महाराष्ट्र शासन, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (MH-CET CELL) च्या वतीने सामान्य नर्सिंग मिडवाइफरी (GNM Course) कोर्ससाठी CAP नोंदणीची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे आता पात्र उमेदवारांना २४ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्यभरात सामान्य नर्सिंग मिडवाइफरी (GNM Course)) अभ्यासक्रमाच्या केन्द्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) नोंदणीसाठी अंतिम तारीख अगोदर १९ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली होती. मात्र, इच्छुक उमेदवार आणि पालकांकडून मिळालेल्या विनंत्यांनंतर, प्रवेश अधिकाऱ्यांनी नोंदणीची अंतिम मुदत २४ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

GNM Course प्रवेशाचे नवीन सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
| अ.क्र. | प्रक्रिया | सुधारित तारीख |
| १ | ऑनलाइन नोंदणी व CAP अर्ज सादर करणे | २० ते २४ जुलै २०२५ (रात्री ११:५९ पर्यंत) |
| २ | ऑनलाइन पद्धतीने नोंदणी शुल्क भरणे (नॉन-रिफंडेबल) | २० ते २४ जुलै २०२५ (रात्री ११:५९ पर्यंत) |
| ३ | सर्व आवश्यक मूळ रंगीत दस्तऐवजांचे स्कॅन PDF फॉर्ममध्ये अपलोड करणे | २० ते २४ जुलै २०२५ (रात्री ११:५९ पर्यंत) |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता निश्चित करावी
- अर्जामध्ये दिलेली माहिती योग्य आणि खरी असणे उमेदवाराची पूर्ण जबाबदारी आहे. चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.
- सर्व आवश्यक दस्तऐवज योग्य प्रकारे आणि वेळेत अपलोड करणे आवश्यक आहे.
GNM कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी ही संधी गमावू नये आणि दिलेल्या वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.
अधिकृत सूचना pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा माहिती पुस्तिका पाहावी.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
महाराष्ट्रात 11,000 पोलिसांची भरती (Police Bharti) होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा!
