी वस्ताद साळवे यांच्या दांडपट्ट्याला आज सरकार ने “राज्यशस्त्र” म्हणून घोषित केल्याचे देखील ते बोलले. पुढे ते म्हणाले मातंग समाज हा एक वाचनी आहे, इमानदार आणि शब्द पाळणारा समाज आहे.
आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून ते सर्वसामान्यांसाठी असेच पुढे देखील कार्य करत राहील असे ते म्हणाले
आरक्षणाची अ, ब, क, ड वर्गवारी होईल, तसेच समाजाचे जे काही प्रश्न आहेत काही शोर्ट टर्म असतील काही लॉंग टर्म प्रश्न असतील त्यांना सोडवले जातील
आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून ते सर्वसामान्यांसाठी असेच पुढे देखील कार्य करत राहील असे ते म्हणाले
मेळाव्यात विविध जिल्ह्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या आणि प्रश्न मांडले. शिक्षण, रोजगार, आरक्षण तसेच युवकांना संधी यावर प्रामुख्याने चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व प्रश्नांचे सकारात्मक निवारण करण्याचा प्रयत्न होईल, अशी हमी कार्यकर्त्यांना दिली.
सभागृहात झालेल्या या संवाद कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण होते. “लहुजी शक्ती सेना”च्या नेत्यांनी मातंग समाजाच्या मजबूत संघटनासाठी व राजकीय सहभाग वाढवण्यासाठी पुढील कृती आराखडा सादर केला.
या कार्यक्रमाचा समाज माध्यमावरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
इस्रोची ऐतिहासिक कामगिरी : गगनयान (Gaganyan) मोहिमेसाठी पहिली समन्वित एअर ड्रॉप चाचणी यशस्वी
