रवींद्र जडेजाची एकेरी झुंज निष्फळ ठरली भारतीय संघाचा २२ धावांनी पराभव ! – Eng Vs Ind

Vishal Patole
ENG VS IND

Eng Vs Ind- अष्टपैलू खिलाडू रवींद्र जडेजा खेळपट्टीवर शेवटपर्यंत टिकून राहिला त्याने एकेरी 181 चेंडूंचा सामना करत चार चौकार आणि एक षटकार लगावत दुसऱ्या भारतीय डावातील पहिले अर्धशतक ठोकत 61 धावा पूर्ण केल्या तो शेवटपर्यंत नाबाद राहिला परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळू शकली नाही त्यामुळे एका बाजूने भारतीय संघाच्या विकेट पडत राहिल्या व शेवटी 170 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला व इंग्लंड संघाने सामना २२ धावांनी जिंकला.

Eng Vs Ind

इंग्लंड संघाच्या वतीने आर्चर आणि स्टोक्सने सर्वोत्तम गोलंदाजी करत प्रत्येकी 3-3 भारतीय फलंदाज बाद केले. कार्स ने दोन बळी घेतले तर वोक्स आणि बाशिरला प्रत्येकी 1-1 बळी मिळविण्यात यश आले.

भारत – 170 ,

रवींद्र जडेजा नाबाद – 61/181, दोन चौकार आणि एक षटकार

के एल राहुल – 39/58, सहा चौकार.

भारत दुसरी डाव (लक्ष्य: 193 धावा)

बल्लेबाजी:

फलंदाजप्रकारधावाचेंडूमिनिटे4s6sस्ट्राइक रेट
यशस्वी जैस्वाल(यष्टीरक्षक) स्मिथ द्वारा झेलबाद, आर्चरने बाद केला078000.00
के. एल. राहुलस्टोक्सने एल्बीडब्ल्यू बाद39581226067.24
करुण नायरकार्सने एल्बीडब्ल्यू बाद1433481042.42
शुभमन गिल (कर्णधार)कार्सने एल्बीडब्ल्यू बाद69121066.66
आकाश दीपस्टोक्सने बोल्ड11115009.09
ऋषभ पंत †आर्चरने बोल्ड912152075.00
रवींद्र जडेजानाबाद611812664133.70
वॉशिंग्टन सुंदरआर्चरने झेलबाद व बोल्ड044000.00
नितीश कुमार रेड्डी†स्मिथने झेलबाद, वोक्सने बाद केला1353721024.52
जसप्रीत बुमराह(यष्टीरक्षक)उपखेलाडू (एसजे कूक) ने झेलबाद, स्टोक्सने बाद554104109.25
मोहम्मद सिराजशोएब बशीरने बोल्ड430640013.33

अतिरिक्त: (बाय 9, नो बॉल 3, वाईड 6) – 18 धावा
एकूण: 170 धावा
74.5 षटकांत
(सरासरी धावा दर: 2.27)

इंग्लंड संघ दुसरा डाव गोलंदाजी

गोलंदाजी (इंग्लंड – भारताचा दुसरा डाव):

गोलंदाजषटकेमेडनधावाबळीइकॉनॉमीवाइडनो बॉल
क्रिस वोक्स1252111.7500
जोफ्रा आर्चर1615533.4310
बेन स्टोक्स2444832.0002
ब्रायडन कार्स1623021.8711
जो रूट10101.0000
शोएब बशीर5.51611.0200
Eng vs Ind

Eng Vs Ind – पाचव्या दिवशी खेळाची सुरुवात झाली तेव्हा सलामीवीर के एल राहुल आणि भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी डावाची सुरुवात केली ते सुरुवातील चांगले लयात दिसत होते मात्र आर्चर ने रिषभ पंत ला त्रिफळाचीत बाद केले तेव्हा तो ९ धावांवर खेळत होता. त्याच्या नंतर फलंदाजीस उतरेलेला रवींद्र जडेजा याने राहुल सोबत केवळ 10 भागीदारी झाली तोच राहुल स्टोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला त्याने 58 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 39 धावा काढल्या. त्याच्यानंतर फलंदाजीस आलेला वाशिंगटन सुंदर शून्यावर बाद झाला त्याने केवळ चार चेंडूंचा सामना केला. नंतर मात्र रवींद्र जडेजा आणि नितीशकुमार रेड्डी दरम्यान एकूण 30 धावांची भागीदारी झाली असताना व हे दोघे सामना काढतील असे वाटत असतानाच अचानक वोक्सच्या चेंडूवर यष्टीरक्षक स्मिथ च्या हाती झेल देत रेड्डी बाद झाला. अशाप्रकारे भारतीय संघ 123/8 या धावसंख्येवर खेळत आहे. रवींद्र जडेजा नाबाद 66 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 24 धावा काढून खेळत आहे, तर जसप्रीत बुमराहने नाबाद 11 चेंडूंचा सामना करून एक चौकार ठोकला आहे. भारतीय सामना जिंकण्यासाठी अजून 70 धावांची गरज तर इंग्लंड संघाला केवळ दोन विकेट्स मिळविण्याची आवश्यकता.

Eng Vs Ind – तिसऱ्या सामन्याचा चौथा दिवस हा गोलंदाजांनी गाजविला, प्रथम भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा संपूर्ण संघ 192 धावात गुंढाळला, त्यामुळे भारतीय संघापुढे विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य उभे राहिले. परंतु गोलंदाजांच्या नावे राहिलेल्या चौथ्या दिवशी लॉर्डस टेस्ट मध्ये 193 धावांचा पाठलाग करताना भारत 54/4 अशी अवस्था झाली कारण इंग्लंडच्या गोलंदाजांनी चौथ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रातील अंतिम 17.4 ओव्हरमध्ये 4 भारतीय फलंदाज बाद केले. विजयासाठी भारतीय संघाला आणखी 135 धावांची गरज आहे. त्यागोदर भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात 5 टेस्ट सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीत आहेत.

Eng Vs Ind

लॉर्ड्स येथे खेळल्या जात असलेल्या या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या शेवटी इंग्लंडचा डाव 192 धावात गुंढाळला गेला त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 193 धावांची गरज असताना चौथ्या दिवसाच्या अंतिम सत्रातील उर्वरित 17-18 ओव्हर बाकी असल्याने आपल्या दुसऱ्या डावातील आणि तिसऱ्या सामन्याची निर्णायक फलंदाजी करण्यास भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला मात्र वरच्या फळीतील फलंदाजांनी भारतीय चाहत्यांना निराश केले. कारण अवघ्या 54 धावांवर भारतीय संघाचे 4 प्रमुख फलंदाज बाद झाले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल विकेटच्या मागे स्मिथच्या हातात झेल देऊन आर्चर च्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता बाद झाला त्याने केवळ 7 चेंडूंचा सामना केला. त्यानंतर खेळपट्टीवर आलेले दोन प्रमुख फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत. जैस्वाल नंतर खेळावयास आलेला करून नायर याने एकूण 33 चेंडूंचा सामना करत थोडाफार प्रतिकार केला परंतु तो 1 चौकाराच्या मदतीने वैय्यक्तिक 14 धावांवर खेळत असताना कार्सच्या आत येणाऱ्या चेंडूवर पायचीत बाद झाला. त्याच्या तंबू त परतल्यानंतर भारतीय संघाचा कप्तान शुभमन गिलने सूत्रे हाथी घेतली मात्र तो केवळ 6 धावसंख्येवर खेळत असताना कार्सच्याच चेंडूवर पायचीत बाद झाला त्याने 9 चेंडूंचा सामना केला. चौथ्या दिवसाचा खेळ संपता संपता नाईट वाचमन फलंदाज म्हणून खेळपट्टीवर आलेला भारतीय गोलंदाज आकाशदीप हा 11 चेंडूंचा प्रतिकार करून वैयक्तिक 1 धावसंख्येवर असताना स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद झाला व भारताची 54/4 अशी दयनीय अवस्था झाली. भारतीय फलंदाजीसाठी चौथ्या दिवसाच्या खेळाची जमेची बाजू एवढीच कि, के. एल. राहुल हा सलामीवीर अजूनही नाबाद आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होईल तेव्हा त्याच्या खेळावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

भारत दुसरा डाव (लक्ष्य: १९३ धावा)

फलंदाजी:

एकूण:
१७.४ षटकांत
४ बाद/५८ धावा
(गती: ३.२८ धावा प्रति षटक)

फलंदाजधावाचेंडूचौकारषटकारस्ट्राईक रेट
यशस्वी जयस्वाल
(यष्टीरक्षक).स्मिथ झेल – आर्चर चेंडूवर बाद
० (७)० चौकार० षटकारSR: ०.००

के. एल. राहुल
नाबाद
३३ (४७) | ६ चौकार | ० षटकार | SR: ७०.२१

करुण नायर
एल्बीडब्ल्यू – कार्स
१४ (३३) | १ चौकार | ० षटकार | SR: ४२.४२

शुभमन गिल (कर्णधार)
एल्बीडब्ल्यू – कार्स
६ (९) | १ चौकार | ० षटकार | SR: ६६.६६

आकाश दीप
बोल्ड – स्टोक्स
१ (११) | ० चौकार | ० षटकार | SR: ९.०९

अतिरिक्त धावा: (lb ३, nb १) – ४

दुसऱ्या डावात 62.1 ओव्हर मध्ये इंग्लंडच्या संघाने 192 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या सेशन मध्ये चिवट खेळी खेळणारा इंग्लंडचा संघ तिसऱ्या सेशन मध्ये मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ढेपाळताना दिसला आहे. मालिकेत झालेल्या अगोदरच्या दोन सामन्यात सध्या दोन्ही संघ एक – एक सामना जिंकून बरोबरीत आहेत. तिसऱ्या सेशनची आणि खेळातील चौथ्या दिवसाच्या खेळाची विशेषता म्हणजे वाशिंगटन सुंदरची फिरकी ठरली आहे, सुंदरने अतिशय सुरेख गोलंदाजी करत आपल्या 12.1 ओव्हर मध्ये 1.80 च्या इकोनोमी रेट ने केवळ 22 धावा देत इंग्लंड च्या चार प्रमुख फलंदाज जो रूट (40/96), बेन स्टोक्स (33/96), जेमी स्मिथ (8/14) आणि शोयब बशीर (2/9) या सर्वांना त्रिफळाचीत बाद केले. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले तर रेड्डी आणि आकाशदीप यांना प्रत्येकी एक बळी मिळविण्यात यश आले आहे.

Eng Vs Ind

Eng Vs Ind – मालिका अपडेट

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात 5 टेस्ट सामन्यांची मालिका खेळत आहे यापैकी Eng Vs Ind मधील लॉर्डस येथे सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत लॉर्डस च्या मैदानात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व 387 धावांवर त्यांचा संपूर्ण संघ बाद झाला त्यानंतर भारतीय संघ देखील आपल्या पहिल्या डावात केवळ 387 च धावा करू शकला. सध्या खेळाचा चौथा दिवस सुरु असून इंग्लंडचा संघ त्यांचा दुसरा डाव खेळत आहे तर इंग्लंड 144/4 या धावसंख्येवर खेळत आहे. जो रूट खेळपट्टीला चिटकून बसला आहे त्याने 95 चेंडूंचा सामना करत एका चौकाराच्या मदतीने 40 धावा करून खेळत आहे तर त्याला इंग्लंड संघाचा कप्तान बेन स्टोक्सची उक्तृष्ट साथ लाभत आहे स्टोक्स ने 64 चेंडूंचा सामना करत दोन चौकारांच्या मदतीने 22 करून खेळत आहे.

मोहम्मद सिराजने इंग्लंडचे दोन फलंदाज तंबूत परतवले आहेत त्याने बेन डकेत (12/12) याला बुमराह च्या हाथी झेलबाद तर ओली पोपला (4/17) पायचीत बाद केले. आकाशदीप ने हॅरी ब्रूक ला त्रिफळाचीत बाद केले तर झॅक क्रॉलीला (22/49) जैस्वाल च्या हाथी झेलबाद करत रेड्डी ने एक बळी टिपला. जसप्रीत बुमराहला अजून विकेट मिळाली नसली तरी त्याने इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला आहे तसेच इंग्लंडचे फलंदाज त्याला सावधपणे खेळताना दिसत आहेत.

Eng Vs Indइंग्लंडची दुसरी डावातील फलंदाजी
(England 2nd Innings Batting )

इंग्लड – 133/4 (35.5 ओव्हर), आणखी आजच्या दिवसाच्या खेळत 55 ओव्हर बाकी

फलंदाजधावाचेंडूचौकारषटकारस्ट्राइक रेट
झॅक क्रॉली
जैस्वाल कॅच, नीतीश कुमार रेड्डीने बाद22493044.89
बेन डकेट
बुमराह कॅच, मोहम्मद सिराजने बाद121210100.00
ओली पोप
एल्बीडब्ल्यू, मोहम्मद सिराज4171023.52
जो रूट
नाबाद18441040.90
हॅरी ब्रूक
बोल्ड आकाश दीप231941121.05
बेन स्टोक्स (कर्णधार)
नाबाद2160012.50

अतिरिक्त धावा: (बाय 17, लेग बाय 1, नो बॉल 1) – 19
एकूण धावा: 100/4
एकूण षटकं: 25.6
सरासरी धावगती (RR): 3.84

बाकी फलंदाज:
जेमी स्मिथ (यष्टीरक्षक),
ख्रिस वोक्स,
जोफ्रा आर्चर,
ब्रायडन कार्स,
शोएब बशीर

बाद झाल्याचे क्रम:

  • 1-22 (बेन डकेट, 5.5 षटक)
  • 2-42 (ओली पोप, 11.6 षटक)
  • 3-50 (झॅक क्रॉली, 14.4 षटक)
  • 4-87 (हॅरी ब्रूक, 21.3 षटक)

Eng Vs Ind – भारताची गोलंदाजी – इंग्लंडचा दुसरा डाव

गोलंदाजषटकंमेडनधावाबळीइकॉनॉमीवाईडनो बॉल
जसप्रीत बुमराह8.012603.2500
मोहम्मद सिराज7.021121.5700
नीतीश कुमार रेड्डी5.012014.0000
आकाश दीप5.622514.1601

Eng Vs Ind – भारताची पहिली डावातील फलंदाजी
(India 1st Innings Batting )

भारत पहिला डाव – एकूण धावा: 387/10

फलंदाजधावाचेंडूचौकारषटकारस्ट्राइक रेट
यशस्वी जैस्वाल
ब्रूक कॅच, आर्चरने बाद13830162.50
के. एल. राहुल
ब्रूक कॅच, शोएब बशीरने बाद10017713056.49
करुण नायर
रूट कॅच, स्टोक्सने बाद40624064.51
शुभमन गिल (कर्णधार)
(यष्टीरक्षक) स्मिथ कॅच, वोक्सने बाद16442036.36
ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
धावबाद (स्टोक्स)741128266.07
रवींद्र जडेजा
(यष्टीरक्षक) स्मिथ कॅच, वोक्सने बाद721318154.96
नीतीश कुमार रेड्डी
(यष्टीरक्षक) स्मिथ कॅच, स्टोक्सने बाद30914032.96
वॉशिंग्टन सुंदर
ब्रूक कॅच, आर्चरने बाद23761130.26
आकाश दीप
ब्रूक कॅच, कार्सने बाद7100170.00
जसप्रीत बुमराह
(यष्टीरक्षक) स्मिथ कॅच, वोक्सने बाद08000.00
मोहम्मद सिराज
नाबाद02000.00

अतिरिक्त धावा: (बाय 3, लेग बाय 3, नो बॉल 5, वाईड 1) – 12
एकूण धावा: 387
एकूण षटकं: 119.2
सरासरी धावगती (RR): 3.24

Eng Vs Ind – इंग्लंडची पहिली डावातील फलंदाजी
(England 1st Innings Batting )

एकूण धावा: 387/10

फलंदाजधावचेंडूमिनिटेचौकारषटकारस्ट्राइक रेट
झॅक क्रॉली
(यष्टीरक्षक) पंत कॅच, नीतीश कुमार रेड्डीने बाद1843674041.86
बेन डकेट
(यष्टीरक्षक) पंत कॅच, नीतीश कुमार रेड्डीने बाद2340643057.50
ओली पोप
(यष्टीरक्षक) सब (डीसी जुरेल) कॅच, जडेजाने बाद441041694042.30
जो रूट
बोल्ड बुमराह10419933110052.26
हॅरी ब्रूक
बोल्ड बुमराह1120202055.00
बेन स्टोक्स (कर्णधार)
बोल्ड बुमराह441101284040.00
जेमी स्मिथ †
(यष्टीरक्षक) सब (डीसी जुरेल) कॅच, मोहम्मद सिराजने बाद51561066091.07
ख्रिस वोक्स
(यष्टीरक्षक) सब (डीसी जुरेल) कॅच, बुमराहने बाद012000.00
ब्रायडन कार्स
बोल्ड मोहम्मद सिराज56831286167.46
जोफ्रा आर्चर
बोल्ड बुमराह411141036.36
शोएब बशीर
नाबाद110150010.00

अतिरिक्त धावा: (बाय 11, लेगबाय 13, नो बॉल 2, वाईड 5) – 31
एकूण धावा: 387
एकूण षटकं: 112.3
सरासरी धावगती (RR): 3.44

Eng Vs Ind भारताची गोलंदाजी – इंग्लंडच्या पहिल्या डावात
(India Bowling – England 1st Innings)

गोलंदाजषटकंमेडनधावाबळीइकॉनॉमीवाईडनो बॉल
जसप्रीत बुमराह27.057452.7400
आकाश दीप23.039204.0001
मोहम्मद सिराज23.368523.6110
नीतीश कुमार रेड्डी17.006223.6400
रवींद्र जडेजा12.012912.4101
वॉशिंग्टन सुंदर10.012102.1000

BCCI समाज माध्यमावरील Eng Vs Ind अपडेट.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

Eng Vs Ind- भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील ― दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला हरवले ! – Ind Vs Eng

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत