२ जुलै २०२५ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आफ्रिकन, कॅरिबियन व लॅटिन अमेरिकन (Global South) देशांमध्ये राजकीय व सांस्कृतिक सहभाग वाढवण्याची ऐतिहासिक मोहीम सुरू झाली. ही भेट केवळ औपचारिक शिष्टाचारापुरती मर्यादित न राहता, ग्लोबल साउथचे नेतृत्व करणाऱ्या भारताच्या धोरणात्मक भूमिकेचे सशक्त प्रदर्शन ठरणार आहे. या दौऱ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आज दि ०६ जुलै २०२५ रोजी भारतीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे ब्राझील देशाची राजधानी रिओ दि जेनेरो याठिकाणी आगमन झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी ब्राझील मधील भारतीय समुदायाची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्राझील दौरा म्हणजे जागतिक दक्षिणेतील (Global South) बदलत्या सत्तासंतुलनात भारताच्या वाढत्या नेतृत्वभूमिकेचा स्पष्ट प्रत्यय देणारा टप्पा ठरणार आहे. रियो डी जनेरियो येथे होणाऱ्या BRICS शिखर संमेलनात भारताने बहुपक्षीय सहकार्य, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञानाधिष्ठित भागीदारीवर भर देणार असून त्याबाबत आपली स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडणार आहे. भारताने (Global South) ग्लोबल साउथच्या विविध देशांमध्ये वाढत्या सहकार्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे महत्त्व यामध्ये अधोरेखित करण्यात येणार आहे.
- Global South दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात घानाला भेट
- त्रिनिदाद व टोबॅगो: भारतीय मुळांशी सांस्कृतिक संबंधांची पुनर्स्थापना
- मोदींचा आर्जेन्टिना दौरा
- BRICS बैठकीत सामील होण्यासाठी मोदींचे ब्राझीलमध्ये आगमन
- ब्राझीलमधील भारतीय समुदायाकडून मोदींचे भव्य स्वागत
- ग्लोबल साउथ आणि भारत
- (Global South) दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नामिबियाला भेट देणार मोदी

Global South दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात घानाला भेट
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत, ग्लोबल साउथच्या (Global South) देशांसोबत आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
- दि. ३ जुलै २०२५ रोजी घाना देशाची राजधानी अक्रा येथे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रमानी महामा यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदीचे भव्य स्वागत झाले.
- “Officer of the Order of the Star of Ghana” हा घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना प्रदान.
- संपूर्ण भागीदारी (Comprehensive Partnership) चा नवा टप्पा उघडत खनिजे, संरक्षण, सागरी सुरक्षा, उर्जा, कौशल्य विकास, FinTech, आरोग्य आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रात सहकार्याच्या घोषणा.
घानाच्या संसदेत भाषण देणारे पहिले भारतीय पंतप्रधान.- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घानाच्या संसदेत भाषण देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले, आणि यामुळे भारत–घाना संबंधांमध्ये ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला. अक्रा येथे झालेल्या या ऐतिहासिक संबोधनात त्यांनी भारत व घानामधील दीर्घकालीन मैत्री, सांस्कृतिक बंध, आणि देशातील सहकार्याचा महत्त्वपूर्ण उल्लेख केला. मोदींनी आपल्या भाषणात दोन्ही देशांनी लोकशाही, मानवाधिकार, समावेशी विकास यांसारख्या मूलभूत मूल्यांवर आधारित सहकार्याचे दर्शन घडवले असल्याचे सांगितले. त्यांनी घानाच्या राष्ट्रपती जॉन ड्रमानी महामा यांच्यासोबत झालेल्या फलदायी चर्चांचा आढावा घेत खनिजे, सागरी सुरक्षा, ऊर्जा, संरक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक सहकार्य या क्षेत्रांमध्ये भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला. घानामधील भारतीय समुदायाच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले. या दौऱ्यादरम्यान मोदींना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘Officer of the Order of the Star of Ghana’ देण्यात आला. त्यामुळे भारत–आफ्रिका संबंध अधिक दृढ होत असून, पंतप्रधान मोदींच्या या ऐतिहासिक भाषणाने घानातील आणि संपूर्ण ग्लोबल साउथमधील भारताच्या भूमिकेला नवी दिशा दिली आहे. यावेळी आफ्रिकन युनिटीचे प्रेरणास्थान असलेले डॉ. क्वामे न्क्रुमाह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्रिनिदाद व टोबॅगो: भारतीय मुळांशी सांस्कृतिक संबंधांची पुनर्स्थापना
ग्लोबल साउथच्या पाच देशांच्या दौऱ्यातील घाना नंतरच्या पुढील टप्प्यात दि ४ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद व टोबॅगोच्या ऐतिहासिक दौऱ्यात भारतीय मुळांशी असलेले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध नव्याने उजळवले. पोर्ट ऑफ स्पेन येथे आगमनानंतर त्यांचे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू आणि पंतप्रधान कमला पर्साद बिसेसर यांनी भव्य स्वागत केले. या भेटीत मोदींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान — “Order of the Republic of Trinidad & Tobago” प्रदान करण्यात आला, आणि विशेष म्हणजे हा सन्मान कोणत्याही परकीय नेत्याला प्रथमच बहाल करण्यात आला. हा सन्मान भारत व त्रिनिदाद व टोबॅगोमधील दृढ व ऐतिहासिक मैत्रीचे प्रतीक ठरला.
या दौऱ्यातील चर्चा ग्लोबल साउथच्या (Global South) विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराची प्रतिकृती, तसेच प्रयागराजच्या सरयू नदीचे आणि महाकुंभचे पवित्र पाणी भेटस्वरूप दिले. हे भेटवस्तू भारत आणि त्रिनिदाद व टोबॅगो यांच्यातील आध्यात्मिक नात्याची जिवंत आठवण ठरल्या. धोरणात्मक चर्चांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, हवामान बदल, संरक्षण, कृषी, औषधनिर्मिती, तंत्रज्ञान, आरोग्य, योग आणि क्रीडा या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.
या दौऱ्यात भारताने ग्लोबल साउथच्या (Global South) सांस्कृतिक वारशाला उजाळा दिला.
भारतीय समुदायाच्या सांस्कृतिक योगदानाची झलक पंतप्रधानांनी Bhojpuri Chautaal या पारंपरिक कार्यक्रमात भाग घेऊन अनुभवली. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातून स्थलांतरित झालेल्या लोकांनी जे सांस्कृतिक मूल्य जपले आहे, ते आजही कॅरिबियन जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. या भेटीद्वारे भारताने केवळ द्विपक्षीय संबंध दृढ केले नाहीत, तर जागतिक दक्षिणेकडील भागांशी आपले सांस्कृतिक आणि धोरणात्मक नातेही नव्याने अधोरेखित केले.
मोदींचा त्रिनिदाद व टोबॅगो दौऱ्याचे सामाजिक मध्याम्वरील व्हिडीओ साठी येथे क्लिक करा.
मोदींचा आर्जेन्टिना दौरा
ग्लोबल साउथच्या (Global South) संदर्भात, भारताने सशक्त भूमिका घेतली आहे.
पुढील टप्प्यात दि ५ जुलै २०२५ रोजीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अर्जेंटिनाच्या दौऱ्याने भारत-अर्जेंटिना धोरणात्मक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनाला भव्य स्वरूप प्राप्त केले. राष्ट्राध्यक्ष जावियर माईलेई यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत कृषी, संरक्षण, औषधनिर्मिती, ऊर्जा, क्रीडा आणि व्यापार-विविधीकरण** या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सखोल चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी या संबंधांना पुढील स्तरावर नेण्याची कटिबद्धता व्यक्त केली.
अर्जेंटिनामध्ये पंतप्रधान मोदी यांनी ग्लोबल साउथच्या (Global South) संदर्भात चर्चा केली.
या भेटीत ब्यूनस आयर्स शहराच्या वतीने पंतप्रधान मोदींना ‘Key to the City’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला, जो त्यांच्या जागतिक नेतृत्वाचा सन्मान होता. त्यांनी महात्मा गांधी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, आणि जनरल जोसे दे सान मार्टिन यांना अभिवादन करून भारत आणि अर्जेंटिनामधील ऐतिहासिक व सांस्कृतिक बंध अधिक दृढ केले. मोदींच्या या दौऱ्याने अर्जेंटिनासारख्या लॅटिन अमेरिकन देशासोबत भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवसंजीवनी मिळाली असून, ग्लोबल साउथमधील भारताची भूमिका आणखी बळकट झाली आहे.
BRICS बैठकीत सामील होण्यासाठी मोदींचे ब्राझीलमध्ये आगमन
दि ६ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रिओ द जिनेरिओ, ब्राझील येथे दाखल झाले असून, येथील BRICS शिखर संमेलनात ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया येथे राष्ट्राध्यक्ष लुला डा सिल्वा यांच्या निमंत्रणावरून राजकीय अधिकृत भेटीवर जाणार आहेत. या संपूर्ण दौर्यामध्ये पंतप्रधान मोदी विविध बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकींमध्ये भाग घेणार असून, व्यापार, ऊर्जा, हवामान बदल, औद्योगिक सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि ग्लोबल साउथमधील सहकार्याचे नवे मार्ग शोधण्यावर त्यांचा भर राहणार आहे. उत्पादक चर्चा, धोरणात्मक संवाद आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करणाऱ्या अनेक संवादांची अपेक्षा या भेटीतून व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्राझील दौरा म्हणजे जागतिक दक्षिणेतील (Global South) बदलत्या सत्तासंतुलनात भारताच्या वाढत्या नेतृत्वभूमिकेचा स्पष्ट प्रत्यय देणारा टप्पा ठरणार आहे. रियो डी जनेरियो येथे होणाऱ्या BRICS शिखर संमेलनात भारताने बहुपक्षीय सहकार्य, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञानाधिष्ठित भागीदारीवर भर देणार असून त्याबाबत आपली स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडणार आहे.
भारत–ब्राझील भागीदारी ऊर्जा, हवामान बदल, औषधनिर्मिती, अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान, जैवविविधता आणि शेती संशोधन अशा अनेक क्षेत्रांत दीर्घकालीन सहकार्याची वाटचाल करत आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी ‘हरित संक्रमण’, ‘स्मार्ट ऊर्जा सोल्युशन्स’, आणि ‘डिजिटल भारत’ अभियानाशी निगडित भागीदारी पुढे नेण्याच्या संधी उलगडल्या जाणार आहेत.
ब्राझीलमध्ये भारतीय समुदायाने ग्लोबल साउथच्या (Global South) संबंधांचे जिवंत उदाहरण दर्शवले.
ब्राझीलमधील भारतीय समुदायाकडून मोदींचे भव्य स्वागत
जगातील कोणत्याही देशात जसे स्वागत होते तसेच ब्राझील मध्ये देखील पंतप्रधान मोदींचे तेथील भारतीय समुदायाने सहर्ष स्वागत केले. भारतीय समुदायाकडून मिळालेले भव्य स्वागत हे भारत–ब्राझील यांच्यातील भावनिक आणि सांस्कृतिक नात्याची जिवंत झलक होते. भारताच्या अनेक भागांतून गेलेले आणि ब्राझीलमध्ये स्थायिक झालेले लोक आजही भारतीय परंपरा, भाषा आणि उत्सव जपून ठेवत आहेत. मोदींचा हा दौरा लोक–लोक सुसंवादाचे पूल बांधणारा ठरणार आहे.
ग्लोबल साउथ आणि भारत
ग्लोबल साउथच्या संदर्भात, भारताचे नेतृत्व आता अधिक ठामपणे उभे राहत आहे. आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकी देशांशी बहुस्तरीय संबंध, परस्पर विश्वास आणि सहकार्याच्या आधारावर चीनच्या प्रभावाला एक पर्याय म्हणून भारत उदयास येत आहे. BRICS आणि इतर बहुपक्षीय व्यासपीठांवर भारत हा एका जबाबदार, समावेशक आणि विकासाभिमुख देशाचा चेहरा बनत आहे.
सांस्कृतिक मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून भारताने केवळ धोरणात्मक चर्चाच नाही तर गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि योग यांसारख्या मूल्यांच्या आधारे मूल्याधिष्ठित मुत्सद्देगिरीची उदाहरणे उभारली आहेत. यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारे संबंध बळकट झाले.
मोदींच्या नामिबिया दौऱ्यात ग्लोबल साउथच्या Global South) सहकार्याचे महत्त्व अधोरेखित होईल.
या दौऱ्याचा आर्थिक बाजूनेही महत्त्वाचा टप्पा ठरतो. ‘Make in India’, ‘Digital India’, ‘Skill India’ यांसारख्या मोहिमांना ब्राझीलमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य व औद्योगिक सहकार्य यामध्ये नव्या संधी तयार होत आहेत.
(Global South) दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नामिबियाला भेट देणार मोदी
BRICS संमेलन आटोपल्यावर व ब्राझील दौरा संपवून पंतप्रधान ग्लोबल साउथच्या ५ देशाच्या यात्रेतील अंतिम टप्प्यात “नामिबिया” या देशाचा दौरा करणार आहेत. गेल्या पस्तीस (३५ ) वर्षात नामिबिया देशाला भेट देणारे मोदी हे पहिले तर स्वातंत्र्य प्राप्तीपासून दुसरे भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत याअगोदर मार्च १९९० मध्ये नामिबियाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी नामिबियाला भेट दिली होती.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
ठाकरे (Thakre) बंधूंची एकजूट: सत्तेच्या राजकारणात नवा अध्याय की मराठी अस्मितेचा मुखवटा?
