आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (ICC WTC Final 2025) च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव करत प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद मिळवले. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडलेला हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला. या सोबतच “चोकर्स” म्हणून असलेली ओळख पुसून दक्षिण आफ्रिका एक चाम्पियान संघ म्हणून सिद्ध झाला त्याचवेळी “टेंबा बवुमा” देखील आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.

ICC WTC Final 2025 सामन्याचा सारांश:
- स्थळ: लॉर्ड्स, लंडन
- तारीख: 11 ते 14 जून 2025
- टॉस: दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला
- परिणाम: दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून सामना जिंकला
- मॅन ऑफ द मॅच: एडन मार्करम (Aiden Markram)
ICC WTC Final 2025 – वर्ल्ड टेस्ट चाम्पियनशिप २०२५ मध्ये बवुमा आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकून इतिहास रचला आहे. सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा विजेता संघ म्हणजे टेंबा बवुमा यांचा दक्षिण आफ्रिका संघ आता खऱ्या अर्थाने जागतिक कसोटीचे जगज्जेते बनले आहेत. दक्षिण आफ्रिका संघाच्या आजच्या यशात या संघाचा कप्तान आणि एक उत्कृष्ट खिलाडू म्हणून टेंबा बवुमा यांचे यश हे प्रशंसा करावी असेच आहे.
टेंबा बवुमा यांच्या कारकिर्दीत, कदाचित संपूर्ण जीवनात प्रथमच टेंबा बवुमा यांना फक्त एक कृष्णवर्णीय आफ्रिकन क्रिकेटपटू म्हणून न पाहता, एक खेळाडू, एक नेतृत्व करणारा आणि एक व्यक्ती म्हणून या अजिंक्यपदाने एक नवीन ओळख दिली आहे. सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःच हे स्पष्ट केले. त्यांच्या फलंदाजी प्रशिक्षकाने बवुमाचे वर्णन करताना एका शब्दात सांगितले: “टफ” म्हणजेच कठीण परिस्थितीतही न डगमगणारा.
टेंबा बवुमा यांचा लांगा ते लॉर्ड्स: एक प्रेरणादायी प्रवास – ICC WTC Final 2025
टेंबा बवुमा केप टाऊनमधील लांगा या झोपडपट्टीत वाढला तेथे त्याचे बालपण गेले – जिथे रस्त्यांचे नाव प्रसिद्ध स्थळांवरून ठेवलेले होते, या परिस्थितीचे वर्णन करताना टेंबा बवुमा म्हणतो- प्रत्यक्ष लॉर्ड्सवर खेळणे स्वप्नापलीकडे वाटायचे. “मी कधीच लॉर्ड्सवर खेळतोय असे चित्र डोळ्यासमोर आणले नव्हते, फक्त कल्पना केली होती,” असे त्यांनी 90 च्या दशकातील बालपण आठवताना सांगितले – हाच काळ दक्षिण आफ्रिकेत बदलांचा काळ होता. त्या बदलांचाच परिणाम म्हणून दहा वर्षांतच ते देशातील प्रमुख शाळांमध्ये प्रवेश घेत रंगभेदानंतर उच्चशिक्षणात आलेल्या पहिल्या काही विद्यार्थी लाटेचा भाग बनले. 24व्या वर्षी त्यांनी कसोटीत पदार्पण केलं, जेव्हा दक्षिण आफ्रिका कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होता. मात्र या प्रवासात त्यांच्यावर सतत एकच ओझं होतं – कृष्णवर्णीय आफ्रिकन फलंदाज फलंदाजी करू शकतात ? हे वारंवार सिद्ध करण्याचं.
कृष्णवर्णीय फलंदज म्हणून प्रतिनिधित्वाचं कायम ओझं
टेंबा बवुमा हे प्रथम अशा प्रकारे खेळणारे कृष्णवर्णीय आफ्रिकन फलंदाज होते, जे देशासाठी पूर्णवेळ कसोटी खेळले. 2016 मध्ये त्यांचे पहिला शतक म्हणजे कृष्णवर्णीय क्रिकेटचा टर्निंग पॉइंट मानला गेला. पण जेव्हा त्यांना अपयश येत असे, तेव्हा ते संपूर्ण समुदायाचं अपयश मानलं जायचं – अशा प्रकारचे एक फार मोठं ओझं त्यांच्या खांद्यावर कायम असायचं.
2021 मध्ये जेव्हा त्यांना मर्यादित षटकांच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलं, तेव्हा फक्त काही सामने खेळलेल्या या खेळाडूला कोटा कर्णधार म्हणत टीका झाली. त्यातच 2022 T20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीमुळे टीकेची झोड वाढली.
परिवर्तन आणि पुनरागमन
पण मग परिस्थिती बदलली. शुक्री कॉनराड यांच्या नेतृत्वाखाली कसोटी संघाचं प्रशिक्षण सुरू झालं आणि बवुमा यांना पुन्हा कसोटी संघाचे कर्णधार म्हणून संधी मिळाली. त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध वॉन्डरर्सवर 172 धावांची वैयक्तिक सर्वोच्च खेळी केली. हीच त्यांची दुसरी कसोटी शतकी खेळी होती, आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
या WTC (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) सायकलमध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्वात कमी (१२) कसोट्या खेळल्या, त्यामुळे बवुमा टॉप कामगिरी करणाऱ्यांमध्ये फारसा चर्चेत नव्हता, पण तो असायला हवा होता. या सामन्यापूर्वी तो दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा धावफलक होता. त्याचं सरासरी 59.25 असून दोन शतके आणि पाच अर्धशतके नोंदली आहेत.
लढाऊवृत्तीने दुखापतीवर मात करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला
लॉर्डस वरील wtc २०२५ फायनलच्या सामन्यात, केवळ 6 धावांवर असताना त्याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली, आणि ही दोन वर्षातली त्याची तिसरी दुखापत होती. अशावेळी , टीम मॅनेजमेंटने मैदानावर न जाण्याचा सल्ला दिला असताना, त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवत निर्णय घेतला. “2023 वर्ल्ड कपमधील प्रसंग आठवला, पण मी माझ्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला,” बवुमा म्हणाले. त्यामुळे त्यांच्या 66 धावांनी 147 धावांची भागीदारी तयार झाली आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची पायाभरणी झाली.
“मी फक्त कृष्णवर्णीय क्रिकेटपटू नसून देशासाठी काहीतरी सिद्ध केले आहे”, “दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असणं सोपं नाही. पण त्याग, अपयश – सगळं आज सार्थ वाटतं,” असं बवुमा म्हणाले. “सोडून देणं ही कायम एक पर्याय असतो, पण आतून एक प्रेरणा मिळते. आज मी फक्त कृष्णवर्णीय क्रिकेटपटू म्हणून नव्हे, तर देशासाठी महत्त्वाचं काम करणारा म्हणून ओळखला जातोय. हे मला अभिमानाने छाती फुलवून चालायला लावेल. आणि मी आशा करतो, हे आमच्या देशासाठी प्रेरणा ठरेल.”
या तीन-साडेतीन दिवसांत बवुमाने हे सिद्ध केलं की, तो करू शकतो, त्याने केलं, आणि त्याला करायला हवं होतं.
“हो, ते ओझं आहे, पण त्या अपेक्षा पेलणं हा एक सन्मान देखील आहे,” तो म्हाणाला “आता कोणतीही ताकद ही गोष्ट माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही – कारण मी माझ्या संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला.”
टेंबा बवुमाचे हे शब्द अगदी खरे यासाठी देखील आहेत करणा त्याच्या नेतृत्व आणि सुरेख कामगिरीने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला एक नवीन ओळख देण्यात खूप मोठी मदत केली आहे ती ओळख म्हणजे ते आज जागतिक आय सी सी टेस्ट चाम्पियन आहेत. आणि ते चोकर्स नाहीत कारण ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला नमवून त्यांनी हे यश मिळविले आहे त्यातच सर्व काही आले.
मार्करम च्या चिवट खेळीने ऑस्ट्रेलियाला रडवले
ICC WTC Final 2025 च्या अंतिम डावात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडेन मार्करम ने अत्यंत संयमी आणि चिवट खेळी खेळत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे मनसुबे हाणून पाडले. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात जशी व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८२ धावांचा पाठलाग करताना केवळ तिसऱ्याच ओव्हर मध्ये दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ९ धावांवर असताना व वैयक्तिक ६ धावांवर खेळताना मार्करम सोबत सलामीस उतरलेला रिकलटन स्टार्क गोलंदाजीवर कॅरी च्या हाथी झेलबाद झाला. त्याच्या नंतर फलंदाजीस आलेला मल्डर केवळ २७ धावा काढून स्टार्क च्या चेंडूवर लाबुशेन च्या हाथात झेल देऊन बाद झाला मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ ७०/२ अशी असताना दुखापतग्रस्त असलेला दक्षिण आफ्रिकेचा कप्तान टेंबा बवुमा खेळावयास आलेल्या टेंबा बवुमाने मार्करमला योग्य साथ देत १३४ चेंडू खेळून काढले त्याने ५ चौकारांच्या मदतीने ४९.२५ च्या स्ट्राईक रेटने ६६ धावा केल्या अशाप्रकारे मार्करम आणि टेंबा बवुमा यांची दक्षीण अफिकेला अत्यावश्यक असलेली १४७ धावांची भागीदारी उभी राहिली. मात्र त्याचवेळी टेंबा बवुमा कमिन्स च्या गोलंदाजीवर कॅरी च्या हाथी झेलबाद झाला. मात्र एडेन मार्करम ने आपली अत्यंत संयमी खेळी पुढे देखील सुरु ठेवत तो खेळपट्टीवर चिटकून बसला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ २१७/३ बाद या अवस्थेत होता. बवुमा बाद झाल्यावर खेळावयास आलेल्या स्टब्सने ४३ चेंडूत ८ धावा काढल्या तोच त्याला स्टार्क ने बोल्ड आउट केले. त्यानंतर डेविड बेडिंगम सोबत आणखी ३२ धावांची बहुमोल भागीदारी केली व तो सामना संपवेल असे वाटत असतानाच हेजलवूड च्या गोलंदाजीवर हेड च्या हाथी झेल देऊन बाद झाला मात्र तोपर्यंत त्याने आपल्या संघाला योग्य ठिकाणी पोहोचविले होते. कारण तो बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती. मार्करमने १४ उत्कृष्ट चौकारांच्या मदतीने २०७ चेंडूचा सामना करत ६५.७० च्या स्ट्राईक रेटने वैय्यक्तिक १३६ धावा ठोकल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढले. त्याच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली. शेवटी स्टार्कच्या गोलंदाजीच्या १५ व्या ओव्हर च्या चौथ्या चेंडूवर व डावाच्या ८४ व्या ओव्हरमध्ये वारीयान ने कव्हर मध्ये बचावात्मक शॉट खेळत एक धाव काढली व सामना त्यासोबतच ICC WTC Final 2025 जिंकली. बेडिंगमने ४९ चेंडूत २१ धावा करून तो नाबाद राहिला तर वारीयान ने १३ चेंडूत ४ धावा काढून तो देखील नाबाद राहिला.
पहिला डाव – 212 धावा (56.4 षटके): ICC WTC Final 2025
- स्टीव्ह स्मिथ – 66 (112 चेंडू, 10 चौकार)
- ब्यू वेबस्टर – 72 (92 चेंडू, 11 चौकार)
- दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा याने भेदक मारा करत 5 बळी घेतले. मार्को जान्सेनने 3 बळी टिपले.
दुसरा डाव – 207 धावा (65 षटके): ICC WTC Final 2025
- मिचेल स्टार्क – नाबाद 58 (136 चेंडू, 5 चौकार)
- अॅलेक्स कॅरी – 43 (50 चेंडू, 5 चौकार)
- रबाडाने दुसऱ्या डावातही 4 बळी मिळवले. लुंगी एन्गिडीने 3 बळी टिपले.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी: ICC WTC Final 2025
पहिला डाव – 138 धावा (57.1 षटके):
- डेव्हिड बेडिंघम – 45 (111 चेंडू, 6 चौकार)
- कर्णधार टेंबा बवुमा – 36 (84 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार)
- ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने उत्कृष्ट मारा करत 6 बळी घेतले.
दुसरा डाव – 282/5 (83.4 षटके):
- एडन मार्करम – 136 (207 चेंडू, 14 चौकार)
- टेंबा बवुमा – 66 (134 चेंडू, 5 चौकार)
- शेवटी दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून 282 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि विजयी नोंद केली.
सामन्यातील ठळक बाबी: ICC WTC Final 2025
- कगिसो रबाडाचा सामना पूर्णपणे वर्चस्व: 9 विकेट्स (5+4)
- एडन मार्करमची शानदार शतकी खेळी: निर्णायक डावात 136 धावा
- टेंबा बवुमाचे नेतृत्व: संयमी कर्णधारपद आणि अर्धशतक
- ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात कोसळलेला डाव: भक्कम सुरुवातीनंतरही विजयापर्यंत पोहोचता आले नाही.
सामन्यातील पंचगण: ICC WTC Final 2025
- क्रिस गॅफनी (न्यूझीलंड)
- रिचर्ड इलींगवर्थ (इंग्लंड)
- थर्ड अंपायर: रिचर्ड केटलबरो (इंग्लंड)
- रिझर्व अंपायर: नितीन मेनन (भारत)
- मॅच रेफरी: जवागळ श्रीनाथ (भारत)
ऐतिहासिक विजय: ICC WTC Final 2025
1998 नंतर प्रथमच द. आफ्रिकेने आयसीसीचे मोठे स्पर्धात्मक विजेतेपद जिंकले. 27 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा ऐतिहासिक क्षण द. आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल.
द. आफ्रिका आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन!
क्रिकेट प्रेमींसाठी हा एक अभिमानास्पद व ऐतिहासिक दिवस ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे विशेष अभिनंदन !
समाज माध्यमावरील आय सी सी च्या अन्य प्रतिक्रिया.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती – 2025 मध्ये सुवर्णसंधी!- Indian Coast Guard Bharti 2025
