इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS 2025) भरतीसाठीची चौथी मेरिट लिस्ट अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in वर जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मेरिट लिस्टमध्ये निवडले गेले नव्हते, त्यांच्यासाठी ही लिस्ट एक नवीन संधी घेऊन आली आहे.

GDS 2025 निकाल
जानेवारी २०२५ मध्ये पोस्टाने GDS साठी ऑनलाईन अर्ज मागविले होते, या पदासाठी कोणतीही परीक्षा न घेता दहावीच्या गुणांच्या आधारे मेरीट नुसार उमेदवाराची निवड होत असते, निवडल्या गेलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आणि ईमेल वर कागदपत्रे पडताळणीच्या पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाते व त्यानंतरच उमेदवाराची निवड निश्चित केली जाते. या संदर्भात पोस्टाने या अगोदरच ३ मेरीट लिस्ट प्रसिद्ध केल्या आहेत आणि नुकतीच चौथी मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.
ही मेरिट लिस्ट राज्यनिहाय प्रकाशित करण्यात आली असून, विविध पोस्टल सर्कल्ससाठी निवड झालेल्या उमेदवारांची नावे या यादीत देण्यात आली आहेत. ग्रामीण डाक सेवक पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.
GDS 2025 मेरिट लिस्ट पाहण्यासाठी पायऱ्या:
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – indiapostgdsonline.gov.in
- ‘GDS Online Engagement’ या टॅबवर क्लिक करा
- तुमच्या राज्यानुसार ‘Supplementary List-IV’ या लिंकवर क्लिक करा
- PDF डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुमचे नाव व नोंदणी क्रमांक शोधा
यापूर्वी इंडिया पोस्टने तीन टप्प्यांमध्ये मेरिट लिस्ट्स प्रसिद्ध केल्या होत्या. ज्यांची त्या यादींमध्ये निवड झाली नव्हती, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे.
राज्यनिहाय निवड यादीसाठी थेट लिंक वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपली स्थिती तपासावी आणि पुढील सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार कारवाई करावी.
GDS 2025 ची दुसरी मेरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
GDS 2025 ची तिसरी मेरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
GDS 2025 ची चौथी मेरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती – 2025 मध्ये सुवर्णसंधी!- Indian Coast Guard Bharti 2025
कर्मचारी निवड आयोग (SSC) सिलेक्शन पोस्ट भरती 2025 – SSC 2025
