भारतीय तटरक्षक दल भरती सीजीईपीटी 01/2026 च्या परीक्षा दिनांक, केंद्र जाहीर ! (ICG Admit Card) प्रवेशपत्र केव्हा ?

Vishal Patole
ICG Admit Card

भारतीय तटरक्षक दल (ICG) भरती प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे . सीजीईपीटी 01/2026 आणि 02/2026 परीक्षांसाठी परीक्षेची तारीख व परीक्षा शहराचे नाव आता अधिकृत वेब पोर्टलवरील उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.उमेदवारांना परीक्षेच्या शहराचे तपशील पाहण्यासाठी आपल्या व्यक्तिगत लॉगिनवर जाऊन माहिती मिळवता येईल. मात्र, ICG Admit Card अ‍ॅडमिट कार्ड (प्रवेशपत्र) परीक्षेच्या तारखेच्या 48 ते 72 तास आधीच वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. उमेदवारांनी वेळोवेळी लॉगिन तपासत राहून प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे.

भारतीय तटरक्षक दलाची ही परीक्षा देशभर आयोजित करण्यात येते. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून ते प्रिंट करून घेणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही, याची विशेष नोंद घ्यावी, असे सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

ICG Admit Card , परीक्षा दिनांक व केंद्र पाहण्यासाठी लिंक

उमेदवारांनी Indian Coast Guard Bharti 2025 CGEPT 01/2026 & 02/2026 बॅच साठी अर्ज केलेला असेल तर यांनी खालील लिंक वर क्लिक करून आपल्या प्रोफाईल ला लॉगीन करावे त्यानंतर त्यांना आपल्या परीक्षेची दिनांक, परीक्षा केंद्र इत्यादी माहिती मिळू शंकर आहे. परंतु प्रवेश पत्र ICG Admit Card केवळ परीक्षेच्या ४८ ते ७२ तास अगोदरच प्रिंट करता येणार आहे.

परीक्षा केंद्र, परीक्षा दिनांक तसेच ICG Admit Card करिता येथे क्लिक करा.

ICG Admit Card कसे काढावे

स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

१. सर्वात अगोदर आपला ऑनलाईन अर्ज करताना नोंदणी केलेला इमेल आयडी माहित असावा.

२. मग येथे दिलेल्या ICG Admit Card या लिंकवर जाऊन इमेल आयडी टाकून खालील पर्यायात पासवर्ड टाकावा.

३. जर पासवर्ड विसरला असेल तर Forgate Passwordया पर्यायावर क्लिक करून मग ओ टी पी मिळविण्यासाठी इमेल किंवा मोबाईल पर्याय निवडावा त्यानुसार तुम्हाला पासवर्ड रिसेट करण्यासाठी ओ टी पी पाठविला जातो तो ओ टी पी टाकून मग आपला पासवर्ड बदलून घ्या व तो लक्षात ठेवा अथवा लिहून घ्या

४ . पासवर्ड टाकल्यावर आपल्या प्रोफाईलला लॉगीन होईल व आपण परीक्षे विषयी माहिती पाहू शकाल.

या परीक्षेद्वारे भारतीय तटरक्षक दलात Indian Coast Guard Bharti 2025 CGEPT 01/2026 & 02/2026 बॅच अंतर्गत एकूण 630 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीमध्ये नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक ब्रांच) आणि यांत्रिक (Yantrik – Mechanical/Electrical/Electronics) या पदांचा समावेश आहे.

या पदांची नोंदणी प्रक्रिया / अर्ज प्रक्रिया यागोदरच समाप्त झालेली आहे. भारतीय तटरक्षक दल भरती सीजीईपीटी 01/2026 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

(Naval Dockyard) नेव्हल डॉकयार्ड मुंबईमध्ये 286 प्रशिक्षार्थी भरतीसाठी मोठी संधी

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत