भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गगनयान (Gaganyan) मोहिमेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. इस्रोने २५ ऑगस्ट २०२५ रोजी पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट (IADT-01) यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, या चाचणीच्या माध्यमातून पॅराशूट-आधारित डिसेलेरेशन सिस्टम चे पूर्ण तांत्रिक प्रात्यक्षिक करण्यात आले.ही चाचणी भारतीय वायुदल, DRDO, भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडली. इस्रोच्या अधिकृत एक्स अकाऊंट वरून दिलेल्या माहितीनुसार, गगनयानच्या भावी मोहिमांसाठी अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हा या पॅराशूट प्रणालीचा मूलभूत उद्देश आहे.

Gaganyan
Gaganyan या मोहिमेसाठी IADT-01 चाचणीत एअर ड्रॉप प्रणाली अंतर्गत कॅप्सूल पॅराशूट उंचावरून सोडून यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आला. पॅराशूट्स वेळेवर उघडले, गती कमी करण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आणि हे संपूर्ण प्रात्यक्षिक ‘एंड-टू-एंड’ प्रणाली तपासण्यासाठी महत्त्वाचे ठरले.
तज्ज्ञांच्या मते, ही चाचणी हा गगनयान मोहिमेच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात भारतीय अंतराळवीरांना अवकाशातून सुरक्षित परत आणण्यासाठी ही तंत्रज्ञान प्रणाली निर्णायक ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी चाचणीबद्दल इस्रो आणि सहभागी संस्थांचे अभिनंदन केले असून, गगनयान मोहिमेत भारतीय अंतराळ संशोधनाची नवी अध्याय सुरू होत असल्याचे सांगितले आहे.
गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहिम असून, पुढील काही वर्षांत भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीजवळील कक्षेत (Low Earth Orbit) पाठविण्याची तयारी सुरू आहे.
समाज माध्यमावरील इस्रोची प्रतिक्रिया.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
DRDO कडून ‘इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टीम’ची यशस्वी चाचणी
