गणेशोत्सव (Ganeshotsav) २०२५ : भक्तिभाव, श्रद्धा आणि हरित उपक्रमांसह श्रींचे आगमन

Vishal Patole
Ganeshotsav

मुंबई, २७ ऑगस्ट २०२५ – देशभरात आजपासून (Ganeshotsav) गणेश चतुर्थी उत्साहात साजरी होत आहे. बाप्पाच्या आगमनाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडपांत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने गल्ल्या-बोळ दुमदुमून गेले आहेत.मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नागपूर यांसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आकर्षक व पर्यावरणपूरक सजावट दिसत आहे. प्रसिद्ध गणेश मंडळांनी यंदाही समाजप्रबोधन, स्वच्छता मोहिमा, तसेच डिजिटल उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.

Ganeshotsav

गणेशोत्सव निर्विघ्न आणि पर्यावरणपूरक पार पडावा, यासाठी यंदा पोलिस प्रशासन व नगरपालिकांकडून मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. अनेक मंडळांनी शाडू मातीच्या मूर्तींचा स्वीकार करून ‘हरित गणेश’ चा संदेश दिला आहे. तसेच प्लास्टिकमुक्त सजावट व कृत्रिम सरोवरांमधील विसर्जनासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे.

गणेशोत्सवाच्या पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच यंदा डिजिटल आरती आणि ऑनलाइन दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे. त्यामुळे देशाबाहेर असलेले भक्तही थेट प्रसारणाच्या माध्यमातून बाप्पाचे दर्शन घेत आहेत.

राज्यभरातील मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविक रांगा लागत असून, सर्वत्र भक्तिभावाचे आणि आनंदमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.

गणेशोत्सव फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरला आहे. “विघ्नहर्ता श्री गणेश” च्या आगमनाने समाजात सकारात्मकता, एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दहा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देश गणेशमय होणार आहे.

Ganeshotsav – लाल बागच राजा LIVE दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या (Ganeshotsav) गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक माध्यमावर संदेश देताना त्यांनी म्हटले की, गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा पावन उत्सव असून तो सर्वांसाठी मंगलकारी ठरो. भगवान गजानन सर्व भक्तांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्य प्रदान करो, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली. मोदींच्या या शुभेच्छा संदेशामुळे “गणपती बाप्पा मोरया” चा उत्साही जयघोष सर्वत्र उमटत आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणीचे ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईचा राजा, गणेशगल्ली च्या गणरायांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

जागतिक उपासमारविरोधात भारत आणि जागतिक अन्नकार्यक्रम (WFP- World Food Programme) यांची हातमिळवणी

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत