नवी दिल्ली – १५ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्यावरुन दिलेल्या भाषणात ‘नेक्स्ट-जनरेशन GST सुधारणे’ची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने दि.०४-०९-२०२५ रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली ५६ व्या GST कौन्सिलच्या बैठकीत यासाठी आवश्यक GST सुधारणा प्रस्ताव सादर केला गेला व या प्रस्तावांना मान्यता दिली गेली. त्यानुसार १२% आणि २८% GST स्लॅब रद्द करून आता केवळ ५%, १८% आणि काही वस्तूंवर ४०% हे तीन स्लॅब्स कायम राहतील. या सुधारणांचा मुख्य उद्देश सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुलभ बनवणे आणि व्यवसायासाठी कर भरण्यात सोपी व्यवस्था करणे हा आहे.

GST सुधारणा कधी पासून लागू होतील?
GST कांउसिलच्या निर्णयानुसार, तंबाखू संबधित वस्तू वगळता इतर सर्व वस्तू व सेवांवरील बदल २२ सप्टेंबर २०२५ पासून प्रभावी होतील. तंबाखू उत्पादनांवर विद्यमान GST आणि भरपाई शुल्क पुढील सूचना येईपर्यंत लागू राहणार आहे.
GST मध्ये काय बदल झाले?
- १२% आणि २८% GST स्लॅब रद्द करून आता केवळ ५%, १८% आणि काही वस्तूंवर ४०% या तीन स्लॅब्स कायम होतील.
- रोजच्या वापरातील वस्तूंवर ५% GST लागू होईल ज्यामुळे कपडे, औषधे, वैद्यकीय उपकरणे, घरगुती वस्तू स्वस्त होतील.
- मध्यम व मोठ्या वाहनांवर ४०% GST .
- कृषी यंत्रसामग्री व काही औषधांवर ५% GST ठेवण्यात आला आहे.
- पण तंबाखू आणि पान मसाल्यांसारख्या वस्तूंवर ४०% GST लागू राहील.
GST कशी लागू होईल?
आधीची वस्तू किंवा सेवा दिली गेली असल्यास आणि बिल नंतर जरी काढलं गेलं तरी GST लागू होण्याचा वेळ पुरवठा किंवा बिल यांच्यामधून निश्चित केला जाईल. पूर्वीच्या GST दरांवर मिळालेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा वापर नवीन नवी दिल्ली – १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्यावरुन दिलेल्या भाषणात ‘नेक्स्ट-जनरेशन जी.एस.टी. सुधारणे’ची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने दि.०४-०९२०२५ रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली ५६ व्या जी.एस.टी. कौन्सिलच्या बैठकीत यासाठी आवश्यक जी.एस.टी. सुधारणा प्रस्ताव सादर केला गेला व या प्रस्तावांना मान्यता दिली गेली. त्यानुसार १२% आणि २८% जी.एस.टी. स्लॅब रद्द करून आता केवळ ५%, १८% आणि काही वस्तूंवर ४०% हे तीन स्लॅब्स कायम राहतील. या सुधारणांचा मुख्य उद्देश सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुलभ बनवणे आणि व्यवसायासाठी कर भरण्यात सोपी व्यवस्था करणे हा आहे.दरांनुसार केला जाऊ शकतो. मात्र, काही परिस्थितींमध्ये या कर क्रेडिटचे समायोजन किंवा पंचनामे करावे लागू शकतात. म्हणजेच, जेव्हा जी.एस.टी. दरांमध्ये बदल होतो, तेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिटच्या वापरासाठी नवीन नियम लागू होतात आणि कधीकधी क्रेडिट रद्द करावे लागते किंवा त्यात बदल करावा लागू शकतो. हे कर व्यवहाराच्या योग्यतेनुसार आणि नवीन जी.एस.टी.नियमानुसार ठरवले जातात, ज्यामुळे कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित होते.
विशेष बाबींसाठी ४०% जी.एस.टी. चा नवीन दर
- तंबाखू संबंधित उत्पादकांनी कर्ज परतफेडीपर्यंत ४०% जी.एस.टी. नवीन दर लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- UHT दूध आणि वनस्पतीजन्य दूधांना आता कमी जी.एस.टी. दर दिला गेला आहे.
- विविध वाहनांसाठी वेगवेगळे जी.एस.टी. दर निश्चित झाले आहेत.
- सौंदर्य व आरोग्य सेवा ५% जी.एस.टी. स्लॅबमध्ये आहेत.
- क्रीडा, ऑनलाइन गेमिंग सारख्या क्षेत्रांवर उच्च जी.एस.टी. दर लागू आहे.
जी.एस.टी. सुधारणांमुळे कर प्रणाली अधिक साधी, सुलभ आणि परिणामकारक होणार आहे. या बदलांमुळे सामान्य लोकांचं जीवन आणि व्यवसाय सोपं होईल, अशी निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली.
कोणत्या वस्तूवर किती जी.एस.टी. दर ?
२२ सप्टेंबर २०२५ पासून नवीन ५% आणि १८% जी.एस.टी. स्लॅब लागू होतील. खालीलप्रमाणे वस्तूंवर हे लागू होईल:
५% जी.एस.टी. दर असलेल्या वस्तू
- रोजच्या गरजेच्या वस्तू जसे की: शाम्पू, साबण, तेल, टूथपेस्ट, टूथब्रश, सायकल, किचन व घरगुती उपकरणे
- अन्न पदार्थ: ब्रेड, पराठा, दूध, पनीर, पास्ता, नूडल्स, कॉफी, चॉकलेट्स
- कपडे आणि शूज (₹२५०० पर्यंत)
- अनेक औषधे व वैद्यकीय उपकरणे
- UHT दूध आणि वनस्पतीजन्य दूध
- शैक्षणिक साहित्य व सायकलच्या पार्ट्स
१८% जी.एस.टी. दर असलेल्या वस्तू
- वाहनं व त्यांचे पार्ट्स: तिनचाकी, मोटारसायकल (३५० सीसीपर्यंत), कार, बस, ट्रक इ.
- इलेक्ट्रॉनिक्स: टीव्ही, मॉनिटर, एसी, डिशवॉशर
- बांधकाम साहित्य: सिमेंट आणि इतर सामग्री
- घरगुती इलेक्ट्रॉनिक्स
जी.एस.टी. मुक्त वस्तू असलेल्या वस्तू
- पनीर, ब्रेड, दूध
- वैयक्तिक आणि आरोग्य विमा
४०% जी.एस.टी. दर असलेल्या वस्तू (विशेष वस्तू)
- पान मसाला, गुटखा, सिगारेट, बिडी, झर्दा, तंबाखूजन्य पदार्थ
- कोल्ड ड्रिंक्स, कार्बोनेटेड व साखरयुक्त पेय
- महागडे वाहनं आणि ३५० सीसी पेक्षा मोठ्या मोटरसायकली
- ऑनलाइन गेमिंग, बेटिंग, कॅसिनो व लॉटरी
सर्व जीएसटीच्या या सुधारणा देशातील कर प्रणाली अधिक संगठित, सोपी व परिणामकारक करतील. नागरिकांच्या हितासाठी तसेच उद्योगसृष्टीसाठी या सुधारनेस महत्त्व आहे.
वित्त मंत्रालयाची समाजमाध्याम्वरील पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
(Naval Dockyard) नेव्हल डॉकयार्ड मुंबईमध्ये 286 प्रशिक्षार्थी भरतीसाठी मोठी संधी
(GMC Mumbai) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई मध्ये गट ड (वर्ग-4) पदांसाठी भरती 2025
